बाबांची परी…

Written by

आज २ दिवस झालेत बाळा नी काहीच हालचाल केली नाहीं. ७ व्या महिन्यात असे काही होणे बरे नाही. आरोहीचा जीव वर खाली होवु लागला होता. नवरयाला कळवु पण शकत नव्हती. २ दिवसांन पासन आरोहीचे काहीच बोलने झाले नव्हते. शिप anchor वर होती. नेटवर्क नसल्या मुळे काहीच संपर्क होवु शकत नव्हाता. तिने what’s app वर ख़ुप सारे मेसेज टाकुन ठेवले होते. Network मध्ये आले की दिसतील आणि मग लागलीच कॉल येईल अशी तिची अपेक्षा होती. दिवसभर फ़ोनची वाट बघितली. पण नाहीं आला. काय करावे काही कळे ना…?  मग तिने सासुबाईं बरोबर हॉस्पिटलला ज़ायचे ठरवले.
जीव अगदी टांगनी वर लागला होता. पहिलच बाळ… त्यात असल्या problems…. आणि त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे नवरा घरी नाही. आरोहीचा नम्बर आला. हृदयाचे ठोके वाढु लागले. डॉक्टरांना सगळी हक़ीक़त संगीतली. सगळ चेक अप झाल. बाळाच्या हृदयाचे ठोके कमी ऐकायला येत होते. डॉक्टरांनी अज़ुन १ – २ दिवस वाट बघायला संगीतले.
होत क़धीक़धी अस ख़ुपदा बाळ झोपले असते म्हनुण हालचाल होत नाहीं असे म्हनुण तिला सावरण्याचा प्रयत्न केला. १ २ दिवसात हालचाल नाही झाली तर लगेच सोनोग्राफ़ी करून घेवु मग बघु काय करायच ….. एवढ बोलुन डॉक्टर राउंडला निघुन गेल्या.
आरोहीला खुप टेन्शन आले होत. सासुबाई मात्र समजविण्याचा प्रयत्न करित होत्या पण तिचे मन माने ना. काय करू…. बाळाला काही झाल तर. हे पण नाही. ती सतत बाळाशी बोलण्याचा प्रयत्न करित होती पण काहीच हालचाल होई ना.
ऐरवी बोलले की लगेच हालचाल व्हायची. बेल, कुकर ची शीटी, गाणी, देव घरातील घण्टी हे सगळे आवाज़ ख़ुप प्रिय होते. ऐकताच उड़या मारणे सुरू व्हायचे. तिने सगळे उपाय करुन बघितलेत पण काहीच प्रतिसाद मिळेना. १ दिवस निघुन गेला. टेन्शन मुळे रात्री झोप लागेना….
सकाळ ची कामे आटोपली. मोबाइलवर असेच फ़ोटो बघत असतांना इंटर्नैशनल नम्बर वरन फ़ोन आला. तिने लगेच उचल्ला.
“काय ग… काय झालय…? आवाज़ ऐकताच तिच्या डोळयातन भरभर अश्रु आले”….
“काय हो ३ दिवस झालेत….तुम्हीं एक फ़ोन ही केला नाही. मी किती टेन्शन मध्ये आहे तुम्हाला काही कल्पना तरी आहे काय.”……..
“अग….. पण मी काय करू शिप anchor वर होती मी असाह्य होतो. मला माहिती होत तु वाट बघत असशील म्हनुण मी पोर्ट वर पोहोचल्या बरोबर तुला फ़ोन केला. रडु नको आधी काय झालय ते सांग. तेवढ्यात बाळाने ज़ोरदार लात मारली आणि आरोहि मोठ्याने किंचाळली. अग ये वेडी झाली आहेस काय माझा जीव घेणार आहेस काय.
आरोहि अज़ुन रड़ु लागली.

“अग बोल काही तरी….. माझ BP वाढतय”..

ती रडक्या स्वराने बोलली,”मी सगळ करुन बघीतल पण बाळ काहीच हालचाल करित नव्हते. तुमचा आवाज़ ऐकताच उड़या मारन सुरु झालय”…

आणि दोघेही ख़ुप रड़ु लागले…

बाळ ज़री आईच्या गर्भात असले तरी बाळाला आपल्या बाबांचा गंध ओळखता येतो. बाळ ९ महीने आईच्या गर्भात आणि बाबांच्या हृदयात वाढत…
मैत्रीनींनो बाबा हे नेहमीच मुलींच्या सगळयात जवळची व्यक्ति असते… त्यांच्याविना आपण आपल्या आयुष्याची कल्पनाच करु शकत नाही…

———————————————————

लेख आवडल्यास आपल्या भावना नक्की कळवा…..

शुद्धलेखनाच्या चुकांना कृपया माफी द्यावी…. ??

©️ अश्विनी दूरगकर?

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत