बाबा आज काही तरी सांगावस वाटताय…

Written by

बाबा आज काही तरी, सांगावस वाटतय… आठवण येते आहे तुमची,थोड रडावस वाटतय।।

हळुच येवुन तुमच्या कुशीत, शिरावस वाटतय.. नको त्या गोष्टीसाठी, आज परत रूसावस वाटतय।।१।।

हात पकडुन तुमचा आज घरभर, नाचावस वाटतय…

लहानपणीच्या आठवणीत परत डुबकी, मारावीशी  वाटतय।।

डोळयांनवर बांधुन पट्टी सोबत तुमच्या आंधळी कोशिंबीर,  खेळावीशी वाटतय…।।२।।

वेळ कसा वेगाने पळतोय आज त्याला, थांबवावस वाटतय….

समाज मर्यादा लांघुन तुमच्या जवळ कायमच, परत यावस वाटतय…।।

या नियमबद्ध परंपरांना तोंडघाशी, पाडावस वाटतय….

उरलेले आयुष्य सोबत तुमच्या घालवुन पांग मला, फेडावेसे वाटतय..।।३।।

का…? कुणास ठाउक पण आज परत लहान, व्हावस वाटतय…..

बाबा आज काही तरी, सांगावस वाटतय….

 आठवण येते आहे तुमची, थोड रडावस वाटतय….

©️अश्विनी दूरगकर.. ✍?

     

    

    

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा