बाबा मिळालेच नाहीत तिला …….

Written by

सावनीची तसं पाहिलं तर तिची एक छान फॅमिली. कोण म्हणेल, वा!! काय कमी आहे तिला?आई-वडिलांची एकुलती एक…….मस्त लाडाकोडात वाढतेय.

पण म्हणतात ना दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं!!

हो जग फसतच होतं……..

खूप सुखी वाटायची ती जगाला……..

पण तिचं दुःख तिलाच माहीत होतं…….

कुटुंब तर होतं…….आई होतीच, वडीलही होते पण ते इतरांना दाखवण्यासाठी…….

वडिलांचं प्रेम तिला कधी मिळालंच नव्हतं……नव्हे मिळू दिलं नव्हतं.

अगदी लहान होती ती, तेव्हाच आई वडिलांचा घटस्फोट झाला होता सावनीच्या.

आता जे लोकांना दिसत होते ते सावनीचे खरे बाबा नव्हतेच मुळी!!

खऱ्या बाबांना तिच्या आईने हेकेखोरपणाने तिच्यापासून दूर ठेवलं…… त्यांचं पितृत्व झिडकारलं.

तिला न विचारताच…….तसं काही कळण्याचं वय नव्हतच मुळी तिचं.

सावनीचे खरे बाबा खूप प्रयत्न करायचे तिला भेटायचा ….. बरेच ठिकाणी तिला भेटू बघायचे. कोर्टाने आईला कस्टडी दिली आणि सावनीच्या आईने त्याबरोबरच बाप-मुलीचं एक नैसर्गिक नातं मनमर्जीने तोडून टाकलं.

आईचं मुलीवर प्रेम खूप होतं, पण त्याहून जास्त इगो होता, ज्याने तिला सारासार विचार करू दिला नाही, बापाला मुलीच्या आणि मुलीला बापाच्या मायेला पारखं केलं.

समजावणारे बरेच होते, पण कुणाचे सल्ले ही ऐकलेच नाहीत तिने……..

सावनी लहान होती तेव्हा तिला काही कळत नव्हतं, पण मोठी होता होता मात्र तिला तिच्या वडिलांची उणीव नक्कीच भासू लागली. तिला त्यांच्या मायेचा हात पाठीवर असावा, असं खूप वाटू लागलं.

पण आईपुढे मात्र ती काही बोलू शकली नाही……आणि आईच्या मनात सुद्धा कधी हा विचार आला नाही की आपण मुलीला बापापासून तोडतोय.

आपण चुकीचं वागतोय……

बरं जो दुसरा माणूस इतरांसाठी तिचा बाप होता, त्यालाही सावनीचा बाप बनण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. तो कधीही तिच्याशी बाप म्हणून वागलाच नाही.

सावनी झुरत होती वडिलांच्या प्रेमासाठी, त्या स्पर्शासाठी आणि तिकडे तिचे खरे बाबा झुरत होते मुलीला भेटण्यासाठी………

सावनीला वाटायचं चूक खरतर दोघांचीही असणार, कोणाची कमी कोणाची जास्त……

मग शिक्षा एकालाच का????

टोकाच्या मतभेदवरून मनभेद झाला होता दोघांचा एवढं ऐकून माहिती होतं तिला.

कोण्या मित्र मैत्रिणीचे वडील नसले तर त्यांना सहानुभूती मिळायची, सावनीला वडील फक्त लोकांना दाखवायला होते, पण अनुभवायला मिळालेच नाहीत कधी. सांगणं ही मुश्किल होत तिच्यासाठी………

आईपुढे बोलणं तर त्याहून कठीण तिला तर नावच नको होतं त्यांचं घरात…….

वाढत होती सावनी अशीच कुढत कुढत, प्रायश्चित भोगत होते दोघेही बाप बेटी त्यांनाही माहिती नसलेल्या गुन्ह्याचं…….

तसा आईचा खूप जीव होता पोरीवर, पण पोरगी मात्र नाही लावू शकली तेवढा जीव आईवर……. केवळ स्वतःच्याच इच्छेचा विचार करून एक सहज नातं मारलं होत तिने, मुलीच्या पोषक वाढीसाठी गरज असताना देखील!!

प्रमाण कमी असेल, पण असही हेकेखोर असतं पालकत्व, मुलांवर हक्क गाजवणारं, प्रेमाच्या नावाखाली मुलांची मन मारणारं, अविचारी, एककल्ली पालकत्व………..

गोष्ट खरी आहे, मी पाहिलेली……..

काय मत आहे तुमचं???? आई वडिलांच्या भांडणात मुलांचा बळी जातो, मुलं भोगतात, कुठल्याही एका पालकापासून मुलांना तोडणं अयोग्य नाही का???

मुलांना गरज दोघांचीही असते, ती गरज ओळखणाऱ्या आईवडिलांचं प्रेम खरं!!!

नाही का????

©स्नेहल अखिला अन्वित

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा