बायकांचा कट्टा अन् गोष्टी ऐका…!!! (एक न संपणारं गोष्टीचक्र)

Written by

बायकांचा कट्ट्यावर रंगणाऱ्या गोष्टींचा एक आढावा..!!

आता सगळे म्हणतात की मुलगा/मुलगी सारखेच…
पण ते फक्त म्हणण्यापूरतेच हं…!!!

आम्ही कॉलेज ला असताना एका friend कडे जायचो, कधी कार्यक्रम, नवरात्र जेवण तर कधी गणपती चे जेवण, कधी birthday ?साठी तर कधी कधी असंच जायचो राहायला आणि मग रात्रभर जागायचो, मस्ती गप्पा गोष्टी…?
सकाळी चहा नाश्ता झाला की अंगणात बसायचो गप्पा करत…

मग काकू ( मैत्रिणी ची आई) पण यायच्या आमच्यासोबत गप्पा करायला…
आणि कोणी शेजारी, इतर कोणी नातेवाईक आले तर ते ही आम्हाला joined व्हायचे..

आमचा group च तसा होता कोणालाही आपलंसं करणारा…?

पण काकू असल्या की एक गोष्ट आवर्जून व्हायची आणि एक  topic त्या जिथे जाईल तिथे काढायच्याच काढायच्या….?

तो म्हणजे तुम्हाला किती बहीण भाऊ??
किती मुलं मुली???

आमच्या ग्रुप मध्ये सुद्धा त्या विचारायच्या..?

तुला किती बहीण भाऊ??
एक बहीण , एक भाऊ …
अरे वाह, भाऊ आहे छान!!!??

तुला ग?
आम्ही तिघी बहिणी..
बापरे !!!(विंचू चवल्यासारखं!!!) ?
तिघी!! मग भाऊ नाही??
का ग???

तुला ग ???
दोन भाऊ…
अरे वाह!!!?
पण बहीण पाहिजे होती नाही का????

तुला ??
एक भाऊ आणि एक मी..
एकच भाऊ…?‍?

(शेजारच्या किंवा इतर नातेवाईक किंवा ओळखीतल्या लोकांसोबत… काकू)

तुम्हाला व्हायचं आहे अजून??
लवकर होऊ द्या.. (मनात एवढे वर्ष झाली तरी झालं नाही अजून??)??
एक तरी मुलगा असायलाच हवा..?
मुलगा मुलगाच असतो नाही का…?

कोणी म्हणायचं एक मुलगी!
मग दुसरं कधी?
बघू..
अहो मुलगा तर हवाच ना !!!
मला पण दोन मुली मग परत chance घेतला आणि मुलगा झाला…?

कोणी म्हणायचं..
एक मुलगा…
अरे वाह पहिला मुलगा.. किती छान…?
मला पण मुलगा आहे…?

तुम्हाला?
दोन मुलं..?
मग मुलगी असावी असं नाही वाटत का..???

कोणी म्हणायचं दोन मुली…
अरे दोन्ही मुलीच…?
मुलगा नाही..???
मग कधी घेणार chance???
एक तरी मुलगा हवाच ना !!

एवढं घर प्रॉपर्टी काय मुलींना द्यायची का..?
शेवटी आपण मुलाकडे च राहू…??
मुलगाच सांभाळेल…?
मुली काय लग्न झालं की झाल्या दुसऱ्याच्या…
नाही का..??

मला तर चार भाऊ आहे तीन बहिणी आहेत…?

तुला किती मामा ग???

विषयांतर झाले तरी मुख्य विषय म्हणजे वंशाचा दिवा असायलाच पाहिजे…
आणि दिवा म्हणजे मुलगाच!!
मुलगी नाही..
हे च ठाम मत…

आपण कित्येक ठिकाणी या गोष्टी ऐकतो
कधी मनावर घेतो कधी सोडून देतो…

पण आज एकविसाव्या शतकात एक स्त्री असून दुसऱ्या स्त्री ला मुलगा नाही तर कधी मुलगा व्हावा यासाठी हिणवले जाते…

ज्यांना मुलबाळ होत नाही किंवा उशिरा होतात अशांची तर हे लोक असे खिल्ली उडवतात की हे च फक्त मायबाप होऊन जगभर नाव कमावल्या सारखं तोरा मिरवतात…

मग एक नवा topic …

काय लग्न झालं…!?
सांगितलं नाही बोलावलं नाही…!?
Love marriage असेल..!?
म्हणून तर खबर होऊ दिली नाही…?
एवढ्या लवकर जुळतं का लग्न..??

मुद्दा दुसरा…

हुंडा किती घेतला?? किती दिला?? ?
काय दिलं??  दागिने किती केले?? आईने काय दिले ??? सासूने किती दिले???
एवढेच दिले !!!
त्या स्वतः तर एवढे घालतात.. !!
त्यांच्या मुलीला तर एवढे दिले…!!!
सुनेला नाही दिले…!!

बाई बाई एवढे दागिने सुनेला…!?
सुनेने पुढे जाऊन सांभाळलं नाही यांना तर..!!
मुलगा तर बायकोचं च ऐकेल..!!

सून कशी आहे नवीन??
छान आहे म्हटलं तर एक नवीन गोष्ट…

सुरुवातीला सगळेच छान राहतात…
हळूहळू दिसेल रंग…?
त्यांनी नाही वागवलं सासूला कधी…
आता यांची सून वागवेल का???
आता कळेल यांना????

सून चांगली नाही म्हटलं तरी आजकालच्या मुलींना सहन होते का हो असे लोकं…!?
आता आपल्याला पण मुली आहे न…!?

Change the topic But …

आता लग्न करावं लागेल ना मुलीचं/मुलाचं ..??
सुरू केलं का बघणं??
जुळलं का लग्न??

झालं का लग्न??
अरे वाह!!
काय मग लाडू कधी ?
काही good news??

मुलगा झाला तर, पहिला मुलगा झाला टेन्शन नाही आता…!
मुलगी झाली तर, मुलगी झाली पहिली बेटी धनाची पेटी..!!
पण मुलगा होऊ दे आता दुसरा…

तर अशा ह्या महिला मंडळांच्या कट्ट्यावरच्या कधी अंगणातल्या तर कधी छोट्या-मोठ्या कार्यक्रमात , तर भजन मंडळीत ही रंगणाऱ्या गोष्टी….

जग कितीही पुढे गेलं कोणतंही सरकार आलं तरी हे गोष्टीचक्र असंच गोल फिरत राहतं
—शाळा-कॉलेज-लग्न-मुलं-एकचं-दुसरंकधी—
एक तरी बहीण भाऊ पाहिजे ना खेळायला… !!
शेवटी सक्ख ते सक्ख च राहते…!
परत त्यांची शाळा ते….
?????????

फोटो साभार: गूगल

(शुद्धलेखनाच्या चुका माफ असाव्यात….
तुमच्या प्रतिक्रिया आणि suggestions नक्की आवडेल…
कथा आवडल्यास like आणि share करायला आणि comments द्यायला विसरू नका…?)

—दिप्ती अजमीरे

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा