बायकोचे पत्र##(कथालेखन)

Written by

साची अन् अमेय च लग्न होऊन दहा वर्ष झाली होती,…साची दिसायला साधारण आणि अमेय दिसायला देखणा,अमेय ला मुळात साची अजिबात पसंत नव्हती पण घरच्यांच्या दबावामुळे त्याला नाईलाजाने साची सोबत लग्न करावे लागले…घरच्यांनी विचार केला साची ही सुसंस्कृत घरातील शिकलेली मुलगी आहे, घरादाराला समोर नेईल असा विचार करून मुलगी पसंत आहे हा ठप्पा मारला…आणि अमेय च्या विरोधात लग्न लाऊन दिलं..सुरवातीच्या दिवसात अमेय साची चा खूप राग करीत असे,परंतु कालांतराने परिस्थिती बदलत होती, अमेय साची ल समजून घेऊ लागला, आणि यामागे कारण साची चे त्याच्या घरच्या लोकांशी चांगले वागणे,.. साची सर्व घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे करत होती, जसे म्हतले तसे..अगदी हसत हसत…सर्व काम करून देखील साचीकडे वेळ उरत होता, म्हणून तिने अमेयला जॉब करू का असे विचारले,आणि अमेय ने लगेच हो म्हणून उत्तर दिले…आणि साची ने जॉब जॉईन केला होता .

अमेय च्या घरामध्ये त्याची मोठी बहीण आणि वडील होते,मोठी बहीण नवरा वरल्यामुळे माहेरीच कायमची राहायला आलेली होती…

थोडीफार जे अमेय आणि साची च नात सुधारत होत त्यामध्ये आता जास्तच दुरावा येत चालला होता, कारण ताईसाहेब दादांचे चांगल्याच प्रकारे कान भरण्याचे काम करत होत्या..आता साचीला मात्र सुचत नव्हते काय करायचे अन् काय नाही,..थोडीफार परिस्थिती चांगली होत आहे असे दिसले की, की ताईसाहेब पुन्हा कान भरण्याचे काम प्रामाणिक पणे करत होत्या…आता मात्र सचीला या सर्व गोष्टींचा खूप कंटाळा येत होता,..आणि तिला अमेयच्या वाईट वागण्याची सवय झाली होती,…आणि केव्हातरी त्याला माझ्या भावना कळतील म्हणून तिने स्वताच्या dairy मध्ये त्याच्याकरिता एक पत्र लिहिले ….खालीलप्रमाणे

 

प्रिय अमेय,

जेव्हा मी तुला पहिल्यांदा पहिले तेव्हाच मी तुझी झाली अन् तू माझा,याचे कारण असे की ,मी दिसायला साधारण असल्यामुळे मला सतत नकारच मिळत होता आणि जेव्हा तू मला होकार दिला त्याच वेळी तुझ्याविषयी आदर अन् प्रेम मला झाले,..नंतर मी खूप स्वप्न सुध्धा रंगवले आणि त्या स्वप्नात केवळ तू आणि मी..मला कोणीतरी जवळची व्यक्ती मिळणार या भावनेने मी खूप भारावून गेले होते,…आणि अशातच आपले लग्न झाले आणि मी तुझ्या घरी आले,माझ्या साठी सर्व काही तिथे नवीन होते..पण तू कुठेतरी मनाच्या जवळ होतास..

तुला मी आवडत नाही असे मला हळूहळू जाणवत होते …याचे कारण काय हा विचार मात्र मी केला नाही,..असो आणि भरीत भर म्हणून तुझी बहीण सारखी माझ्याविषयी तुला भडकून देण्याचं काम करते,हे ही मला कळत होते,पण मी याकडे सुधा लक्ष दिले नाही.

तुला माझा जास्त त्रास होऊ नये म्हणून मी जॉब करण्याचा निर्णय घेतला…पण त्यानंतर देखील तुला माझा तिरस्कार वाटत होता,आता मात्र मला खूप कंटाळा आला रे,..कधीतरी मलाही समजून घेणं प्लीज….

तुला जर तुझ्या बहिण्याच्या म्हणण्या प्रमाणे वागायचे होते तर मला का होकार दिला…ताईसाहेब ला नवरा म्हणजे काय हे कधी कळले नाही म्हणून त्यांनी माझ्या पासून तुला नेहमी दूर करण्याचा प्रयत्न केला …असो मी ताई ला काहीच म्हणणार नाही,कारण त्या मला जवळच्या नव्हत्या,पण तू मला समजून न समजण्यासारखे केले याचे मला फार दुःख,…त्या घरात जवळचा मला फक्त तू होतास,…

तुझ्या प्रमाणे मी सुध्धा जॉब करत होते, घरातील सर्व कामे आटपून,सर्वांना काय हवयं काय नको, तुला काय हवयं हे सर्व अगदी प्रामाणिक पने करत होती,..पण तरीसुध्दा तुझी बहिण नेहमी माझ्या कामाला नाव ठेवायची….

मला बरोबर झाडू मारता येत नाही, मला बरोबर कपडे पिळत येत नाही, हे बरोबर करत नाही, ते बरोबर करत नाही…बर मला याचे वाईट नव्हते वाटत,पण ताई मला न सांगता तुझ्याकडे सांगायच्या,अन् मग तू मला सांगायचा…या सर्व गोष्टींचा मला खूप कंटाळा आला रे,.. प्लीज थोड तरी समजून घ्यायचं ना मला…शेवटी मी पण वेगळ्या वातावरणातून वेगळ्या वातावरणात आली होती असो,…मी कितीही चांगल वागण्याचा प्रयत्न केला तरी तुला मझ काही पटणार थोड आहेस….तुला फक्त ताई काय म्हणते ,ताईला काय वाटेल,..ताईने खूप केलं तुझ्यासाठी हेच पटणार,…

कदाचित माझं काही चुकत ही असेल पण जर तू मला सांगितलं तर मला नक्की आवडणार, पण मुद्दाम चुका तुझ्या समोर आणून देण्यात येत असेल तर मी कसं सहन करू,

आपण दोघांनी एकमेकांना समजून घेण्यास प्रयत्न केला तर किती छान होईल, शेवटी संसराच गा ड आपल्या दोघांना समोर न्यायचं आहे,……बघ थोड जमतंय का..थोड तू समजुन घे,अन् थोड मी तुला समजून घेते, …

हवं तर विनंती समज माझी,कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करते,अन् मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत जगायचं आहे…..

तुझीच साची…

 

हे पत्र वाचल्यानंतर अमेय ला भरून आले,व त्याने निश्चय केला की आता मी साची ला समजून घेईल…व तिच्या भावना कधी दुखणार नाही याची नेहमी दक्षता घेईल…..

 

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.