बायकोचे पत्र#कथालेखन

Written by

रवी आणि सीमा यांच्या लग्नाला आता 25वर्षे होणाऱ असतात….रवी तिला सांगतो मी तुला एक छान सरप्राईज देणार आहे…..सो तु काय देणार मला….ती म्हणाली मी तुम्हाला एक पत्र देणार आहे…..माझी किती तरी वर्षाची इच्छा होती पण कधी जमले नाही…..रवी हसला आणि म्हणाला माझी बायको अगदी सायको झाली आहे….त्याने तीच्याकडे बघितले तर नाक अगदी रागाने लाल झाले होते….लगेच त्याने तोंडाचा चंबु केला आणि ती लाजत म्हणाली अहो मुले मोठी झालेत आता…..
आणि तीन दिवसांनी लग्नाचा वाढदिवस आला….मुलांनी मस्त अरेंजमेंट केली होती….काका काकू,मावशी, मामा,आत्या या सर्वांना बोलावून मुलांनी छान सरप्राईज दिले….दोघांना….केक कापला आणि जवळच जेवणाची ऑर्डर दिली होती….तिथेच जाऊन जेवले सर्व….आणि जवळ रहात असल्यामुळे सगळे आपआपल्या घरी गेले…

रवीने सीमाला सांगितले त्या प्रमाणे छान हार दिला तिला….
आणि तो तीच्याकडे बघत होता….त्याला वाटलं चेष्टा करत असेल कशाला लिहिते पत्र वगैरे….म्हणून त्याने विषय काढला नाही….
ती मनात म्हणाली आजचा दिवस खूप छान गेलाय….जाउदे उद्यां सकाळी देऊ…..आणि ते झोपी गेले….सकाळी उठून रवी ने बघितले तर काय एक गुलाब आणि त्या खाली बायको चे पत्र….

त्याने वाचायला घेतले…..

प्रिय नवरा…..

आपले लग्न ठरले…आणि आपल्या भेटी गाठी सुरू झाल्या….सुरवातीचे दिवस आठवले की अजूनही मी माेहरुन जाते…सगळेच पहिले….तुझी भेट….तूझा स्पर्श….तुझी मिठी….आणि आपली पहिली डेट….आणि तू मला दिलेली पहिली भेट…..हळू हळू दिवस सरत गेले…. आणि आपण लग्न बंधनात अडकलो….

नवरदेव आणि नवरी झालो….सगळे कौतुकाचा वर्षाव करीत होते….आपण जणू उत्सवमुर्ती होतो….पण दुसऱ्या दिवशीच मी बायको झाले आणि तू मात्र अजूनही नवराच आहेस…..
हळू हळू मला तु सायको म्हणू लागलास….तेव्हा वाटे बोलावे तूला…खरच कधी माझ्या बाजूने विचार केलास का रे???
सासर आणि माहेर यातला फरक तूला कळेल का??

जिथे आपण आपली वयाची २०-२५ वर्षे घालवतो….ते सर्व, ती नाती, नाव, आडनाव, सगळे काही बदलून जाते एका दिवसात, एका क्षणात…तूझं तें माझे म्हणायचं…पण हे मीच का असा विचार खूप वेळा मनात येऊन गेला….सुरुवातीला चिडचिड होत होती…नंतर सवय झाली….
मग कोठें तरी वाचले…एक स्त्री एवढा पुरुष कधीच खंबीर नसतो….म्हणून तर आपल्या माणसांना सोडून दुसऱ्या घरात साखरे प्रमाणे विरघळणे तिलाच जमते…..
सुंदर, कोमल, नाजूक, धोरणी, व्यवहारी, मुत्सद्दी,
खंबीर पणे नेतृत्व करणारी, योग्य ते संस्कार देऊन आदर्श नागरिक घडवणारी, प्रत्येक कसरत कौशल्याने पार पाडणारी….स्वतः बरोबरच कुटुंब, समाज,देश आणि राष्ट्र याचा विकास आणि विचार करणारी विधात्याची सुंदर आणि अप्रतिम कलाकृती म्हणजे “स्त्री”.

तूला कधी समजवायला गेले की तू माझी खिल्ली उडवायचास….
कि तुमचे बरे आहे तुम्हाला सर्व दोन दोन मिळते….दोन हक्काची घरे, दोन आई वडील…पण खर सांग तूला पण हे सर्व मिळत नाही का???
लहानपणा पासून परक्याचे धन म्हणून वाढवले जाते….सासरी आल्यावर परक्याची लेक असे बोलले जाते…पण दोन्ही घरी मात्र तूझा मान…सासरी तर तुझ्या शब्दाला केवढी किंमत….तूझा रूबाब…तरी एक दिवस झाला की तूला तिथे करमत नाही….मग् विचार कर आम्ही कसे राहतो???तुझ्या सर्व माणसांना आपले मानते, तुझी सर्व नाती माझी मानते….तुझे मात्र तसे नसते रे….

असो शेवटी सून आणि जावई हा फरक राहणारच नाही का????आणि तुला आता तो लवकरच अनुभवायला मिळणार आहे, कारण आपली तनु आता मोठी झाले….

पण नेहमीच तुझे पारडे मात्र जड….९ महिने मी लेकरू वाढवायचे, त्रास सहन करायचा ,कळा सोसायच्या…आणि बाळ झाले की नाव मात्र तुझे….त्यातून काही चांगले झाले की लगेच बापावर गेलाय हो असे बोलतात….मनात वाट्त आई कशाला मग् ??? खूप राग यायचा मला….पण हळू हळू सगळ्यांची सवय झाली….
सगळे सांभाळले रे….तुझी पिले, तूझा संसार….( मुद्दामून तूझा म्हणते….) कारण चुकून काही राहिले कि नेहमीच बोलतोस रे नाहीशी हो माझ्या घरातून….( ‌माहीती आहे रागात असते खर नसते) तरी दुखावली जाते रे मी….पण खरच सांग ना माझे घर कुठले रे??? बापानी परके धन म्हणून वाढवले, आईनं तेच घर आता तुझे म्हणून पाठवणी च्या वेळेस सांगितले…आणि तू असे बोललास की खचून जाते रे मी…. तुझ्या या संसारात माझे महत्व काहीच नाही का रे???
तुझे ठरलेले प्रोग्रॅम तू माझ्यासाठी कधीच बदलले नाहीस रे पण हे मला वेडी आस आहे कि तू कधि तरी बदलशिल माझ्यासाठी कारण मी माझे आयुष्यच बदलून टाकलय तुझ्यासाठी….तू म्हणजे माझे आयुष्य आहेस माझी प्रत्येक गोष्ट तुझ्याशी सुरू होते अन तुझ्याजवळ संपते हे खरच कधि कळेल का तूला?

कधी तरी माझ्या जागी येऊन बघ, विचार करून बघ, प्रेमाने बोलुन बघ,आता आपल्या लग्नाला २५ वर्षे झाली तरी
मनात येते माझ्या…..

सांग कधि कळणार तूला भाव माझ्या मनातला

नाहीतर जेव्हा कळेल ना तेव्हा खूप उशीर होईल,थोडी centimental आहे मी पण कोणासाठी?….. अरे तुझ्यासाठीच ना

पण तूला तें कळत नाही आयुष्य देऊन उपयोग नाही रे मला काही क्षण दे दिवसातले.

तुझ्या या अशा वागण्यामुळे कुढते मी मनात, मनाला प्रेमाने साद दे

कोणताही नातं एकतर्फी नसतं रे नवरा बायकोचा तर नाहीच…. त्या नात्याला काहि अर्थच नसतो

अजूनही वेळ गेली नाहि माझे वेड मन तुझी वाट बघताय रे मनापासून साद देऊन बघ……

तुझीच….
सायको (बायको)

रवीला खूप भरून आले तो म्हणाला….सीमा मला माफ कर ग…मी कायम गृहीत धरून राहिलो तूला….पण आता राहिले ते सर्व क्षण देणार मी तूला…..आणि तीच्या हातांत
सिंगापुर आणि मलेशिया टुर चे पॅकेज दिले….
म्हणाला आपण दोघेच जायचय सेकंड इनींग हनिमून….मॅडम तयारी करायला घ्या….
सीमा लाजली आणि त्याच्या मिठीत विसावली….त्याने अलगद ओठावर ओठ ठेवले आणि तिला तीचा पहिला रवी मिळाला….आणि पन्नाशीत त्यांच्या मधले प्रेम परत जवान झाले….
✍ अनुजा धारिया शेठ

Article Tags:
Article Categories:
प्रेम

Comments are closed.