बायको तुला काय हवं?

Written by

बायको तुला काय हवं? 💐

बायको तुला काय हवं?
थोडासा आदर हवा
नितांत विश्वास हवा

बायको तुला काय हवं?
घडाभरुन प्रेम हवं
निर्णयाचं स्वातंत्र्य हवं

बायको तुला काय हवं?
कौतुकाचे बोल हवे
आपुलकी,जिव्हाळा हवा

बायको तुला काय हवं?
तुझं समजून घेणं हवं
तुझ्या कुशीत शिरणं हवं

बायको तुला काय हवं?
मत मांडण्याचा हक्क हवा
शांती,सुख,समाधान हवं

बायको तुला काय हवं?
तुझा थोडा वेळ हवा
जाईजुईचा गजरा हवा

बायको तुला काय हवं?
ओंजळभर माया हवी
माहेराची रजा हवी

बायको तुला काय हवं?
तुझी अतुट साथ हवी
फुलणारी प्रीत हवी

बायको तुला काय हवं?
माझं मनसोक्त खरेदी करणं
अन् तुझं बिलं भरणं हवं.🙅

–गीता गजानन गरुड.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा