बायको म्हणजे केअरटेकर नव्हे……..

Written by

 

  • @अर्चना अनंत धवड

श्रुती, आज थोडी टेंशन मध्ये होती… आज तिची एंगेजमेंट झाली होती… पण राहुलचे वागणे तिला खटकत होते…. तो काहीच बोलत नव्हता.. हो ला हो असाच काहीस… तिनी तिच्या बाबाला पण सांगितले… बाबा म्हणाले, अग काही मुल असतात शांत. नाही बोलत जास्त. सगळी मुलं नसतात तुझ्यासारखी….

वडिलांनी तिला समजावले खरे पण त्यांना ही काळजी वाटली. त्यांनी राहुलच्या ऑफिस मध्ये जाऊन चौकशी केली. सगळे व्यवस्थित आहे याची खात्री केली…श्रुती ला समजावले की बेटा मी सगळी चौकशी केली. सगळे ठीक आहे….

एंगेजमेंट नंतर लग्न लगेच पंधरा वीस दिवसात निघाले…. तसाही मुलगा बाहेर गावचा असल्यामुळे भेटी होत नसत… ती फोन वर बोलायची पण तो जास्त बोलत नव्हता…. घरी आई वडिलांना सागितले तर म्हणायचे, अग तो अबोल आहे. जास्त नाही बोलत….

तिलाही वाटायचे, असेल अबोल…

घरातील पहिलेच लग्न असल्याने वडिलांनी अगदी धूम धडाक्यात लग्न केले… कुठलीही कसर बाकी ठेवली नाही…. लग्नात पण मुलगा शांतच होता…. लोक म्हणायची छान जावई मिळाला हो तुम्हाला.. नाहीतर आता ची मुले! श्रुती ला मात्र त्याचा शांतपणा खटकत होता….

लग्न झाले अणि श्रुती सासरी गेली….प्रवासात दोन तीन तासाचे अंतर…. त्या वेळात तो श्रुती सोबत काहीच बोलला नाही…. एक दोनदा अस वाटलं की तो स्वतःशी बोलतोय की काय? आपल्याला भास झाला असेल असे समजून तिने दुर्लक्ष केले… अणि झोपून गेली….

घरी वरात आली… नवरदेव, नवरी अणि श्रुती ची बहीण असे एका रूम मध्ये बसले होते…तो वेगळाच बघायला लागला…. त्याचे हावभाव बदलले.. तिला भीती वाटली तिनी नणंदेला बोलावले….

नणंदे ला सांगितले की, बघा ना, राहुल कसा करतो.. .नणंद म्हणाली, तुझ्यापासून काय लपवायचे…. तू आता बायको आहे त्याची… नणंद बाहेर गेली अणि मेडिकल फाईल घेऊन आली अणि तिच्या समोर टाकली…. श्रुती नी फाईल उचलली…. वाचून धक्काच बसला… मानसिक आजार … किती तरी वर्षापासुन ट्रीटमेंट सुरू होती….

नणंद म्हणाली हे बघ राहुल ला आम्ही आता पर्यत सांभाळले… त्याला खूप सांभाळावे लागते… .. आता तुझ त्याच्यासोबत लग्न झाले तेव्हा त्याला सांभाळण्याची जबाबदारी तुझी…. त्याच्याशी प्रेमानी वागावे लागते…. तसा त्याचा काहीही त्रास नसतो. तो अगदी सामान्य असतो. व्यवस्थित नोकरी करतो. औषध स्वतः व्यवस्थित घेतो. फक्त थोड त्याच्या औषधांच्या वेळेकडे लक्ष द्यावे लागते . आता लग्नामुळे त्याच्या औषधांकडे थोड दुर्लक्ष झाले असेल म्हणुन तो अस वागतो….

श्रुती ओरडली…. का? मी का सांभाळायचे? तुम्ही माझी फसवणूक केली… तुम्ही माझे आयुष्य उध्वस्त केले… तुम्ही आधी का नाही सांगितले? तुम्हाला मुलासाठी बायको नाही तर केअरटेकर हवी होती….

नणंद म्हणाली ओरडू नको? घरी पाहुणे आहेत. आता लग्न झालंय तुझ. आता तुलाच तडजोड करावी लागेल….तुलाच त्याची काळजी घ्यावी लागेल… तुला कशाचीही कमी पडणार नाही…. त्याला सरकारी नोकरी आहे… भरपूर पगार आहे…. तू फक्त त्याला सांभाळून घे….तुझ्या बाबांनी लग्नात एवढा खर्च केला ते तुला अस सहजासहजी परत येऊ देणार नाही…. तेव्हा आता हेच तुझे घर अणि हाच तुझा नवरा….

श्रुती ला काय करावे सुचत नव्हते… आता पाहुणे घरात आहेत.. तेव्हा आपण सुरक्षित आहोत…. आजच्या आज काहीतरी करायला हव…

बाबांना फोन करावा का? नाही बाबा ऐकणारे नाहीत… ते म्हणतील तुझ्या आधीच मनात नव्हते… तिचे काका जे मोठे ऑफिसर होते , त्यांच्या बद्दल तिला विश्वास होता.. तिनी काकांना फोन केला…काकांना मेडिकल हिस्ट्री सांगितली अणि ठाम पणे सांगितले की काका काहीही झाले तरी मी या मुलासोबत राहू शकत नाही. काकांनी तिला सांगितले तू रूम मध्ये थांबू नको… तिथून बाहेर नीघ मी तुझ्या बाबांना समजावतो…. ती चक्क अंगणात थांबली…. काकांनी वडिलांना समजावले…. वडीलांनी भावाला घ्यायला पाठविले…. अणि रात्री दोन वाजता ती माहेरी परतली.. बारा तासात ती कुमारिकेची सौभाग्यवती झाली अणि घटस्फोटिता होण्याच्या मार्गावर आली… याला जबाबदार कोण? श्रुती साहसी मुलगी होती म्हणुन तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला… नाहीतर एखादी मुलगी आपले नशीब म्हणुन स्विकारले असते अणि आयुष्यभर रडत राहिली असती…. श्रुती नी त्याला सोडले तरी तिचेही आयुष्य खराब झाले… आई वडिलांचे लाखो रुपये वाया गेले…. अणि आई वडीलांना पश्चाताप होतोय की आपण श्रुती च्या बोलण्याकडे लक्ष द्यायला हवे होते… आपलेच चुकले असे त्यांना वाटते…

याला दोषी कोण? नंतर परत तिचे बाबा ऑफिस मध्ये गेले.. अणि मुलाच्या आजाराबद्दल चौकशी केली तेव्हा तेथील लोक म्हणाले हो, त्याला मानसिक प्रोब्लेम आहे.. त्याला आम्ही असेच हलके फुलके काम देतो …. पण श्रुती च्या बाबांनी आधी चौकशी केली तेव्हा कुणीही खरी माहिती दिली नाही… तेव्हा जर कुणी खर सांगितले असते तर एका मुलीचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचू शकले असते…

बर्‍याचदा अस पहायला मिळते एखादा व्यसनी मुलगा असेल किंवा काहीही कामधंदा करीत नसेल तर मुलाचे आई वडील त्याचे लग्न लावुन देतात. लग्न झाल्यावर सुधारेल अशी त्यांना आशा असते परंतु त्यासाठी एका मुलीचे आयुष्य डावावर लावतात. अणि सुधारणा झाली नाही तर मुलीला दोष देतात…

श्रुती च्या बाबतीत म्हंटल तर, तिच्या सासरच्या मंडळींना आपल्या मुलाला सांभाळून घ्यायला एक केअरटेकर पाहिजे होती. आपल्या स्वार्थासाठी त्यांनी एका मुलीचे आयुष्य उध्वस्त केले……

काही लोक तर असही म्हणतात की काय झाल थोडी तडजोड केली तर….. पण तिनी न केलेल्या चुकीची शिक्षा का भोगावी?

आता श्रुती नी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय. तिला घटस्फोट मिळेलही… अणि उद्या तीच आयुष्य मार्गी लागेलही…. पण तिला जो मनस्ताप झाला अणि आता ही होत आहे यात तिची काय चूक……अणि तिनी न केलेल्या चुकीची शिक्षा का भोगावी???

अरेंज मॅरेज मध्ये अस बर्‍याचदा होत… मुलगा असो की मुलगी खरी माहिती द्यायला हवी…. आई वडिलांना वाटते की खरी माहिती दिली तर लग्न जुळणारच नाही… अणि तेही खर असत… परंतु असे अंधारात ठेऊन लग्न करून काय साध्य होते….लग्न करून दुसर्‍या दिवशी मोडण्यापेक्षा न झालेले बरे.. नाही का?

आई वडील हे सगळ त्यांच्या मुलांच्या प्रेमापोटी करतात. पूर्वीच्या काळी एकदा लग्न झाले की मुलगा असो की मुलगी तडजोड करायचे परंतु आता तस होत नाही तेव्हा आई वडीलांनी विचार करायला हवा अणि असलेल्या आजाराची माहिती द्यायला हवी… तडजोड करणारा कुणी ना जीवनसाथी नक्कीच मिळतो. बळजबरीने, खोट बोलून मिळालेल्या जीवनसाथी पेक्षा एकमेकाची गरज असणारा , तडजोड करायला तयार असणारा जीवनसाथी कधीही चांगला, नाही का?

©अर्चना अनंत धवड

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत