बालदिनांनिमित्य …!!

Written by

🔴बालदिनानिमित्य……!!

बालपण म्हटल की आनंदाने मन शहारतं…माणुस कोणत्याही गोष्टींनी कितीही मोठा असला तरी त्याला बालपण आठवल की खरोखरच बालपणींचा काळ सुखाचा होता हे जाणवत…पदोपदी आलेली संकटे , जीवन जगत असताना आलेला तणाव , अनेक व्याधीनी त्रस्त झालेले शरीर , भौतिक सुखाची रेलचेल .. यामुळे मानवाला आपले बालपण कसे गेले हे विचार करायला सुद्धा फुरसत नाही..

बालपणाकडे जेंव्हा आपण डोकावून पहातो तेंव्हा तो निरागसपणा आठवतो…ते वेंधळे वागणे… वार्यासारखे पळत सुटणे..आनंदाने खाऊ वाटणी करुन खाणे…खुप गप्पा गोष्टी करण..शाळेला मिळून जाणे.. कधी कधी भांडण… एकमेकांची गट्टी फू करण..क्रिकेट , कब्बड्डी , खो – खो , गोटींचा डाव खेळण…. घरातील मंडळी शिव्या देणार म्हणून लपूण बसणे..या आणि अशा गोष्टींनी बालपण बहरुन जाते… ही प्रत्येक गोष्ट प्रत्येकांच्या आयुष्यात मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवलेली असते..जेंव्हा आठवण येईल तेंव्हा हे सोनेरी पान अलगद उलगडताना मन मोहरुन जाते ..त्यावेळी विलक्षण अनुभुती मिळते…जीवनात नवी प्रेरणा संचारते ..आणि आपण वेगळ्याच भावविश्वात तरंगत असतो.

आत्ता काळ बदलला त्याप्रमाणे सर्वकांही बदलले…त्या बदलाप्रमाणे जाणे इष्ट असते..तसे बालपनाचे रंगही बदलले ..संवादाची माध्यमं आली..चांगल्या – वाईट गोष्टी सहजगत्या शेअर होत गेल्या ..पूर्वी जी उत्सुकता होती तिच्यात शिथिलता आली….

पण बालपण हे कोणीही विसरु शकत नाही…त्याचा मुलामा सोनेरी .. चंदेरी रुपात आपल्या आयुष्याला चिकटलेला असतोच ..निश्चितपणे आज बालदिनांनिमित्य त्याला उजाळा मिळाला आहे…आपल्या सर्वांच्या बालपणींच्या आठवणींना पालवी फुटावी … रम्य ते बालपण आपल्याला प्रेरणादायक ठरावे …ईरावरील सर्व आदरणीय वाचकांना बालदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा …!!

🌹©नामदेवपाटील.

प्रतिक्रिया व्यक्त करा