बालविवाह – एक अनिष्ट प्रथा

Written by

ना कर बालविवाह इस उम्र में… 

            मुरझा जायेंगे ये फुल बचपन में… 

 

मागे एकदा दिल्ली न्यायालयात खटला आला होता… तो होता बालविवाहाचा… यावरून असे लक्षात येते… अजूनही बालविवाह ही प्रथा सर्रासपणे चालूच आहे…

 

बालविवाह कायदा करून पण जास्त फायदा नाही … कारण अजूनही केरळ राज्यामधे जास्त बालविवाह होतात … जो की केरळ हा सर्वाधिक साक्षर असलेले राज्य आहे… हिमाचल प्रदेश… अरुणाचल प्रदेश … कर्नाटक… गुजरात अश्या अनेक राज्यामधे ही प्रथा सुरू आहे.. त्याचप्रमाणे लहान लहान खेड्यांमधे सुद्धा अजून ही प्रथा चालू आहे… बालविवाह अस् करतात जस काय बाहुला बाहुली च लग्न आहे.

 

मुलगी किंवा मुलगा वयात येण्यापूर्वीचा विवाह म्हणजे बालविवाह. बालविवाह हा काही बलात्कारापेक्षा कमी नाही… कारण भारतीय दंड विधानामध्ये जर १६ वर्षांखालील मुलीशी संमतीने अथवा विनासंमतीने शरीरसंबंध ठेवल्यास त्याला बलात्कार मानले आहे… कायदा आणून पण त्याची अंमलबजावणी कधी होणार काय माहित…?

 

लहान वयात झालेल्या लग्नामुळे लैगिंकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते. त्यामुळे त्यांना कुटुंबनियोजन, गर्भधारणा आणि गर्भधारणा झालीच तर काय काळजी घ्यावी हे माहित नसल्यामुळे ते त्यांचे बाळ पोटात किंवा जन्म झाल्यानंतर लगेच काही दिवसांनी त्यांना गमवावे लागते… कारण त्यांचे अपुरे पोषण… सक्षम नसेलेले शरीर… बालविवाहात स्त्रियांवर अकाली मातृत्व लादले जात होते. ज्या वयात शिक्षण घ्यायचे, त्याच वयात स्त्री-पुरुष संसारात पडत असत… यामुळे समाजातून विद्या नाहीशी झाली. आयुर्मान घटण्यास बालविवाह आणि अकाली मातृत्व हीदेखील कारणे होती. समज येण्यापूर्वीच लग्न होत असल्यामुळे, आईवडील शोधून देतील तशा वराबरोबर अथवा वधूबरोबर जीवन त्यांना काढणें भाग पडत होते…. त्यातून कौटुंबिक ताण निर्माण होत, संघर्ष होत आणि पहिली पत्नी सोडून देऊन दुसरी केल्यामुळे पहिलीला परित्यक्तेचे जीवन जगावे लागे.

 

 

 

 

 

 

परंतु स्त्रीच्या चारित्र्याला अतिशय महत्त्व दिले जात असल्याने, मुलगी वयात आल्यानंतर एखाद्या पुरुषाच्या वासनेस बळी पडू नये किंवा स्वत: ही मोहात पडून बदनाम होऊ नये यासाठी बालविवाहाची प्रथा रुढ झाली असावी….

 

एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणेच्या चळवळी सुरु झाल्या. त्यात बालविवाहाचा प्रश्न अतिशय तीव्रपणे चर्चिला गेला. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन या बंगाली व जोतीराव फुले, म. गो. रानडे, गो. ग. आगरकर, धो. के. कर्वे या मराठी समाजसुधारकांनी बालविवाहाच्या विरूद्ध मोहीमच उघडली.

 

बालविवाह हा तर गुन्हा आहेच पण जर आजही हे घडत असेल तर ही काळीमा फासणारी गोष्ट आहे…यावर निर्बंध घातले पाहिजेत…

 

 

 

©®All Rights Reserved….

 

प्रीती बडे

 

 

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.