बिगबॉस आणि आपण 

Written by

बिगबॉस या मालिकेची उत्सुकता म्हणून यंदा मी बिगबॉस मराठी २ हा कार्यक्रम पहिला .आपली सगळ्या हालचाली कॅमेरा टिपतो हे माहित असूनही चांगुलपणाचा बुरखा उतरून माणूस कधी खरा वागू लागतो हे त्यालाही काळत नाही . तिथे ते स्पर्धक होते पण आपण सगळे रोजच्या जगण्यात असेच वागत असतो नाही, असो तो मुद्दा आजचा विषय नाही खरं सांगायचं तर अधून मधून पाहिलेल्या एका भागात एक गोष्ट मनात खूप घर करून गेली . जेव्हा घरापासून दूर असलेल्या स्पर्धकांना अवघ्या काही क्षणांसाठी त्यांचे घरचे भेटायला येतात तेव्हा स्पर्धकांपेक्षा प्रेक्षक अधिक भावुक होत होते अगदी मीही झाले होते .

आई ,वडील, बायको, मुले ,बहीण किंवा मित्र काही क्षणांसाठी भेटून त्या स्पर्धकांना पुढे लढण्याची ताकद उभारी देत होते . असेच बळ देणारे उभारी देणारे कितीतरी हात आपल्यालाही आपल्या आयुष्यात भेटतात पण कालपरत्वे त्यांना आपण विसरून आपल्याच संसारात, कार्यात रममाण होऊन जातो भेट होत नाही फोनही क्वचितच होतात आणि एक दिवस कळत कि ते माणूस ती व्यक्ती आपल्यात नाही . अश्या काळाच्या ओघात हरवलेल्या आपल्या माणसांची आठवण म्हणून काही धार्मिक विधीही करतो आपण जस कि श्राद्ध किंवा तत्सम आणखी तसच काहीस.

पण समजा आपल्याला वर्षातून एकदा अशी एक संधी मिळाली आणि अचानक गमावलेल्या व्यक्तींसारखं कोणी काही क्षणांकरता आपल्याला भेटू शकलं तर?
काय प्रतिक्रिया असेल आपलं गमावलेले माणूस परत भेटलं तर ?? हाच प्रश्न मी स्वतःला विचारला आणि क्षणात माझ्या बाबांचा चेहरा माझ्या समोर आला .. दादा म्हणायचो आम्ही त्यांना, चार वर्ष झाली त्यांना जाऊन. ते हेगेल त्याच्या आदल्या रात्री त्यांना ऍडमिट करून आम्ही दिवसभर तिथेच थांबलो होतो मग संध्याकाळी जेवण आणि डबा ह्यासाठी मी माझ्या घरी निघाले पोहोचेपर्यंतच व्हेंटीलेटरवर शिफ्ट केल्याचा कॉल आला आणि अवघ्या काही मिनिटात ते गेले , मी निघताना त्यांना भेटले नाही मी विचार केला जेवण घेऊन आल्यावर भेटेन पण नाही होऊ शकली भेट. ते जवळ जवळ दहा वर्ष आजारी होते पण नेहमी हसतमुखाने स्वतःचा त्रास लपवायचे हृदयाला सूज आणि मधुमेह आणि बराच इंटर्नल डॅमेज त्यामुळे त्यांना एक्साईट करतील अशा गोष्टी आम्ही टाळत असू , अगदी माझ्या पाठवणीलाही मला त्यांना त्रास होईल म्हणून रडता आले नाही . अशी संधी मिळाली तर मला एकदा त्यांना भेटायचं आहे खूप काही सांगायचंय , बोलायचंय .

असो पण खरंच असं होऊ शकलं तर छान ! पण नाहीच होत हे त्रिकालवादि सत्य आहे म्हणून सांगावस वाटत आभासी जगात वावरत असतो आपण सतत त्यातून थोडा वेळ आपल्या लोकांना देऊन पहा किती छान वाटेल. जास्त काही नाही आजीच्या थरथरत्या हाताने तेल मालिश करून घ्या , हट्ट करून आईला आपल्या हाताने भरावा ( आई खरंच आनंदी होईल पण कबुल करणार नाही पोरकटपणा थांबवा असं खोटं खोटं दटावलेहि ), गम्मत म्हणून बाबांसोबत जुना क्रिकेटचा सामना बघा , भावंडाना गोळा करून कॅरम, रमीचा डाव टाका, खाष्ट आहे म्हणून बोलत नाही अशा काकू , मावशी किंवा आत्या ह्यानं फोन करून खुशाली विचारा. अबोला धरलेल्या जुन्या मित्र किंवा मैत्रिणीला मुद्दाम शोधून काढा आणि आस्थेने चौकशी करा आणि बराच काही करा जे करायला हवं पण आपण करत नाही.

कारण बिगबॉस सारखं काही ह्यॅपनिंग होण्याची वाट बघण्यापेक्षा ह्यॅपिली ह्यॅपनिंग आयुष्य आपणच तयार करा ….. मीपण हेच करणार आहे

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.