बेधूंद पाऊस

Written by

बाहेर छान पाऊस पडत होता. हवेत आल्हादायक गारवा होता. विजूने हातातील पुस्तक बाजूला ठेवले अन् पटकन उठली. अभी ची ऑफिसमधून यायची वेळ झाली होती.त्याला भजी खूप आवडायची ,पाऊस आणि भजी असं समीकरण झालं होतं . विजूने पटापट कांदा कापला , पीठ भिजवलं छान भजी बनवायला घेतली .भजी तयार होत आलीच होती तेवढ्यात टिंगट्यांग मम्माने दार उघडले, तो थेट “आहाहा!” करत किचनमध्ये आला. विजूने हसून त्याच्याकडे पाहिले. गालावर लागलेले पिठ पुसत हसत हसत अभी म्हणाला वाटलच होते मला, आज हा बेत असणारच .”कशी ओळखतेस ग माझ्या मनातलं ?” विजूने छान स्माईल दिले अन म्हणाली “चला पटकन फ्रेश व्हा ,अन् गच्चीत या.”

दोघे गच्चीत टाकलेल्या खुर्चीत बसून भज्यांचा आस्वाद घेत होते .बाहेर मस्त पाऊस , सोबतीला कांदा भजी अन धुंद पावसाच्या आठवणी.विजू आणि अभी आपल्या कॉलेज विश्वात हरवून गेले. गप्पा छान रंगात आल्या होत्या , विजू आणि अभीच्या मित्रमैत्रिणींचा छान निसर्ग ग्रुप होता , ते छान निसर्गभ्रमण करायचे.एके दिवशी सरत्या आषाढात त्यांनी कास पठारावर जाण्याचे आयोजन केले अन् रविवारी सगळे कास पठारावर गेले .छान हिरवा निसर्ग ,सुंदर हिरव्यागार टेकड्या, रंगीबेरंगी फुलांनी बहरलेले पठार अन् सोबतीला बेधूंद करून टाकणाऱ्या पावसाच्या सरी, विजुला पाऊस खूप आवडायचा, ती नाचू लागली, गिरक्या घेऊ लागली ,अभी अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे पाहातच राहिला होता. सगळेच पावसात बेधूंद होऊन नाचले. कवी मनाच्या वीजुने छान चारोळी केली

‘पाऊस आला चिंब करून गेला,
सहवास सख्याचा धुंद करून गेला’
पाऊस आला,बेधूंद झाला,
सहवास हवाहवासा झाला’.

अभी इंजिनिअर झाला विजू आणि अभी विवाहबंधनात अडकले अन् आता गच्चीत बसून छान पावसाचा आनंद घेत भजी खात आहेत;अन् गोड आठवणीत रममाण झालेत.विजू म्हणाली “किती छान मंथरलेले दिवस होते ना ते.अभी म्हणाला “आता पण जायचे का कुठे तरी नेचर डेटिंगला?” “अन् पिल्लू” विजु म्हणाली, त्यांची तीन वर्षांची आेवी तिथेच छान खेळत होती. तेवढ्यात मम्मा चहाचे कप घेऊन गच्चीत आली अन् म्हणाली “मी आहे ना ! जा तुम्ही तुमचे सुंदर क्षण अनुभवा पुन्हा.” खरंच मॉम? ” येस माय बॉय” अन् छान हसत खेळत चहा भजी पार्टी मस्त रंगली. बाहेर पावसाचेही मंजूळ संगीत सुरू होते .

सौ.सुप्रिया रामचंद्र जाधव

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा