बेबी डॉल मै कोरोना दी

Written by

आतापर्यंत “बेबी डॉल में सोने दी “ऐकलं होतं..हे काय आता नवीन?बेबी डॉल में कोरोना दी..? हे गाणं कोणी गायले आहे माहित असेलच….

लेडी KK म्हणजे कनिका कपूर या सध्या चर्चेत आहेत  ते म्हणजे त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय.एका सेलिब्रिटी ला कोरोना होणं म्हणजे चर्चा तर होणारच ना .सध्या सगळीकडे कोरोनाचे थैमान सुरु आहे.आणि त्यात हा विषय समोर येणं म्हणजे कहरच. काय आहे विषय बघुयात..

कनिका कपूर हि एक सुप्रसिद्ध गायिका आहे.राज चंडोक या NRI उद्योगपतीशी लग्न झाल्यानंतर ती त्यांच्याबरोबर लंडन ला स्थायिक झाली.त्यानंतर तिने 3 मुलांना जन्म दिला.काही वैयक्तिक कारणामुळे 2012 साली तिने घटस्फोट घेतला आणि ती भारतामध्ये आई वडिलांकडे म्हणजे लखनऊ ला परत आली.तीनही मुले सध्या शिक्षणा साठी लंडन मधेच राहतात.त्यांना भेटण्यासाठी कनिका महिना-दीड महिन्यातून एकदा लंडन ला जात असते.या वेळी हि मॅडम मुलांना भेटण्यासाठी गेल्या आणि 9 मार्च ला परत आल्या.आल्यानंतर 13 मार्च ला छोटासा घरगुती समारोह(असं त्या म्हणत आहेत हं.. लोकानी तर त्याला Big Bash Party म्हंटल आहे असो.. ) तर तो आयोजित केला होता.त्या मध्ये मॅडम पोहोचल्यास.बरेच मोठं मोठे आमदार,खासदार, मंत्री ,सेलिब्रिटी हि उपस्थित होते या कार्यक्रमासाठी.त्या नंतर 3-4 दिवसांनी कनिकाची तब्बेत बिघडू लागली तेव्हा तिने कोव्हिड-19 ची टेस्ट केली असता तिला कोरोना असल्याचं सिद्ध झालं.

कनिका चं हे प्रकरण समोर आल्यानंतर खरा गोंधळ सुरु झाला.त्या पार्टीला जे जे उपस्थित होते ते सगळे घाबरून गेले.एकच धांदल उडाली .सगळ्यांनी आपापली  टेस्ट करायला सुरुवात केली.यामध्ये खासदार वसुंधरा राजे त्यांच्या मुलाचाही समावेश आहे.यानंतर कनिका वर याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सध्या कनिका डॉक्टरांच्या निगरानी खाली उपचार घेत आहे. परदेशावरून परत आल्या नंतर कोणतीही दक्षता न घेता एअरपोर्ट वरून कोरोना टेस्ट ला सामोरे न जाता नजर चुकवून पळून लखनौला आई वडिलांकडे पोहोचणे आणि त्यांच्याही जीवाला धोका निर्माण करणे हे कितपत योग्य आहे? या कृत्याबाबत तिला विचारले असता मला कोरोना बाबत कोणतीही सूचना मिळाली नाही.भारतात परतल्यावरही मला एअरपोर्ट वर कोणीही काहीच सांगितलं नाही.अगं बाई..तू त्यांची नजर चुकवून पळून आलीस आणि वरून मला कोणी काहीच सांगितलंच नाही मला याबाबत काहीच माहित नाही असा आव आणते आहेस? गेल्या महिनाभरापासून टीव्ही वर ,पेपरला कोरोना बाबत प्रचार केला जात आहे.जे परदेशातून आले आहेत त्यांची टेस्ट केली जात आहे त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन केलं जात आहे.तरीही आपल्याला काहीच माहित नाही असं दाखवत बाई पार्ट्या करीत फिरते आहे.तिच्या वडिलांनीच स्टेटमेंट दिलं आहे की कनिका ही लंडनहुन आल्यापासून 4 ते 5 कार्यक्रम/पार्ट्यामध्ये सहभागी झाली आहे.कनिका तर म्हणते मी एकच कार्यक्रम attend केला आहे.म्हणजे खोटं नेमकं बोलतंय कोण?तिच्या मूळे कोरोना ची लागण झालेल्यानी कोणाला जबाबदार धरायचं?

उलट तीच तक्रार करत आहे “मला ज्या डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं आहे ते मला नीट खायला प्यायला हि देत नाहीत.इंटरनेट वर माझ्याविषयीच्या चुकीच्या वावड्या ऐकून मला ट्रीटमेंट हि व्यवस्थित दिली जात नाही .ज्या गोष्टीची मला कल्पनाच नव्हती त्यासाठी मला कसं काय जबाबदार धरू शकता तुम्ही”

आता साधी सरळ गोष्ट आहे.सध्याच्या  व्हाट्सप ,फेसबुक सारख्या सोशल मीडिया च्या जमान्यात याबाबत काहीच माहित नव्हतं म्हणणं कितपत योग्य आहे? आणि तेही एका सेलिब्रिटी ने? गोष्ट खटकण्यासारखीच आहे.मग लोक तर बोलणारच .आता  मॅडमजवळ एकांतात …”बेबी डॉल में कोरोना दी..” गाणं गुणगुणत बसण्याशिवाय पर्याय नाही. तरीही त्या योग्य ती काळजी घेऊन आजारातून बऱ्या व्हाव्यात व ज्यांना ज्यांना याची लागण झाली आहे ते सगळे यातून सुखरूप बाहेर पाडावेत.हीच प्रार्थना🙏

-©स्वाती रुकडे

लेख आवडल्यास like व share करा.असे विविध विषयांवर लेख वाचण्यासाठी नक्की follow करा.

Comments are closed.