बेसन पिठाचे लाडू-अनोख्या पद्धतीने

Written by

मैत्रिणींनो, आपण दरवेळी पारंपरिक पद्धतीने बेसन पिठ तुपात भाजून लाडू बनवतोच पण कधी कधी ते पिठाळ चव देतात तर कधी कडक होतात.. छान ही होतात हा पण आज मी एक नवी पद्धत तुमच्यासोबत शेयर करणार आहे नक्की करून बघा. ही पद्धत माझ्या एका मैत्रिणीकडून शिकलीये मी, याचे सर्व श्रेय तिला!

साहित्य(८-१० लाडू साठी)

 • १ मोठी वाटी बेसन पीठ
 • १ वाटी साजूक तूप
 • एक वाटी साखर
 • एक वाटी पाणी
 • एक छोटा चमचा वेलची आणि जायफळ पूड प्रत्येकी
 • सजावटीसाठी काजूचे काप आणि चांदीचे वर्क(optional)
 • चिमूटभर मीठ
 • पीठ भिजवायला आवश्यकतेनुसार पाणी

कृती-

 • सर्वप्रथम एक वाटी बेसन पीठ एका बाउल मध्ये किंवा ताटात घेऊन त्यात चिमूटभर मीठ घाला. त्यात आवश्यकतेनुसार हळूहळू पाणी घालून ते पीठ घट्ट मळून घ्या. हे पीठ घट्टच मळायचे आणि थोडा मुरायला बाजूला ठेवून द्यावे.
 • आता गॅस वर एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी असं प्रमाण घेऊन त्याचा पाक बनवायला ठेवावा. आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायांचा आहे तर साधारण अर्धा तास लागतो तसा पाक बनायला.
 • मळलेलं बेसन पीठ थोडं मुरलं साधारण १०मिनिटे की पुन्हा एकदा छान मळून घेऊन त्याच्या पुऱ्या लाटून त्या एक वाटी तुपात तळून घ्यायच्या. (अगदी आपण गव्हाच्या पिठाची पुरी बनवतो त्याच पद्धतीने)
 •  त्या पुऱ्या थंड झाल्यावर त्याचा चुरा करून मिक्सर मधे त्याची एकदम बारीक आणि स्मूध पावडर सारखी पेस्ट करुन घ्या.तोवर आपला साखर पाक ही तयार होईल.
 • ही सगळ्या पुऱ्यांची फाइन पावडर पेस्ट एक पसरट ताटात किंवा परातीत पसरवून त्यावर तयार साखर पाक हळूहळू ओता.
 • सगळा साखरपक त्यात टाकल्यावर चमच्याच्या साहाय्याने एकत्रीत मिक्स करून घ्या.
 • जर पाक टाकल्यावर मिश्रण सैलसर वाटत असेल तर थोडावेळ तसच रेस्ट व्हायला ठेवा.हे पाण्याचा प्रमाण एकदम योग्य आहे पण तरीही जर जास्त ओलसर झालेच मिश्रण तर घाबरून न जाता मिश्रण थंड होऊ द्या ते हळूहळू घट्ट होत जाईल.
 • आता मिश्रणात वेलची पूड आणि जायफळ पूड घालून छान मिक्स करून घ्या आणि हाताला थोडा तुप लावून लाडू वळून घ्या. सजावटीसाठी वर काजूचे कप आणि चांदीचा वर्क लावावा, हे optional आहे. घरात उपलब्ध असेल तर नक्की लावा.

तर मैत्रिणींनो, नक्की करून बघा या अनोख्या पद्धतीने बेसन लाडू, खूपच स्वादिष्ट आणि चविष्ट लागतात आणि मला फोटो नक्की पाठवा बनवून.आणि तुमच्या मैत्रिणींसोबतही ही पाककृती शेयर करा व मला अभिप्राय कळवा.

 

Article Tags:
Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा