बैलपोळा

Written by

एका बातमीच्या निमित्ताने चारछावनीला भेट दिली. योगायोगाने तो दिवस बैलपोळ्याचा होता. बैलपोळा हा सण म्हणजे वर्षातुन एकदा सर्जा-राजासाठी येणारी विशेष पर्वणी. पोळ्याच्या निमीत्ताने बळीराजा सर्जा-राजाची एक दिवस आधी खांदेमळणी करतो. पोळ्याच्या दिवशी त्याच्या शिंगाणा रंग लावणे, शिंगाणा रंगीबेरंगी गोंडे बांधणे, त्याच्या अंगावर रंगरंगोटी करणे, शाल झालरी टाकणे अशा प्रकारे त्याची सजावट करतो. सर्जाराजाला पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिल्या शिवाय स्वतः शेतकरी जेवण करत नाही. अशाप्रकारचा तो सर्जा-राजासाठी असलेला एक सण म्हणजे बैलपोळा होय.(©️ खादीम सय्यद)

चाराछावणीचे चित्र मात्र थोडे वेगळे होते. बळीराजा होता त्या सोबत वर्षभर काबाडकष्ट करण्यासाठी आपल्या धान्याला साथ देणारा सर्जा-राजादेखील होता. पण सणाचा उत्साह राजाला केली जाणारी सजावट यापैकी काहीही नजरेस पडत नव्हते. कारण अनेक शेतकऱ्यांवर आपली घरदार सोडून सणासुदीच्या दिवशी चाराछावणीवर
राहण्याची वेळ देवाने आणली होती. मागील चार-पाच वर्षांपासून दुष्काळाचे सावट झेलणाऱ्या मराठवाड्यातील भागात त्या सर्जा-राजाचा आणि त्याच्या धान्याचा जन्म झाला इतकीच चूक त्यांची असावी. जे देवाने हे भोग त्यांच्या माथी लिहिले असावे ?(©️ खादीम सय्यद)

चाराछावणीवर फिरत असताना एका गोंडस म्हणजेच खालील फोटोत दिसणाऱ्या तीन महिन्यांच्या वासराने माझे लक्ष वेधून घेतले. त्याचा जन्म देखील बहुतेक चाराछावणीवरच झाला असावा. त्याचा धनी काहीतरी खटपट करत बसलेला होता. हे गोंडस वासरू ज्याला आपण ज्या मराठवाड्यात जन्म घेतला आहे. त्याच्या परिस्थितीची जाणीव नसलेला जीव, बांधलेल्या ठिकाणी काही तरी खायला मिळतं का हे शोधत होता. मी त्याला हाक देत फोटो टिपण्याचा प्रयत्न केला. पण भुकेल्या जीवाचा काय प्रतिसाद मिळावा ? तरी देखील मी तो क्षण टिपला. कारण मराठवाडा आणि भागातील विदारक दुष्काळाची दाहकता, बळीराजावर आलेली वेळ त्याची परिस्थिती हे इतर भागातील लोकांना कळली पाहिजे.

(©️ खादीम सय्यद)

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा