भरलेल्या आभाळातली एक सोनेरी कडा ! (भाग१)

Written by

“काहीही करा डाॅक्टर !  पण माझ्या मुलाला आणि नव-याला वाचवा हो …. त्या दोघांशीवाय माझं काहीच नाहीये ” म्हणत, वैदेही हुमसत – हुमसत डाॅक्टरांशी बोलत होती.

“हे बघा ताई !  आम्ही आमचे प्रयत्न करतच आहोत पण अपघात खुप मोठा झालाय आणि तुम्ही तर सगळं बघतच आहात ” म्हणत डाॅक्टर हताशपणे तिथून निघून गेले.

वैदेही कितीतरी वेळ डाॅक्टरांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहातच बसली होती. हतबलता काय असते याचा जवळून अनुभव घेत वैदेही तीथल्याच एका खुर्चीवर मटकन बसली. समोरच असलेल्या आयसीयूच्या बाहेरून दिसणाऱ्या काचेकडे ती शुन्यात नजर लाऊन बसली होती. अचानक काहीतरी व्हावं आणि भयानक अपघातातून तिचा मुलगा आणि तिचा नवरा वाचावा एवढीच तिच्या मनाची हाक होती.

दिवसांमागून दिवस जात होते. डाॅक्टरांचे प्रयत्न चालूच होते. आतापर्यंत सतत हाॅस्पीटलला येऊन नातेवाईकही आता कंटाळले होते, वैदेहीला सासू-सासरे नव्हते आणि बरेच नातेवाईक येऊन भेटून जात होते पण आपलं म्हणावं असं कोणी नव्हतं. वैदेहीचे आईवडील होते, त्यांनी तीला बराच आधारही दिला होता पण शेवटी त्यांनाही त्यांची कामं होतीच की, असं कीती दिवस ते तीला सोबत करणार होते म्हणून स्वतः वैदेहीनेच त्यांना जायला सांगितलं. आता सगळे खटाटोप ती स्वतः च करत होती शेवटी लोकांची मदत तीला कीती दिवस पुरणार होती?……

सोबतीला कोणी नसूनही एक आई आणि एक बायको तिथे तग धरून होते. कोणा एकाचंही दु:ख तीला सहन होणारं नव्हतं. तिने अजूनही आशा सोडली नव्हती.

  • एव्हाना पंधरा-सोळा दिवसात तिला हाॅस्पीटलमधलं आणि त्या बाहेरचंही बरंच काही माहित झालं होतं. ती संध्याकाळी थोड्या वेळासाठी हवापालट करायला हाॅस्पीटलच्या बाहेर यायची.

तिथे जवळच बरीच बैठी घरं होती अाजूबाजूला बरीच झाडं असल्याने तिथे तिचं मन प्रसन्न व्हायचं. समोरच बसायलाही जागा असल्याने वैदेही तिथपर्यंत जात काही वेळ त्या जागी बसायची.

तीचं मन तर भरलेलंच होतं पण आता रोज -रोज रडूनही काय होणार आणि तीच स्वत: खचली तर तीच्या नव-याला आणि मुलाला कोण बघणार म्हणत ती रोजच्या ह्या लढाईला लढण्यास सज्ज व्हायची.

वैदेही तीच्या भावनांमधे गुंतली होती. तितक्यात अगदीच कर्कश्य आवाजात परत ‘तेच’ सगळं सुरू झालं……

“कशाला जनमलास रं तू ,….. मरत का न्हाईस ? आईबापाला खाल्लंस अन् हितं येऊन मामालाबी गिळलास अपशकूनी कुठला” म्हणत, समोरच्या एका बैठे घरातून ती बाई रोज त्या मुलाला मारायची. मुलगा साधारण आठ वर्षाचा होता.

आतापर्यंत तिथल्या लोकांच्या बोलण्यातून वैदेहीला इतकं समजलं होतं की, ती बाई त्या मुलाची मामी आहे आणि त्या मुलाला सगळे किश्या म्हणत होते.

ह्या सात-आठ दिवसात जवळजवळ वैदेही हाच प्रकार रोज पहात होती. त्या मुलाला त्याची मामी शिव्या घालत रोज मारायची आणि ते आठ वर्षाचं निरागस लेकरू , मार खात रोज बाहेर येऊन हमसाहमशी रडायचं.

क्रमशः

टिप:- ही कथा याआधी मी शंभर शब्दातही लिहिली आहे आणि आता त्याच कथेला सविस्तर मांडत आहे याची कृपया नोंद घ्यावी.

©Sunita Choudhari.

आपलं नातं कधी, कुठे, कोणाशी आणि कसं जुळेल कोणीच सांगू शकत नाही ?… किश्या आणि वैदेहीचं असंच काहीसं झालं असावं का? नक्की वाचा आपल्या पुढील भागात. कथा आवडल्यास लाईक, शेअर , कमेंट सोबत मला फाॅलो करायलाही अजिबात विसरू नका. धन्यवाद . 

 

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा