भाऊ

Written by

भाऊ छोटा असो वा मोठा

असतो काळजाचा तुकडा💗

चैन पडत नाही बहिणीला

पाहिल्या शिवाय त्याचा मुखडा

 

त्यातून छोटा असेल भाऊ तर

जरा जास्तच लाडका असतो🥰

नवीन काय आणलं त्याने की

पिंगा मागे पुढे घालत असतो

 

कसा दिसतो शर्ट म्हणून

दंगा नुसता घालतो😋

छान आहे म्हणाल्या शिवाय

शर्ट च घालत नाय

 

मागे पुढे घालत राहतो

नुसतीच रुंजी 🤗

पैलवान म्हणून चिडवायची

सोडत नाही संधी

 

मोठा झालास राजा आता

किती ही सांगा🙃

माझ्या साठी कधी घेतो

पप्पांशी पंगा

 

तू असाच हसत रहा

एवढी च इच्छा

उदंड आयुष्य लाभो तुला

हीच आज प्रार्थना

 

http://www.swaminichougule08.ml

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा