भाड्याचं गर्भाशय

Written by

गीता गजानन गरुड.
आंब्रड.

#भाड्याचं_गर्भाशय

गंगी व तिचा नवरा दोघंजणं खूप कष्ट करायची.
गंगा सकाळी उठून स्वैंपाक,धुणीभांडी आवरुन आपल्या दोन लेकरांची तयारी करायची.
त्यांना शाळेत सोडून यायची.
सासूला काय हवं नको ते विचारून मग चार घरची धुणीभांडी करातयला जायची.
गंगीचा नवरा रमाकांत कचर्याचा गाडीवर कामाला होता.
थोड्या पैशांत ते कुटुंब सुखी होतं.
पण त्यांचं हे सुख नियतीला मान्य नव्हतं.

एकदा बाईकवरुन फेरफटका मारत असताना,पाठून येणारा ट्रक त्याच्या बाईकला ठोकर देतो.
बाईक एका साईडला पडते.
तर दोन तीन गोलांट्या खाऊन रमाकांत रस्त्याच्या कडेला पडतो.
आजुबाजूची लोकं गोळा होतात.
काही सुजाण नागरिक त्याला इस्पितळात भरती करतात
गंगी धावतपळत जाते.
पण अवघ्या दोन तासात होत्याचं नव्हतं होतं.
गंगीला याचा तीव्र धक्का बसतो.
तिचा भाऊ,वहिनी महिनाभर राहून जातात.
आत्ता गंगीला रडत राहून चालणार नसतं.
ती अजून दोन घरची कामं अंगावर घेते.
पण घरभाडं,मूलांच्या शाळेची फी,इतर खर्च यामुळे तिला अधिकाधिक पैशांची गरज असते.

शाळेच्या बाई एक दिवस गंगीला शाळेत बोलावतात.
गंगी घाबरत घाबरत शाळेत जाते.
तिला बाई सांगतात की तिची दोन्ही मुलं फार गोड व हुशार आहेत.
गंगी एकदा कपडे धुत असताना तिचा हात बादलीतल्या पाण्यात व तिची तंद्री कुठे दुसरीकडेचं लागलेली असते.
रिना आंटीच्या ते लक्षात येतं.
रिना आंटी तिला म्हणते,”आज कपडे राहू देत.तु जरा बाहेर ये बघू.”
रिना आंटी तिला चहाची पात,आलं घालून कडक चहा करुन देते.
गंगीला चहा पिऊन जरा तरतरी येते.

मग रिना आंटी तिला विचारते,”काय अडचण असेल तर मला सांग.मी सोडवण्याचा प्रयत्न करते.मी तुला एवढ्या टेंशनमध्ये कधी बघितलं नाही.”
गंगी तिला तिची आर्थिक अडचण सांगते व म्हणते,”ताई मला या द्रारिद्रयातून बाहेर पडायचय.
माझ्या मुलांना खूप शिकवायचंय.
मोठे हाफिसर करायचय.
नुसती भांडीकुंडी करुन आजकालच्या पुढच्या शिक्षणाची
व कलासांची फी भरणं शक्य नाही.”

रिना आंटी तिला सांगते,”मी एका थर्ड पार्टी संस्थेची एजंट आहे.
या थर्ड पार्टी संस्थेत तुझ्यासारख्या परिस्थितीने गांजलेल्या स्त्रिया नावे नोंदवतात.त्या आपली गर्भाशयं भाड्याने देतात.म्हणजे ज्या स्त्रियांना गर्भाशय नसतं किंवा पूर्णतः विकसित झालेलं नसतं किंवा प्रजननसंस्थेशी निगडित इतर काही अडचण असल्याकारणाने ज्यांना बाळाला जन्म देता येत नसतं अशी जोडपी या संस्थेत नाव नोंदवतात.
मग ही संस्था त्यांना गर्भाशय भाड्याने देणास इच्छुक असणार्या स्त्रियांचे रेकॉर्ड्स दाखवते.
ह्या इच्छुक महिलांना सरोगेट मदर म्हणतात.

अशी सरोगेट मदर होण्यासाठी त्या महिलेचे वय पंचेसाळीसच्या आत असणे आवश्यक असते.नीटनेटकेपणा,साक्षरता हे गुणही बघतात.
तिच्या शरीराची इतर आवश्यक रक्त तपासणी, एड्स तपासणी करुन घेतात.
गंगी म्हणते,” या स्त्रियांना किती पैसे मिळतात
यातून?”

डॉ. आंटी तिला सांगतात की बाईचं बिजांड व नवर्याचे शुक्राणू यांचा प्रयोगशाळेत मिलाप करतात.
दोन तीनदा ट्राय केल्यावर गर्भ तयार होतो.
हा गर्भ सरोगेट मदरच्या गर्भपिशवीत सोडतात.या सरोगेट मदरला बाळ होइपर्यंत या संस्थेची सरोगसी सेंटर असतात म्हणजे काही रुम असतात, तिथे रहावं लागतं.

या कालावधीत सरोगेट मदरला लागण्यार्या सर्व वस्तू,औषधे,जेवण,रहाण्याची व्यवस्था याचा खर्च ज्यांनी तिचं गर्भाशय भाड्याने घेतलेलं असतं ते जोडपं करतं.
पैशाचं म्हंटलसं तर तीन ते चार लाख असा सध्या रेट आहे.
जर जुळं झालं तर पंधरा टक्के अधिक रक्कम सरोगेट मदरला मिळते.
जर सिझर झालं तर पन्नास हजार रूपये अधिक मिळतात.आपल्या महाराष्ट्रात परदेशातून लोक सरोगेट मदरच्या शोधात येतात कारण इथे इतर देशांच्या मानाने फी फार कमी आहे.तुझं नाव तिथे टाकू का ते विचार करुन सांग.”

गंगी तिला म्हणते,”आंटी मी चारपाच दिवसात तुम्हाला कळवते.”
मग गंगी घरी येते.सरोगसीचा विचार तिच्या डोक्यात घोळत असतो.
ती सासूला रात्री हे सगळं समजावून सांगते.
सासू तिला म्हणते,”गंगी,तुच आत्ता काय तो निर्णय घे.मी तुझ्या बाळाला तु येईपर्यंत वर्षभर सांभाळीन.मला तर यात काय पाप दिसत नाही.”
गंगुला विचार करायला आठवडा लागतोच.

गंगू रिना आंटीला तिचा होकार कळवते.
हिमेश चंदवानी व त्याची बायको हिरा गंगीचं रेकॉर्ड बघून आपल्या बाळासाठी निवडतात.
गंगीची सर्व तपासणी होते.
जवळजवळ महिन्यानंतर गंगीच्या गर्भपिशवीत चंदवानींचा गर्भ सोडला जातो.
आत्ता ती सेंटरमध्ये रहात असते.

तिची मुलं आजीबरोबर घरी.आजुबाजूची चौकशी करतात.
आजी त्यांना तिची सून बाहेरगावी कआमाला लागलेय म्हणून सांगते.
गंगीला तिथे चंदवानी कुटुंब हवं नको ते खायला आणून देत होतं.
सुकी फळं,सफरचंद,मोसंबी खाताना गंगीला तिच्या मुलांची आठवण येई.
चंदवानी तिच्या मुलांनाही लागेल त्या वस्तू पोचवतात.
तिच्या खात्यात हफ्त्या हफ्त्याने पैसे भरतात.
गंगीचं पोट हळूहळू वाढू लागतं.
तारा चंदवानी गंगीच्या पोटाला हात लावून बाळाची हालचाल अनुभवे.
तिला कोण आनंद होई.
इतकी वर्ष तिला समाजाने वांझ म्हणून तुच्छ लेखलेलं असतं.
आत्ता तिला हक्काचं बाळ मिळणार म्हणून कोण आनंद झालेला असतो.
नऊ महिने पुरे होतात नी गंगी एका गोंडस परीला जन्म देते.
तिला पान्ह्याला लावते.

हिमेश व तारा चंदवानी लेकीला डोळे भरुन बघतात.
तारा तर गंगीच्या पाया पडते.
पंधरा दिवसांनी गंगी घरी येते.
आत्ता तिला आधीच्या वर्षभरात काय झालं ते बिलकूल आठवायचं नसतं.
तीन लाख रुपये ती मुलांच्या शिक्षणासाठी पोस्टात ठेवते व उरलेल्या एक लाख रूपयात एक गाळा भाड्याने घेऊन माऊली पोळीभाजी सेंटर उभं करते.
तिच्यासारख्या गरजू स्त्रियांना ती रोजगार देते.

हळूहळू पापड,लोणची,राजगिरा लाडू अशा वस्तू बनवून दुकानात विकायला ठेवते.
मुलंही आत्ता मोठी होऊ लागतात.
त्यांना त्यांच्या आईच्या कष्टाची पुरती जाणीव असते.
गंगीची सासू मरेपर्यंत गंगीच्या पाठीशी सावलीसारखी उभी रहाते.

या सरोगसीने गंगीच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते.
लालवानी कुटुंबाला गोड छोकरी मिळते.

पण मंडळी आजकाल या सरोगसीचा तरुणवर्ग गैरवापर करु लागला आहे.
करिअरच्या नावाखाली,तसेच फिगर खराब होऊ नये म्हणून तरुण जोडपी सरोगसी या पर्यायाकडे बघत आहेत.
हा विज्ञानाचा दुरुपयोगच म्हणावा लागेल.
एजंट लोक्स,थर्ड पार्टी एजंन्सीज यात फार काळा बाजार करतात.
स्वतः जास्तीत जास्त नफा कमवतात व सरोगसी मातांना नाममात्र किंमत देतात.
ज्या मुलींची प्रजननसंस्था,गर्भाशय अगदी निरोगी आहे त्यांनी स्वतः चं बाळचं जन्माला घालावं.
नऊ महिने हळूहळू बाळ पोटात कसं वाढतं ते मात्रुसुख अनुभवावं.
या नऊ महिन्यात बाळाचं व आईचं एक बाँडींग तयार होत असतं.
तो अनुभव कागदाच्या नोटांनी विकत घेता येईल का??..💐💐

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा