भित्यापाठी ब्रम्हराक्षस# शितल ठोंबरे……

Written by

भित्यापाठी ब्रम्हराक्षस#

शितल ठोंबरे……

राजापूर नावाच एक छोटंस खेडं. या खेड्यात रामा आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता.आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरी त्याच कुटुंब खाऊनपिऊन सुखी होतं.शेती हा मुख्य व्यवसाय त्यामुळे दारात एक बैलजोडी उभी.दोन्ही मूलं शाळेत जात होती.एकंदरीत सर्व काही व्यवस्थित चालू होतं.

एके दिवशी रामाच्या गावात एक सिद्धपुरुष वास्तव्यास आले.ते म्हणे फक्त चेहरा बघून माणसाचं भविष्य सांगतायत.ही बातमी वारयासारखी गावात पसरली.मग काय आपल भविष्य जाणुन घ्यायला गावकरयांची गर्दी उसळली.एक दिवस रामालाही वाटलं आपणही आपलं भविष्य जाणुन घ्यायला काय हरकत आहे.झाल तरं दुसरयाच दिवशी रामा सिद्धपुरुष जिथे वास्तव्यास होते त्या ठिकाणी पोहचला.एक एक गावकरी सिद्धपुरुषा समोर उभा राही आणि सिद्धपुरुष दोन क्षण डोळे बंद करून काही मंत्र पुटपुटत.डोळे उघडताच गावकरयाला त्याच भविष्य सांगे.गावकरी आपल भविष्य ऐकून खुश होई व सिद्धपुरुषाला दान देऊन निघून जाई.

आता रामाचा नंबर आला.तो हळूच सिद्धपुरुषा समोर उभा राहिला.ध्यानस्थ त्यांची मूर्ती फारच प्रसन्न दिसत होती.त्यानी डोळे उघडले आणि रामाकडे पाहून काळजीच्या सुरात म्हणाले,”काळजी घे वत्सा बैलापासून तुझ्या जीवाला धोका आहे तुझा मृत्यु बैला मुळे होईल हे निश्चीत आहे.”आपल भविष्य ऐकून रामा च्या पायाखालची जमीनच सरकली.त्याला पश्चाताप झाला का आपण इथे आलो पण आता वेळ निघून गेली होती आणि जे कानावर यायच होतं ते आलं होतं.

हताश होऊन तो घरी आला.त्याच्या पत्नीने त्याला त्याच भविष्य विचारल पण रामाने एक अवाक्षर ही तिला सांगितल नाही.पण त्यादिवसा पासून रामाने घरातून बाहेर जाणं बंद केल.आपली लाडकी बैलजोडी त्याने पत्नीला सांगून शेतावर नेऊन ठेवली. घरातून बाहेर पडलो आणि समोर बैल आला तर ,नाही नाही मला मरायचं नाही असं म्हणत त्याने स्वताला घरात कोंडून घेतलं.आपण आता सुरक्षित आहोत याची त्याला खात्री झाली.

पुढच्याच महिन्यात बेंदराचा सण होता.गावात सगळीकडे त्याचीच धामधूम सुरू होती.पण रामा मात्र मृत्यु च्या भितीने चार भिंतीत बंदिस्त होता.अखेर बेंदराचा दिवस उजाडला.सगळीकडे बैलांची पूजा सुरु होती. स्त्रिया त्याना नैवेद्य देत होत्या कोणी त्याना ओवळत होत.रामाच घर मात्र शांत होत.पत्नी मूलांना घेऊन बैलांना पुजण्यास शेतावर निघून गेली.इकडे रामा घरात एकटाच होता.संध्याकाळी गावात बैलांची शर्यत सुरु झाली.इतका वेळ स्वताला सुरक्षित समजणारया रामाच ह्रदय जोरजोरात धडधडायला लागल.शर्यतीतला एखादा बैल जर आपल्या घराच्या दिशेने आला आणि घरात घुसला तर बापरे!रामाने धावतच घराचा माळा गाठला.बैल आला तरी आपण इथे सुखरुप आहोत तो स्वतालाच समजावत होता.

माळ्यावर चढून त्याने सुटकेचा निःश्वास सोडला.त्याच लक्ष समोरच्या लाकडी फळीवर गेलं.त्याच्या मुलांनी बेंदरा साठी मातीचे बैल बनवून त्या फळीवर ठेवले होते.ते बैल पाहून रामा ला दरदरून घाम फुटला,हात पाय थंड पडले, घशाला कोरड पडली.आपल्या शरीरातून कोणी आपले प्राण काढून घेतय असा भास त्याला झाला.हात पाय हलवून ही आपली हालचाल होत नाही याची जाणीव त्याला झाली……. साक्षात त्याचा मृत्यु त्याच्या समोर उभा होता.

दुसरया दिवशी रामाच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमा झाली.रामाची पत्नी आणि मूलं धाय मोकलून रडत होती.डॉक्टरांनी तपासून जाहीर केल ह्रदयविकाराच्या झटक्याने अकस्मात मृत्यु………..

(ही कथा माझ्या बालपणी माझ्या आजोबांनी आम्हा भावंडांना सांगितलेली कथा आहे.आज ते हयात नाहीत त्यांची आठवण म्हणून ही कथा माझ्या शब्दांत तुमच्या समोर मांडत आहे.
कथा आवडल्यास लाईक करा,शेयर करा पण लेखिकेच्या नावासहीत.)

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा