भीती

Written by

शेजारच्या वस्तीतल्या कोंबडयाच्या आरवण्याने तारा ला पाहत झाल्याची चाहूल लागली, आता काम थांबवायला हवे, तिला स्वतःचेच नवल वाटले, लॅपटॉप बंद करून, बाजूला असेलेले दोन तीन मग तिने उचलले, बाप रे, हे सुद्धा डेंजरच कि, म्हणून आपल्याला झोप येत नसावी, लाईट बंद केल्यावर, झालेला काळोख तिला सुखावह वाटला, खरंच होतं , तिला दिवसापेक्षा रात्र चं बरी वाटायची, सगळीकडे शांतता, सकाळी धावपळीत असलेलं हे शहर रात्री जेव्हा आराम करायचं तेव्हा अधिक सुदंर दिसायचं, तारा च काम म्हणजे , लोकांना माहित नसलेल्या आड वाटांमध्ये फिरायचं, त्यांची माहिती घ्यायची, व्हिडीओज बनवायचे, ब्लॉग्ज लिहायचे, आताशा तिला बरीच प्रसिद्धी मिळायला लागली होती, थोडक्यात ती सेलिब्रिटी बनण्याच्या वाटेवर होती, आता तुम्ही म्हणालं कि यात थोडी पाहिजे तेवढा पैसा मिळतो? पण …. पण तारा ला तशी काही गरज नव्हतीच, एका गडगंज बापाची ती एकुलती एक मुलगी होती, बाबांचा बिझनेस अधून मधून बघत होती, तिच्या वडिलांनी सगळं सेट केलं होतं तिच्यासाठी, कमी होती ती फक्त आई ची, पण तारा भावनिक मुलगी नव्हती, तिला आई आठवत होती, तिच्या पुसटशा आठवणी देखील पण आई गेली ना, मग आता रडण्यात काही अर्थ नाही, आई ला जायची गरजच काय होती? तिला कुठे काळजी होती माझी? असती तर ती गेलीच नसती, हा विचार तारा चा होता, वडिलांनी तिला फार वेळा समजावलं पण तारा हि प्रॅक्टिकल मुलगी होती, बंधन, वगैरे तिला आवडायचं नाही म्हणून वडिलांपासून वेगळी एकटी राहायची, पण रोज वडिलांना भेटल्याशिवाय तिचा एकही दिवस जायचा नाही, कधी कधी तत्यांच्या जवळचं राहायची , पण चुकून त्यांनी लग्नाचा विषय काढलाच तर स्वतःच्या घरी परत, अशी तारा, घर तिला हवं तसं सजवलं होतं तिने, प्रत्येक ठिकाणी गेल्यावर जे काही नवीन मिळेल ते घरी घेऊन यायची, त्याला विशिष्ट पद्धतीने आणखी वेगळं रूप देऊन घरात सजवून ठेवायची, तारा ला सगळ्यात जास्त तिटकारा होता तो भीती या शब्दाचा, तिला भीती हा शब्दचं माहित नव्हता , घाबरट लोकांचा तारा ला प्रचंड राग यायचा, त्याला कारण हि तसंच होत, तिने कधी भीतीचा अनुभव घेतला नव्हता, म्हनजे तिला कधी अनुभव आला नव्हता.
विचार करताकरता तारा चा डोळा लागला, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिला निघायचं होतं , एका महत्वाच्या ठिकाणी, सगळ्यांनी सांगून झालं होता कि तिकडे जाणं धोक्याचं आहे, तिकडे जाणारा परत येतोच असं नाही, आणि आला तरी तो नीट येईल असं नाही, हे ऐकल्या वर तर तारा च मत पक्कं झालं कि जाऊन बघायचंच, काय होतंय ते? तारा झोपेच्या आधीं झाली.. उद्या निघायचा दिवस होता…..

#क्रमश:

#पियू

Article Categories:
भयपट

Comments are closed.