भुकेला मी राहत नाही

Written by

 

आकाशातील ताऱ्यांमध्ये
लपलेली माझी आई,
माझ्या अस्तित्वाचे राखण
करण्यासाठी जगावे लागेल ना.

तूझ्या मायेची गं उब
तुझ्या ममतेचा तो स्पर्श
आठवणींची साठवण,
देई अश्रूंना गं वाट

नको बाळगू माझी तमा
समर्थ आहे लाडू तुझा,
लढ्यात या जगण्याच्या
भुकेला मी राहत नाही.

©®डॉ सुजाता कुटे

Article Categories:
कविता

Comments are closed.