भूकेच्या यातना

Written by

नेहमीच शाळेत येणारा, कितीही ऊन, पाऊस, थंडी काहीही असो पण गैरहजर नसणारा शाम आज मात्र शाळेत असला नाही.
या गोष्टीने आमच्या शाळेचे पाटील सर मात्र खूप अस्वस्थ झाले.
शामच्या घरची परिस्थिती खूप बिकट, अत्यन्त हलाखीची स्थिती. घरी अजून तिघे जण दोन बहिणी आणि एक भाऊ.
खाणारी पाच तोंड.
कमावलेलं पुरत नसे. आई विमल आणि बाबा सुरेश विटाभट्टीच्या कामाला जायचे काम मिळालं तर ठीक, नाहीतर उपाशी.पण मुलांना मात्र त्यांनी कधी कामाला या म्हणून म्हटलं नाही, की कधी जबरदस्ती सुध्दा केली नाही.
शाम सर्वात मोठा, त्याला खुप वाटायचं आपण सुद्धा आपल्या आईवडिलांना कामात मदत करावी, पण त्याच्या बाबाना वाटायचं आपण नाही शिकलो, त्याची शिक्षा आपण भोगत आहोतच, पण मुलांनी मात्र खूप खूप शिकावं. आणि मुलं सुद्धा खूप हुशार….शाम तर
खूपच हुशार. जणू काही बौद्धिक क्षमतेचा सागरच…कुठलीही गोष्ट लवकर आत्मसात करणारा.
एकपाठी…
श्यामची अभ्यासाबद्दलची तळमळ बघून पाटील सरांनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. त्यामुळेच की काय त्याचे आईवडील पण त्याला शाळेत पाठवायला तयार झाले.
स्कॉलरशिप च्या परीक्षेत सुद्धा श्याम जिल्ह्यातून पहिला आला, आईबाबांचा आनंद गगनात मावेना. त्याचा सत्कार सुद्धा झाला.
विमल आणि सुरेश याना खूप आनंद झाला. हा पोरगा नक्कीच आपलं नाव काढेल,आणि आपले दिवस नक्कीच पालटतील याच आशेने ते दुप्पट काम करू लागले. आताशा सुरेश खूप थकल्यासारखा वाटायचा, जास्त काम केल्यामुळे असेल म्हणून दुर्लक्ष करायचा.
शाम यावर्षी दहावीला होता, परीक्षा तोंडावर आलेली.खूप जोरात अभ्यास सुरू होता.सुरेश आणि विमला त्याला असं अभ्यासात रमलेला पाहून खूप खुश व्हायचे…
पण नियतीला कदाचित हे मान्य नसावं.
एकदा विताभट्टीवर विटा वाहून नेताना सुरेश चक्कर येऊन खाली पडला, लगेच दवाखान्यात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचार सुरू करण्याआधीच सुरेश ची जीवणज्योत मावळली होती.
विमला, शाम,आणि भी – भाऊ हा धक्का सहन नाही करू शकले.
विमला…श्यामची आई श्याम कडे पाहून स्वतःला सवरायचा प्रयत्न करायची.
श्याम आईचे दुःख बघू शकत नव्हता. आईने एकटीने काम करावं, आणि आपण मात्र आरामात बसून खावं, हे त्याच्या मनाला पटत नव्हतं…
आज मात्र त्याने निर्णय घेतला.
तो आज शाळेत न जाता, कामाच्या शोधात निघाला. बरंच फिरल्यानंतर त्याला एका हॉटेलात भांडी विसळण्याचं काम मिळालं.
तो खूप आनंदात होता. शाळेच्या वेळेवर घरून निघायच आणि शाळा सुटायच्या वेळवर घरी यायचं…अस आठ करून आठ दिवस झाले होते.
पण आता मात्र पाटील सर काळजीत पडले, श्याम आजारी तर नसेल, पुढ्यात8 महिन्यात त्याची बोर्डाची परीक्षा….
आज रविवार म्हणून पाटील सर त्याच्या घरी गेले, ” श्याम, अरे ये श्याम….
श्यामची आई बाहेर आली, गुरुजी तुम्ही, असे अचानक…काय झालं??
पाटील सर- अहो मी ठीक आहे, पण श्यामची तब्येत बरी नाही काय हो….
आठ दिवस झालेय तो शाळेत येत नाही.
विमला- गुरुजी श्याम तर रोजचं शाळेत जातो.आज पण आपलं दप्तर घेऊन गेलाय तो शाळेत..
पाटील सर-अस म्हणता, बरं बघतो मी….
विमला- गुरुजी तुम्ही तर म्हणालात तो आठ दिवस झालेत शाळेत नाहीं आला…
कुठं जात असेल हो माझं पोरं…😢
पाटील सर- तुम्ही काळजी नका करू , मी बघतो त्याला…
पाटील सर परत जायला निघाले, रस्त्यात त्यांचा एक मित्र मिळाला, दुसऱ्या शहरात तो नोकरीला होता, बरेच दिवसानी गावात आला, म्हणून दोघेही समोरील हॉटेलात चहा घेऊ आणि गप्पा पण होतील म्हणून बसले.
एवढयात जोरात खेकसण्याचा आवाज आला, ” काम कोण करणार, तुझा बाप, चल ऊठ आधी भांडी घास , मग पी चहा”…

तेवढयात त्यांचं लक्ष श्याम कडे गेलं, तो एक बेंचवर बसून चहा बिस्कीट खात होता.मालक ओरडले म्हणून तो घाबरला, आणि त्याच्या हातून कप खाली पडला….मालकाने एक शिवी हाणून जोरात त्याच्या पाठीत बुक्का मारला… “आज परत कप फोडला”…काम करता येत नाही, अन फुकटच खायला पाहिजे…नाही साहेब, यांच्यानंतर असं नाही होणार, तो गयावया करू लागला…
पाटील सर हे सर्व बघत होतें. ते उठून त्याच्याजवळ गेले, त्याला जवळ घेतलं. आणि मालकाला म्हटलं, “चूक तुमची आहे, इतक्या लहान मुलांना कामावर ठेवता,”हे कानुनन योग्य नाहीं… गुन्हा नोंदवावा लागेल तुमच्यावर…
श्याम- सर, नाही याची काहीच चूक नाही सर…. माफ करा त्यांना…, मीच मागे लागलो त्याच्या मला काम द्या म्हणून….
पाटील सर त्याला घरी घेऊन आले …श्याम बेटा हे बघ आता परीक्षा जवळ आलीय, अभ्यास कर….हे काम वगैरे नको.
श्याम- सर मला कळतंय, तुम्ही काय म्हणताय ते…
पण आईची दुर्दशा नाही पाहवत हो मला….बाबांना तर गमावून बसलोय आम्ही, पण आता आई मात्र हवीय …तिला नाही गमवायच…आणि तो रडू लागला…
सर मरणाच्या यात्रा तरी बऱ्या ———————––————हो….😢एकदाच जाणवतात ———————————— पण भुकेच्या यातना खूप त्रासदायक असतात हो….सर हा माझा लहान भाऊ आहे, त्याला सध्या कळत नाही, खायला नाही मिळालं, भूक लागलीं की खुप रडतो…आईला नाही पाहवत त्याच रडणं….आमच्या समोर नाही पण एकांतात रडताना मी पाहिलंय तिला….
पाटील सर-आता तू थोडं माझं ऐकशील का?
श्याम- हो सर, पण यातलं आईला मात्र काही सांगू नका…
सर- नाही सांगणार बाळ… पण आता जोमाने अभ्यासाला लागायचं… आणि कामाचं म्हणशील तर, मी लावून देतो तुला कामाला, माझ्या भावाचं किराणा दुकानं आहे, तिथे तू अर्ध वेळ काम कर, म्हणजे अभ्यासाला पण वेळ मिळेल आणि, थोडे फार पैसे सुद्धा…
आता श्याम अभ्यासाला लागला….
परीक्षा आटोपली…
आता तो पुढील शिक्षण घेतोय पण स्वबळावर, घरीच टुशन्स घेऊन तो स्वतःचा खर्च काढतो…आईला आणि ल्हान बहीण भावाना सुद्धा तो शिकवतोय…
मित्रानो संकटांना खचून न जाता त्याला जिद्दी ने सामोरे जा…यश नक्किच मिळेल.
निकाल सुद्धा लागला, आणि तो तालुक्यातून प्रथम आला.

(पाटील सरासारखे चांगले शिक्षक आणि श्याम ची मेहनत , दोन्हीही महत्वाचे )
👆वरील कथा मी दिलेलं चित्र पाहून लिहलीय.
आवडल्यास आणि काही चुका आढळल्यास नक्की सांगा.😊
©️®️लता जुगल राठी
26-12-2019

Article Categories:
शिक्षण

Comments are closed.