भूमिका

Written by

“आता आवाज येतोय ना नीट ? ओरडून ओरडून बसलेला ”

“हो येतोय,काहीच प्रॉब्लेम नाही”

“हा ते वाक्क्य बोलेल ना, तिथे मग मी ‘अच्छा’ म्हणेन आणि पुढचं वाक्क्य घेईन,असं चालेल ना ?”

“हा,असच पाहिजे,काही नाही ग निवांत कर,बिनधास्त कर,होतंय सगळं नीट”

“ए ऐक ना,इथं बोलत नका बसू,आपल्या आधीची संपेल आता,५ मिनटात आहे आपली,

सगळं नेपत्थ्य आलंय ? घरातलं,स्टुडिओतलं ?”

“हो,आलंय”

“ओके,प्रत्त्येकानं आपापली प्रॉपर्टी बघा आपल्यासोबत आहे का ते,ठीके ? चान्गलीच होणारे आपली,मस्त प्रॅक्टिस झालंय सगळ्यांचं ! ऑल द बेस्ट सगळ्यांना !”

“थँक यु”

आणि  जवळजवळ ४५ मिनिटाच्या धामधुमीनंन्तर  पडदा पडतो…जीवघेणी शांतता…

या पडद्यासोबत संपतात त्या अनेक गोष्टी,मागच्या काही आठवड्यापूर्वी अनोळखी असणारे आणि आता एकाच  कुटुंबाचा भाग झालेले चेहरे,ती नवीन ओळख,नंतर झालेली मैत्री,त्या भन्नाट रिहर्सल्स, चेष्टामस्करी

आणि त्यावरून ऐकून घेतलेल्या अनेक गोष्टी ,

काहीवेळा झालेली ‘खरीखुरी’ वादावादी, रिहर्सल्सच्या  ब्रेकमध्ये ‘घशाला चांगलं नसत’ असं म्हणत म्हणतच खाल्लेले ते ‘तेलकट’ वडापाव !

आणि मग स्पर्धा अगदी जवळ येऊन ठेपल्यावर केलेली जीवतोड मेहनत,काही दिवसांपूर्वी खाजगी असलेले आणि आता अक्ख्या ग्रुपने मिळून मिसळून सोडवलेलेले प्रत्त्येकाचे ‘प्रॉब्लेम्स’….

हे सगळं त्या क्षणी गायब होतं आणि प्रत्त्येकाच्या आठवणीत जाऊन  ब स तं अगदी कायमचं  !!

 

झालेल्या परफॉर्मन्सवर पुढचे काही तास खरमरीत चर्चा होते,माझं कसं झालं ? तुझं कसं झालं ? माझा आवाज कसा आला ? तुझी एनर्जी किती लागली ? लाईट कुठे बरोबर पडला ? कुठे जरा लवकर आला ?music चा आवाज कुठे जास्त-कमी होता ? त्यातून आपला आवाज येत होता का ? पडदा थोडा लवकर दिला का ? शेवटी-शेवटी जरा घाईच झाली का ?

 

 

…..या सुंदर आठवणी आणि यासारखेच कित्त्येक प्रश्न घेऊन  त्यांची चर्चा करत आम्ही बाहेर पडतो त्या रंगमंचांवरून …

 

पुन्हा आपल्या ‘खऱ्याखुऱ्या ‘ एकांकिकेतल्या,’खऱ्याखुऱ्या ‘ भूमिकेमध्ये परत येण्यासाठी…

 

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा