“भेट”

Written by

भेट तुझी माझी
आता होईल का कधी??
दूर गेल्या देशी
साद घालशील का साधी??

मायेचा ग तुझा पदर
आता कधी मिळेल का??
मुका तुझ्या प्रेमाचा कधी
माझ्या गाली स्पर्शेल का??

केसांवरून फिरेल का
कधी हात तुझा मायेचा???
कुशीत तुझ्या शिरून
घेता येईल का गंध तुझ्या कायेचा??

खेळ तो लपाछपीचा परत
खेळता येईल का तुझ्या पदरात ??
पुन्हा आपल्या हसण्याचा
आवाज घुमेल का घरात???

तुज सांगू किती आज
मऊ मखमली आठवणी??
कसं सांगू , गुज ममतेचे या
मी साठवले ग मनी…

पिंजरा तो सोन्याचा
कधी सोडशील का तू???
मायेच्या जागी
कधी रमशील का तू??

दिप्ती…

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा