मकर सक्रांत

Written by

मकर संक्रांत

आपण 14 जानेवारी हा सण मकर संक्रांत म्हणून साजरा करतो. हा सण पौष महीण्यात येतो, या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात. कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.
संक्रांत म्हणजे एकीकडून दुसरीकडे मार्गक्रमण करणे. म्हणजेच प्रकाशाचा आधारावर
विजय.
संक्रांत म्हटले की आपल्याला आठवण येते ती गोड गोड तीळगुळाची, पतंगाची, गूळ पोळीची. या दिवशी सर्वजण एकमेकांना तीळगूळ देतात,व म्हणतात…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला,आमचे तीळ सांडवू नका, आमच्याशी भांडू नका.”किती छान आणि अर्थपूर्ण संदेश आहे हा.
सर्व महिलांचा तर हा आवडीचा सण आहे, त्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकवासाठी एकमेकांच्या घरी जातात, वाणांची ओटी भरून देवाण- घेवाण करतात. ओटी भरण्यामागे धार्मिक दृष्टिकोन सुद्धा आहे.
तीळ- गूळ याचाच अर्थ म्हणजे तिळातील प्रेम, आणि गुळातील गोडवा…. म्हणूनच आपण तिळगुळाचे वाटप करून “तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला” असे म्हणून करतो.
त्यामुळे भांडण, अबोला, द्वेष, वैर नाहीसे होऊन एकमेकांविषयी प्रेम भावना वाढते.
ह्या दिवशी मोठ्या माणसापासून लहानग्या चिमुकल्यापर्यंत सर्वच जण खूप हौसेने पतंग उडवतात. त्यामागचा उद्देश म्हणजे शरीराला मोकळी हवा मिळते.(जी आज खूप आवश्यक आहे) आणि त्याचप्रमाणे आपले ध्येय सुद्धा पतंगाप्रमाणे उंच असावे. आपले जीवनही उडणाऱ्या पतांगप्रमाणे आनंदी, विविध रंगानी नटलेले असावे. ह्या पतंगाचा दोरा जोपर्यंत आपल्या हातात असतो, तोपर्यंत पतंग बरोबर उडत राहतो. आपली दिशा ठरवत असतो. ….पण जेव्हा दोरा तुटतो, तेव्हा पतंग भटकतो. कधी झाडावर, कधी विहिरीत,तर कधी इलेक्ट्रिक तारांवर सुद्धा लटकतो.
अस वाटतं ना… ह्या पतंगाप्रमानेच आपले जीवन सुद्धा आहे. म्हणूनच जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत उच्च आकांक्षाचे ध्येय ठेवा. सर्वांशी प्रेमाने वागा, जीवन आनंदाने जगा…
इथे मला आवर्जून सांगावस वाटतं, आजचे युग हे संगणकीय युग आहे. ह्या संगणकीय युगात अनेक प्रकारचे आधुनिक गेम्स जे जीव सुद्धा घेतात… आहेत
घरी बसल्या बसल्याच रिमोट आणि मोबाईलवर मुलं गेम खेळतात ….पतंगाच महत्व त्यांना पटवून सांगा…मैदानी खेळाचं महत्व सांगा..निदान सणाच्या निमित्ताने तरी कळेल.
हा संदेशच जणू पतंग संक्रातीच्या निमित्ताने आपल्याला देत असावा.
हळदी कुंकवाच्या निमित्ताने सामाजिक एकता वाढून सर्व जातीय लोक एकत्र येऊन तिळगूळाच्या देवाण-घेवाण च्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेस पोषक वातावरण निर्माण होते.
पण….. (थोडं मुद्द्याला बाजूनं ठेवून लिहिते)
परंतु आज हा सण केवळ नावापुरताच राहिलेला आहे. कारण आजचे युग हे धावपळीचे युग आहे. आपण आपल्या भारतीय संस्कृतीला विसरून पाश्चात्य संस्कृतीचे अनुसरण करत आहोत. भारतीय रितिरिवाजांना जेवढे पाहिजे तेवढे महत्व आपण देत नाही.
हळदी कुंकू स्त्रिया आजही करतात,पण वेळ वाचवा म्हणून की काय…सामूहिक हळदी कुंकवाचे fad आज वाढतच चालले आहे.(काळानुरूप बदल म्हणावा हा)
आणि त्यातही हळदी कुंकवाला महत्व न देता वाणालाच जास्त महत्व दिलं जात. वाण किती मोठं, आणि इतरांपेक्षा वेगळं ह्याकडेच कल जास्त असतो. बाजारातही ह्या दिवसात विविध प्रकारचे वाण दिसतात.
परत एकदा थोडं वेगळं विषयांतर……..
कुणाला पटेल, कदाचित कुणाला पटणारही नाही… पण माझं मत मी व्यक्त करतेय…
संक्रांतीच स्वरूप बदलत चाललंय ना…मग आजच्या दृष्टीने विचार करून थोडा सामाजिक बदल करूया..
जसे की….
ज्या स्त्रियांचे पती हयात नाहीत (विधवा हा शब्द नाही वापरणार) त्यांना हळदी कुंकू आणि वाण का नाही द्यायचं? पत्नी मरण पावल्यानंतर पुरुष मनमोकळेपणाने समाजात वावरतो….त्याला कुठे जायचं, काय करायचं…शुभ प्रसंगातही पूर्णपणे सहभाग….!सगळीकडे स्वातंत्र्य….
मग आपण एक स्त्री असून सुद्धा तिला हळदी कुंकू नाकारतो…!
तीच्या भावना समजू नाहीं शकत…
तिलाही बोलवा, सन्मान द्या, वाण द्या,हळदी कुंकू लावा…
बऱ्याच ठिकाणी हा बदल होतोय, आणि आवश्यकता पण आहे…पूर्णतः बदल होण्याची.
वाणाच्या बाबतीत सुद्धा आपण बरेच बदल करू शकतो. छोटे छोटे प्लास्टिक चे कटोरे, वाट्या, रुमाल , नॅपकिन्स यापेक्षा पैसे जमा करून एका गरीब विद्यार्थ्यांची निदान वर्षभराची तरी जबाबदारी आपण घेऊ शकतो.
कितीतरी गरीब पण हुशार मुलं असतात,अभ्यासाची चिकाटी असते, खेड्यापाड्यावरून पायी येणं जाणं करतात… त्याला एक सायलक घेऊन द्या…असे कितीतरी प्रसंग असतात, जे आपन करू शकतो…,(मी हे फक्त लिहीत नाहीं आहे…माझा तरी असा प्रयत्न असतोच ..आमच्या मारवाडी समाजात तेरा वस्तूच दान ब्राम्हणांना देतात, पण मी देत नाही..म्हटल्यापेक्षा एकाच गरीब आणि गरजू व्यक्तीला देते)….शेवटी तो ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न😊😊
शेवटी एकच सांगावंसं वाटतं, जसा सूर्य न थांबता,न थकता आपल्या तेजाने आपल्याला प्रकाश देत असतो,उष्णता देत असतो,त्या सुर्यप्रमाणेच आपणही आपला आळस झटकून नवीन वर्षात आपल्यातील द्वेष, मोह, लोभ,मत्सर काढून टाका आणि ज्याप्रमाणे संक्रातीपासुन अंधार कमी कमी होत जातो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अंधार काढून आपण प्रकाशमय जीवनाकडे वाटचाल करावी.
हाच संदेश मी आपणा सर्वांस संक्रांतीच्या निमित्ताने देऊ इच्छिते.💐💐🙏
©️®️ लता जुगल राठी
अर्जुनी/मोरगाव
गोंदिया
कसा वाटला हा नवीन बदल
आवडल्यास नक्कीच like, comment करून सांगा…
(कृपया शुद्धलेखनाच्या चुका माफ असाव्यात)
Share करा पण नावासह ही नम्र विनंती🙏🙏

Comments are closed.