मनस्ताप

Written by

काल एक मित्र भेटला,अगदी खुप दिवसांनी अचानक office ला जात असताना समोर दिसला, आणी मग काय कसा आहेस , काय चाललंय , इकड़े कसा काय, घरचे कसे आहेत ही सर्व चर्चा झाल्यावर सध्या job कसा चालु आहें अस विचारल्यावर नहमी सागळयांकड़न जे अपेक्षिप असत तेच उत्तर  “खुप pressure” आहे सध्या कामाचा…आजकाल खुप tension मधे असतो, office चे काम, नंतर रोज़च traffic, फ़मिली, मुलांचा शाळा ..आनी इतर बाहेरची छोटी छोटी कामे त्यामुळे स्वतः साठी वेळच नाही…सकाळ झाली की office ला जायची गड़बड़, दिवसभर office मधे काम आनी office मधुन परत घरी येताना traffic jam , कधी कधी तर रात्रीचे ९-१० वाजतात घरी जायला..मूल कधी कधी वाट बघुन झोपी जातात, कसबस जेवायच आनी परत सकाळी लवकर उठायच या विचाराने झोपुन जायच, असाच रोज़चा दिनक्रम चालु आहें…

त्याने मला विचारल “तुझ कस काय चालु आहें आजकाल?”  मी विचार केला आणी सांगीतल ” असच कहितरी” चालु आहे  माझ पण, तुझ्या पेक्षा जास्त काही वेगळ नाहीं….शेवटी दोघांना office ला late होईल अस सांगून परत निवांत नक्की भेटुया असे आश्वासन देवुन एकमेकांचा निरोप घेतला….

आज office मधे कमी काम असल्यामुळे थोडा निवांतच होतो…आणि असाच आजच्या मित्रा बरोबर झालेल्या गप्पाण बद्दल विचार करायला लागलो…मनात विचार केला की खरंच  हा काय मनस्ताप चालु आहे रोज़चा…targets, job, promotion, increment, growth,…. या सगळया चक्रयुव्हात आपण खुप आतमध्ये खेचले गेलो आहोत याची जाणीव झाली…आणी अगदी महाभारतात अभिमन्यु ची जशी परिस्थिति झाली होती तशिच कहितरी परिस्थिति माझी पण झाली होती..आजुबाजुला दिसत होते ते फ़क्त targets, increment, promotion आणी भयंकर असं competition… या चक्रव्यूहा मधुन मी माझ्या मित्रांना, बायकोला, मुलांना, आइ वड़िलाना आणी इतर जवळच्या व्यक्तिना शोधायचा प्रयत्न केला….पण कोणिही जवळपास दिसत नव्हत, थोड़ी अजुन दूरवर नज़र फिरवली तरी कोणिही दिसेना…..

आणी आता हे कळुन चूकल होत की आपन या युद्धात एकटेच खूप पुढ़े निघुन गेलो आहोत..रोज़ दिवस आणी रात्र  कितिही लढलो तरीहि रोज़च हे ” challenge” च्या स्वरुपात उभ रहनार  “काम” काहीही करुण संपतच नव्हत..बाहेर पड़ायचा मार्ग पण दिसत नव्हता..

आणी मग विचार केला हा सगळा रोज़चा खटाटोप कश्यासाठी चालु आहे, स्वतः  ची योग्यता सिद्ध करण्यासाठी?…  पण स्पर्धा कोणाबरोबर आहे माझी ?… पैश्यासाठी, अजुन किती पैशे कमावले तर मी जिंकनार होतो?.. सभोवताल च्या लोकनां मी किती मोठा झालों हे दाखवन्यासाठी, …पण कुणाला माझ्या मोठे पनाच काय करायच होत?… मुलांच future secure करण्यासाठी,  पण जे मूल तुम्हाला पुढ़े जावुन लग्न झाल्यावर तुमच्या स्वतः  च्या घरात सुद्धा रहायला देतील की नाहीं हे सुद्धा महित नाही…अजुन काय…

मोठ घर, मोठया गाड़ी मधुन फिरण्यसाठी?.. बायकोच्या आणी मूलांचया इच्च्छा पूर्ण करण्यासाठी, आइ बाबांसाठी ??

नक्की क़श्या साठी चालु होत हे सर्व…

आणी याच माझ्याच मना मधुन उत्तर आल ” होय” या वरिल सर्व गोष्टिंसाठी….

पण ज्या चक्रव्यू मधे मी स्वतः ला अगदी झोकुन धील होत तिथ तर मला जवळपास कोणिही दिसत नव्हते…पैश्यांचि ढाल माझ्या कड़े होती, जिद्दिचि तलवार पण होती बरोबर…पण माझे मित्र, माझी बायको आणी मुले, आइ बाबा हे तर कोनीच जवळ दिसत नव्हत….मग ही लढाई नक्की कशासाठी चालु होती….

कशासाठी चालु होता हा मनस्ताप?? …

अपेक्ष्या या “black hole” मधल्या गुरुत्वआकर्षन शक्ती प्रमाने असतात…जितक आपन या मधे खेचले जावु त्या तितक्या अजुन वाढतच जातात…अपेक्षांचा कधिही अंत होत नाही…कितिही पैसे कमवा , जशे जशे तुम्हीं जास्त पैसे कमवनार तसा तसा तुमचा ख़र्च वाढ़तच जानार अपेक्षा वाढ़त जानार…जगतिल सर्वात श्रिमंत मानुस देखिल अजुन जास्त कसे पैसे कमवु शकतो हाच विचार करत असतो…आणी किती लोकां बरोबर स्पर्धा करनार? गाव, तालुक़ा, जिल्हा, राज्य, देश आणी संपूर्ण जग आहें स्पर्धे मधे…कितिही मोठे झाला तरिही कोनीना कोनी तरी तुम्हाला मागे टाकनार हे नक्कीच…

आणी हे सर्व करताना एक दिवस असा येइल की आपण आयुष्यात मागे वळुन पहिलयावर असे वाटेल की आयुष्यात खुप काही छोटया छोटया गोष्टि करायच्या राहुनच गेल्या आहेत…बायकोला प्रेमाने दोन शब्द रोज बोलयचे राहुनच गेले….या सर्व गोष्टि मधे ती खंबीर पणे तुमच्या पाठीमागे उभि होती..पण तुम्ही तिच्या पेक्षा जास्तच वेग़ाने पुढ़े जात होता…तिला किती तरी वेळा आपन ignore केल होत…तिच्या अपेक्षा आपल्या पेक्षा  खुपच कमी होत्या , पण आपण आपल्या अपेक्षांचे वोझे तिच्यावर लादले होते…तिला तर फ़क्त आणी फ़क्त तुमचा थोड़ा वेळ हवा होता…..पण आपण रोज़च्या ” challenging” कामा मधे तिला तर विसरुनच गेलो होतो याची जाणीव होईल ..मूल कधी मोठी झाली हे पण नाही समजनार..त्यांच लहनपन पहायच राहुनच गेल असं वाटेल …मज्जा मस्ती आणी कितितरी अश्या लहान सहान गोष्टि करायच्या राहुनच गेल्या असं वाटेल…

काहीतरी मोठ स्वप्न पूर्ण करायाचा प्रयत्न करतना लहान स्वप्ने पूर्ण करायची राहुनच ग़ेली असे नक्की वाटेल….

थोडक्यात सांगायच म्हंजे वेळ असतना या कामाच्या चक्रव्यू मधुन बाहेर पड़ा आणी, बाहेर पड़ा म्हंजे अस नाहीं की काम सोडुन दया…काम हे रोज़च करायच आहें आणी काम केल तरच आपन अपले रोजचे व्यवहार करु शकतो..पण काम करत असतना त्या मधे इतके वाहुन न जाता आपल्या बायकोला, मुलांना, मित्रांना, आइ बाबाना वेळ देन तीतकच गरजेच आहे…पैसे खुप कमवा पण आणी योग्य वेळ असतना त्याचा उपभोग पण घ्या..मुलाचा फ़क्त शिक्षण कसे व्यवस्तिथ होईल याचा विचार करा आणी त्यांना आपल्या पायावर उभे राहुदया, आपन नाज़ुक परिस्थिथी मधे जे काही अनुभवल आहें त्यांना पण ते अनुभव येवू दया…

जे घड़याळाचे काटे सतत पुढ़े जात आहेत, प्रतेक सेकंदाला ला तुमचे वय वाढ़तच आहे आणी आयुष्य कमी होत आहे याची जाणिव असुदया…भविष्य चांगले करण्याच प्रयत्न करत असतना आज वर्तमान मधले क्षण पण आनंदाने जगा…

एकदा वेळ निघुन गेल्यावर “मनस्ताप करुण क़ाहिही फ़ायदा होनार नाही”

—-लेख आवडल्यास नक्की share करा आणि प्रतिक्रया कळवा—

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा