“मनाचा मनाशी झालेला संवाद”

Written by

©Pallavi
“मनाचा मनाशी झालेला संवाद”
नात्यांची गुंफण हि एक रेशमी धाग्या प्रमाणे असते,सगळी गुंफण एकसारखी असेलच असे नाही….पण माळ च ती!सुंदर भासते जेव्हा तिला सुंदर नजरेने पहिले जाते.
जगात अनेक प्रकारची माणसं आहेत प्रत्येकाची इच्छा आकांक्षा वेगळया, त्याप्रमाणे त्यांचे व्याप.सध्या आपण एकमेकांशी WhatsApp,social media,etc,यामुळे आहे तर touch मध्ये पण keypad पुरते मर्यादित, जवळ असूनही एकमेकांपासून कोसो दूर!वरवरच म्हणायला फक्त “जवळ”🙂
स्वतःच्या विश्वाभोवती फिरताना नाही म्हंटलं तरी सगळी नाती टिकवताना मनाची होणारी घालमेल,त्यापाठीमागचा आटापिटा कळून येत नाही आणि हल्ली तेवढे कळवून घ्यायचे इच्छा वजा प्रयत्न करून घ्यायचे पण नसतात.पण ती ओढ कायम असते.मग आपली वाटणारी नाती एका विशिष्ट काळानंतर निभावताना एक पुसटशी रेषा आखली जाते,एकमेकांप्रती आपुलकी धूसर हुन जाते,इतका कमकुवत असता का हे “नातं”🙄
आपली जुनी पिढी हे सर्व सहज जपताना दिसत होती,आजही आहेत,त्याप्रमाणे आपणही प्रयत्न करतो जपतो पण आपली आपुलकी मात्र मोजली जाते,(माप कसा आहे अजून माहित नाही).त्यापाठीमागचा प्रामाणिकपणा हल्ली मोजला जातो,प्रामाणिकपणा हा फक्त शब्द झालाय!आपलेपणाने कुणाची चौकशी जरी केली तर समोरच्याला त्यात काहीतरी दुसराच हेतू जाणवतो!मनात येत हे असा किती करायचं याचा माप हवं होतं,सगळे खुश राहिले असते😊
आयुष्य खूप लहान आहे,आपण आज आहे तर उद्या नाही.आपल्या माणसांच्यात दडलेला आपलेपणा आपणच परखावा आणि तेवढ्याच आपुलकीने तोच जवळून जपावा,जवळ ठेवावा.शेवटी जाताना सगळं इथेच तर ठेवायच आहे,उरणार आहेत त्या फक्त “आठवणी” मग त्या गोड कि कडू ते मात्र आपल्यावर आहे.
Love the life you live❤️live the life you love
जगा आणि जगु द्या नाही म्हणांर पण हे मात्र नक्की म्हणेन…
आपलेपणाने जपा या रेशीमबंधाना,
नात्यांची निरागसता जपा ,
मनमोकळेपणाने संवाद सदा,
आयुष्य खूप सोपं आणि आनंदी होऊन जाईल.❤️
Writeup©Pallavi.😊

Article Categories:
प्रेम

Comments are closed.