मनाच सौंदर्य हेच खरं सौंदर्य

Written by

 

प्रत्येकाकडे मनाचे तेज आणि सौंदर्य असते, दाखवून द्या जगाला तुम्ही कोण आहात.

मोहन आणि मीनल एक सुन्दर couple. दिसायला खूप सुंदर ,गोरे…..
त्यांची मुलगी मोना….नावाप्रमाणेच खूप गोड, दिसायला सावळी असली तरी, तिचे काळेभोर कुरळे केस,मोठाले डोळे,आणि तिच्या चेऱ्यावरच आत्मविश्वासाच
तेज पाहताक्षणीच नजरेत भरेल अस होत.
तरीपण नातेवाईक म्हणायचे,
तुम्ही दोघेही इतके गोरे, मग मोना कशी हो सावळी!
त्यावर मीनल तिची आई म्हणायची, अहो देवाने दोनच रंग दिलेय, एक गोरा आणि एक सावळा…. श्रीकृष्ण नव्हता का सावळा, तरी पण गोपिकाचा किटा आवडीचा…
तशीच माझी मोना लाखात एक आहे हो!👌
अहो, खर सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यात असतं…नुसतं गोऱ्या रंगावरून कुणाच्या गुणांची पारख नाही हो करता येत.
मोनाला या गोष्टीची कधीच खन्त वाटली नाहीं. ती आपल्या अभ्यासातच व्यस्त राहायची.
आता तिने नुकतंच आपली पदवीका पूर्ण केली, आणि एमपीएससी चा अभ्यास सुरू केला.मुळातच ती खूप हुशार,आपण नक्कीच यशस्वी होऊ, हा आत्मविश्वास होता तिच्यात.
अश्यातच तिच्यासाठी एक स्थळ सांगून आलं, तिला आताच लग्न नव्हतं करायचं, पण आईबाबांची इच्छा म्हणून ती तयार झाली.
मोहित दिसायला छान , उंच गोरा, राजबिंडा ….classone ऑफिसर होता तो.घरचे उच्चभ्रू प्रतिष्ठित. घरचा खूप मोठा बुसिनेस.
मोहित आणि त्याचे आईवडील मनाला बघायला त्यांच्या घरी आले. गप्पा गोष्टी, चहा, नाश्ता झाला, थोड्याच वेळात मोना फिक्कट गुलाबी रंगाची साडी, आणि हलकासा मेकअप करून आली, सर्वांना वसकून नमस्कार केला. तीच साधं रूप मोहित ला खूप आवडल, कुठेही दिखाऊपणा नव्हता.त्याला ती मनापासून आवडली.
पण……मोहित च्या आईला मात्र तिचा सावळा रंग थोडा खटकला, नंतर बघू म्हणून सांगितलं.आणि घरी परतले
मोहित म्हणाला, अग आई, रंगाचं काय घेऊन बसलीस गं, अग ती हुशार आहे, सर्वगुणसंपन्न आहे, हेच तर तीच खर सौंदर्य… मला साजेशी आहे.
पण आई ऐकायला तयारच नव्हती. मोहित ला माहीत होत आपली आई आपल्याच मनाच करेल, तिला आपल्या मुलाच्या इच्छेपेक्षा इतरांची चिंता होती.
तिच्या मैत्रिणीच्या सुना खूप सुंदर, होत्या..
————————————–
मोनाला नकार असला म्हणू न बिलकुल वाईट वाटलं नाही, ती परत जोमाने अभ्यासाला लागली. लोकसेवा आयोगाचा निकाल लागला. ती देशातून 12 व्या रँकवर होती. आसनी आता लवकरच ती classone ऑफिसर म्हणून दिल्ली ला जॉईन होणार होती.
————————————– इकडे मोहितच्या आईबाबांनी मोहितसाठी सुंदर, गोरी, मुलगी “मोहिनी” तीच नाव ,पाहून लग्न करून दिल. पण तीच शिक्षण मात्र जास्त नव्हतं . तरीही आईच्या आनंदासाठी मोहित तयार झाला.आता मोहितची आई खूप खुश होती, त्यांना मनासारखी सून जी मिळाली होती.
————————————-
दिल्लीला जॉईन होण्याआधी मोनाच्या मैत्रीणी आणि मोनाने एक पिकनिक प्लॅन aarange केला, ठरलेल्या दिवशी सर्व मैत्रिणी fourwheeler ने निघाल्या, सर्वच छान एन्जॉय करत होते, एवढ्यात एक मैत्रीण म्हणाली, अग गाडी थांबवा, बाहेर बघा किती छान दृश्य आहे, सुंदर हिरवीगार पहाडी, समोर छोटा तलाव, आणि रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाड, आणि पहाडावरून पडणारा पाण्याचा धबधबा… खूपच मनोहर दृश्य..आणि गाडी थांबवून फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरता असलं नाही, खूप फोटोस काढले, आता निघणार एवढयात समोरच थोड्या अंतरावर त्यांना गर्दी दिसली, ही कसली गर्दी म्हणुन त्या सर्वजणी बघायला गेल्या, त्यांना कळलं एक अपघात झाला आहे, पण मदत करण्यास कोणीच पुढे येईना,ट्रक ड्राइवर ट्रक घेऊन फरार झाला होता, कोणी आपल्या मोबाईल मध्ये चित्रीकरण करण्यात व्यस्त होते.बघ्यांची खूप गर्दी झाली होती, मोना ने गर्दीतून वाट काढत समोर गेली, ” हे काय!हे तर मोहितचे आई बाबा…दोघेही शुद्धीवर नव्हते, त्यांच्या डोक्याला खूप लागलं होतं,रक्त पण खूप निघत होत.
पोलीस कारवाई होईल म्हणून कोणी च पुढाकार घेईना, मोना ला त्याच्याबद्दल माहीत होतं. तिने लोकांच्या मदतीने दोघांना आपल्या गाडीत घेतलं, तिचे आईबाबा मोहन आणि मीनल ला फोन केला, सर्व सांगितलं,तुम्ही दवाखान्यात या, आणि हो मोहितला पण फोन करून कळवा…..
ती हॉस्पीटल ला पोहोचली तेव्हा, मोहन , मीनल मोहित सर्व आलेले होते, लगेच त्यांना ऍडमिट केलं, पूर्ण फॉर्मलिटीस complete केल्या….
खूप रक्त गेल्यामुळे मोहितच्या आईबाबांना तातडीने रक्ताची गरज होती, पण नेमकं त्याच दिवशी त्यांच्या ग्रुपच ब्लड available नव्हतं…..आणि कुणाचं रक्त सुद्धा match नव्हतं होत.
पण मोनाचा रक्तगट”ओ”पोसिटीव् असल्याने तिने आपलं रक्त देऊन त्यांचा जीव वाचवला.
चार,पाच तासाने दोघेही शुद्धीवर आले, मोहितने त्यांना सर्व सांगितलं. अहो आईबाबा आज, मोना मुळे तुम्ही आहात, खरच खूप मोठे उपकार आहेत तीचे आपल्यावर,….मोना dr ना भेटून येतच होती, तेव्हा तिने हे ऐकले,” अहो उपकार कसले, एक कर्तबगार महिला म्हणून माझं कर्तव्य होत ते….
तुम्ही बरे झालात ,यातच मला आनंद आहे.मोहितच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं.😢
खरंच किती गुणी मुलगी!आपण तिला आपल्या मोहित साठी नाकारलं, फक्त हिच्या सावळ्या रंगामुळे , पण त्याचा लवलेशही हिच्या चेहऱ्यावर नाही.कित्ती निर्मळ मन हीच, राग लोभ काहीच नाही,दुसऱ्यांना मदत करण्याची विवेक बुद्धी….खूप मनाचं तेज आहे हिच्याकडे..👌
आज त्यांना दवाखान्यातून सुट्टी होणार होती. मोहन , मीनल मोहित (फक्त मोहिणी नव्हती,तिच्या डेलिव्हरीसाठी ती माहेरी होती) तब्येतीमुळे ती येऊ शकली नाही. बाकी सर्वच हजर होते.दोन्ही परिवारमध्ये खूप जवळीकतेच नात तयार झसला होत. मोना आणि तिच्या आईवडीलानी त्यांना खूप मदत केली.
तरीही एक पशचातापाची खन्त मोहितच्या आईच्या मनात होतीच…..रक्ताचं नात नसून सुद्धा मोनाने आपलं रक्त देऊन एक नवीन नात निर्माण केलं . जरी ती त्या घरची सून नक्षी होऊ शकली,तरी आता दोन्ही परिवारामध्ये एक मैत्रीच नात निरमान झालं होतं…
बरेचदा आपण बाह्य सौंदर्य पाहतो,….पण मनाला सावळ्या रंगामुळे नापसंत केलं तरी ती नाराज नाही झाली, कारण तिला आपल्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास होता, तीच मनोबल मजबूत होत, त्याचबरोबर तीच आंतरिक सौंदर्य भरभरून होत.आणि आपल्या ह्याच गुनाणी तिने सर्वांची मनं जिंकली होती.
तिने दाखवून दिले की, आपल्या मनातील तेज, कर्तृत्व हेच आपलं खर सौंदर्य असत, ते जोपासल की, आपल्यासारखा भाग्यवान कोणी नाही.🙏

लता राठी

माझी कथा कशी वाटली नक्की कंमेंट करून सांगा… काही चुका, त्रुटी असल्यास आवर्जून सांगा. मी नक्कीच सुधारायचा प्रयत्न करीन.
तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच माझं प्रोत्साहन वाढवतात😌
आवडल्यास लाईक, कंमेंट्स करा …आणि हो ,मला follow करायला विसरू नका😌
माझी कथा तुम्ही माझ्या नावासकट share सुद्धा करू शकता 🙏

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा