मनात नसतांना

Written by

मनात नसतांना ©®: नीलिमा देशपांडे

मनात नसतांना कधीकधी
वाकड्या वळणांनीच

जावं लागतं अन

मनात नसतांना कधी कधी
नशिबालाही मानाव लागतं

मनात नसतांना कधी कधी
अपयशी

ठराव लागतं अन

मनात नसतांना कधी कधी
लादलेले

यशही स्वीकारावं लागतं

मनात नसतांना कधी कधी
दुसर्याना दुखवाव लागतंअन मनात नसतांना कधी कधी
स्वत:लाही

दुखवून घ्यावं लागतं

मनात नसतांना कधी कधी
इतरांना हसवाव लागतं अन मनात नसतांना कधी कधी
इतरांसाठी

स्वत: ही हसाव लागतं

Article Categories:
कविता

Comments are closed.