मराठी रंगभूमीदिन शुभेच्छा …!!

Written by

🔴मराठी रंगभूमीदिन…

५ नोंव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो.१८४३ साली मराठी रंगभूमीने पहिले नाटक सादर केले तेंव्हापासून ते आजपर्यत रंगभूमीवरील कला चालुच आहे.मनाचे ठाव घेणारे संवाद , मनमोहक वेशभुषा , जीव ओतुन सादर केलेली कला , त्यातील हुबेहूब ऊत्कट भाव … मराठी भाषेचे जपलेल सौंदर्य , रसिकांचा मिळणारा उदंड प्रतीसाद यामुळे मराठी रंगभूमी अजरामर झाली.अनेक कलाकार ऊदयास आले त्यांनी केवळ आपलच भल केल नाही तर मराठी भाषा ऐलतरावरुन सोनेरी काठावर सुरक्षितपणे पोहचवली.कलाकार समृद्ध झाला व मराठी रंगभूमीची पताका डौलाने सगळीकडे नाचु लागली.रंगभूमीच्या झालरी झंकारु लागल्या.. मराठी भाषेचा गौरव रंगभूमीच्या माध्यमांच्यामुळे होऊ लागला.

मराठी नाटके , मराठी भाषा , मराठी साहित्य यावर नितांत सुंदर प्रेम करा …या रंगभूमीवरील कलागुणांना प्रतीसाद द्या ..तरच मराठी भाषा तुमच्या आमच्या मनात गोड होईल..येणारा काळ रंगभूमीसाठी सोनेरी पहाट घेउन यावा हिच मराठी रंगभूमी दिनानिमित्य अभिलाषा व्यक्त करतो….

✍नामदेव पाटील.

प्रतिक्रिया व्यक्त करा