“मरावे परि किर्ती रुपे उरावे “

Written by

“मरावे परि , किर्ती रुपे उरावे ”

अशाच एका लहान खेडे गावात अभय च कुटुंब रहात होता. आई वडील साधे शेतकरी होते. आणि अभय शाळेत जायचा. शाळेतून घरी आल्यावर शेतात काम करायचा. अभ्यासात पण खुप हुशार होता. आणि नावाप्रमाणे च अभय होता. कोणतेही धाडसाचे काम करायला तो अजिबातच घाबरत नव्हता. देश भक्ती नसा नसात भिनली होती. देशासाठी काहितरी करायची खुप जबर इछा शक्ती होती त्याची. त्याला जर कोणी विचारले का मोठा झाल्यावर कोण होणार तर तो बोलायचा मी सैन्यात भरती होणार आणि देशासाठी काम करनार. लहानपणापासूनच तो खुप अभ्यास करत होता. त्या बरोबर नियमित व्यायाम पण करत होता. आज पर्यंत त्याच्या गावात कोणिही सैन्यात भरती झाले नव्हते. पण हा मात्र त्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत होता. शरीरयष्टी सुध्हा त्याने तशीच बनवली होती. आता सैन्यात प्रवेश परिक्षा देऊन तो पास झाला आणि भरती सुध्हा झाला होता. त्याचा गावात तो सैन्यात भरती होणारा पहिलाच मुलगा होता. त्यामूळे सगळ्यानाच त्याचा अभिमान होता. सगळेच त्याचे खुप कौतुक करत होते. पहिल्यांदा तो जेव्हा रजेवर आला तेव्हा गावच्या वेशिपासुनच त्याची मोठी मिरवणूक काढून त्याच स्वागत केले होते. सगळ्याना एकदम भारी कौतुक वाटत होते. आईवडिलां ची अभिमानाने छाती फुलून आली होती. सगळ्या फक्त त्याचाच चर्चा होत्या. तो ही सर्वाना आवडीने सगळ्या गोष्टी सांगत होता. लहान लहान मुलांना मनात देश भक्ती रुजवत होता. गावातली मुल देखील अभय कडून प्रेरणा मिळवत होती. कारगील युद्धातील विजयानंतर तर अजूनच सगळे कौतुक करत होते. आता अभय च लग्न झाले. बायको ही तितकीच देशभक्त होती. त्याना एक मुलगा देखील झाला होता. मुलाचा जन्म झाल्यावर 2 महिन्यांनी तो आला होता. आपल्या मुलाला बघुन खुप खुश झाला होता. 15 दिवसांची राजा त्याला मिळाली होती. परंतु 5 दिवसानी त्याची पुर्ण रजा cancle होउन त्याला ड्यूटी जॉईन करण्याची ऑर्डर मिळाली. सगळ्यांचा निरोप घेऊन आपल 2 महिन्याचं बाळ मनभरुंन बघुन तो परत जॉईन झाला. काश्मिर ला त्याची पोस्टिंग होती. त्या ठिकानी नेहमीच फ़ायरिंग होत असे. अन अशाच एका दिवशी देशाच संरक्षण करताना पाकिस्तान कडून झालेल्या गोळीबारात एक गोळी अभय ला लागुन अभय शहीद झाला होता. अभय च्या मागे त्याचे आईवडिल बायको आणि 2 महिन्याच त्याच बाळ राहिल होत. अभय ची बॉडी जेव्हा त्याच्या गावात आणली तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले होते. पूर्ण गाववार शोककळा पसरली होती. पुर्ण गावात शहीद अभय च्या नावाचा जयजयकार होत होता. साश्रुपूर्ण नयानांनी संपुर्ण गावाने अभय ला आज शेवटचा निरोप दिला होता. अभय आज शहीद झाला होता. या जगातुन निघुन गेला होता. पण मागे राहिल्या त्या त्याच्या आठवणी आणि त्याने गावात घडवलेली देश भक्ती. त्याचे विचार ,त्याने दिलेली प्रेरणा आज ही प्रत्येक घरा घरात दिसत होती. तो एक अभय शहीद झाला होता पण त्याने गावतील प्रत्येक घरात एक अभय निर्माण केला होता. त्याच्या विचारांनी प्रभावित प्रत्येक तरुण सैन्यात भरती झाला होता. इतकेच काय तर शहीद अभय ची वीर पत्नी देखील पुढे जाऊन सैन्यात भरती होते. त्या गावात अभयचा नावाचा मोठ स्मारक उभारतात. आज तो या जगात नसूनही किर्ती रुपाने आजही अस्तित्वात आहे.

खरच आजही आपल्यामध्ये असे कितितरी महान लोक आहेत जी शरीर रुपी आपल्यात नाहित पण त्यांचे महान कार्य,त्यांचे विचार आजही आपल्यात आहेत. राष्ट्र्पीता महात्मा गांधी ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, मदर तेरेसा आणि आपल्या साठी आपल्या देशासाठी शहीद झालेले अनेक वीर जवान आपल्या मध्ये नाहित पण त्यांचे महान कार्य आजहि ते असल्याची प्रचीती देत आहेत. त्यानी केलेले बहुमुल्य योगदान आपल्याला आजच्या जीवनात उपयोगी पडत आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्याला मिळालेल्या मनुष्य जन्माचा नक्किच काहितरी ऊद्देष ठेउन तो सफल केला पाहीजे. आपला मनुष्य जन्म सार्थकी लावला पाहीजे. जेणेकरून आपण या जगात नसले तरिही आपल्या येनारया पिढीला आपले कार्य, विचार, योगदान नक्किच उपयुक्त होईल आणि आपले नाव ही टिकून राहिल. म्हणूनच किती छान म्हटले आहे, “मरावे परि किर्ती रुपे उरावे”.

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा