मरावे परी किर्तीरूपे उरावे

Written by

 

“मरावे परी कीर्ती रुपी उरावे”
ह्या ओळी वाचून ना एकदम समर्थ रामदासांची आठवण झाली.शाळेत असताना एक अभ्यासाचा भाग म्हणून रोज आम्ही श्लोक म्हणत असू.
खरंच ह्या जगात कोणीच नशवर नाही, जन्म दिला आहे तर मृत्यू हा अटळच.
त्याला कोणीच टाळू शकत नाही.
हो….पण एक पर्याय मात्र आहे. आपण “अमर” मात्र होऊ शकतो.
प्रश्न पडलाय ना?
कसं!!
अहो, कितीतरी संत, महात्मे, संशोधक, वीर हुतात्मे….असे बरेच कर्तृत्ववान, महान नेते
जे आपल्या कर्तृत्वाने अमर होऊन गेलेत. आणि अमर होऊन गेलेत.
मेल्यानंतर 12 दिवस रडायचं, छान होता हो, खूप मदत करायचा, मनमिनाऊ होता….पण नंतर जैसे थे….
पण ज्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप थेट आपल्या हृदया पर्यंत सोडून ,ते आपल्या इतिहासाची साक्ष होतात….
अश्या कर्तृत्वान महिला, पुरुषांबद्दल तर आपण इतिहासात नेहमीच वाचतो, ग्रहण सुद्धा करतो, त्यांना नेहमीच मानाचा सॅल्युट👮
———————————-
“कृष्णा” हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा, लग्नाच्या तब्बल 12 वर्षानंतर झाला.
नावाप्रमाणेच खोडकर, एवढ्या लाडा-कौतुकात वाढला की बस….
शिक्षणाच्या नावावर बोंब, दिवसभर मस्त गावातल्या पोरांबरोबर फिरावं, गावभर हुंदडायच एवढंच त्याचं काम.
एक भारी वेड त्याला, सुपरमॅन बनण्याचं…..
एकदा तर त्याने कमालच केली,….
गावात लहान पोर,आणि माकड घेऊन डोंबारी खेळ दाखवायला आले, त्यांचं खेळ दाखवणं सुरू होतं. एक पेटलेला टायर, एका माणसाने धरला होता, आणि त्या tyre मधून एक दहा वर्षाचा मुलगा उडी मारून दुसऱ्या बाजूला जायचा.(त्यांना practice असते)…
पण कृष्णाला वाटलं, कित्ती सोपं , मी पण करू शकतो,(over confidence)….😢
मग काय?केलाच आम्ही (कृष्णा)प्रयत्न!
मग!!!
मग काय? कम्बरेच हाड मोडलं😩…..
तीन महिने अंथरुणावर😢
आई, बाबा खूप ओरडायची, नको रे बाबा असले खेळ करुस, आमचा जीव टांगणीला लागतो रे….
हो ग आई, आता नाहीं करणार असं, तुला वाईट वाटतं ना.
आता तो बरा झाला.
आता तो बरयापैकी शांत झाला होता.
असाच एकदा मित्रांबरोबर बाजूच्या शेतात गप्पा मारत असताना,”आग, आग, वाचवा-,वाचवा” ,असा आवाज आला.
सर्व आवाजाच्या दिशेने पळाले,
एका बिल्डींग मध्ये 5व्या मजल्यावर गॅस cylender चा स्फोट होऊन आग लागली होती. आगीमुळे घरातील वस्तूंनी पेट घेतला होता. सर्व लोकं घराच्या बाहेर निघाली, वाट मिळेल तिकडे धावत सुटली. कुणीतरी fire बिग्रेडला फोन केला, लगेच गाडी आली, लोकांचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू होते. …..
पण कृष्णा कधी पाचव्या मजल्यावर पोहोचला कळलंच नाहीं. त्याच्या हाती एक मोठी दोरी लागली, त्याने तीचे खिडकीच्या ग्रील ला एक टोक बांधून खाली सोडले, तिथून बरेच लोक खाली आले. तोपर्यंत जवान आलेच होते, त्यांची खूप मदत झाली.
कृष्णा आता स्वतः खाली उतरणारच तेवढ्यात, त्याला एका बाईचा आवाज आला,” अहो, माझ्या पोरीला वाचवा, ती बाई आतमध्ये जाणारच एवढ्यात कृष्णा ने तिला बाहेर खेचलं, आणि तो आत गेला, आणि धाडकन एक दार आगीने होरपडून खाली पडल.😢 कृष्णा ने जीवाची पर्वा न करता मुलीला कवेत घेतलं आणि उडी मारून बाहेर आला…..पण तोपर्यंत तो खूप भाजला होता. पण त्याच्यामुळेच तर बहुतेकांचा जीव सुद्धा वाचला होता.
त्याला दवाखान्यात नेल, तो 80 टक्के भाजला होता. वाच ण्याची शाश्वती खूपच कमी होती. आई बाबा रडत होते.
आणि इकडे टीव्ही वर बातम्या सुरू होत्या. सर्वजण त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होते.
त्याचे बाबा icu च्या खिडकीतून त्याच्याकडे बघत होते. त्याना आठवल्या तुकाराम महाराजांच्या दोन ओळी,”पुत्र व्हावा ऐसा गुंडा
त्याचा तिन्ही लोकी झेंडा”
आणि एकदम रडायला लागले, खरंच का हो माझा मुलगा गुंडा…..
नाही…नाही…..

इकडे कृष्णाचा जगण्यासाठी संघर्ष चालूच होता, वेदनेने तो तडफडत होता……
त्याने खिडकितन एक नजर आईबाबांकडे टाकेली, स्मित हास्य केलं,एक दिव्य तेज त्याच्या चेहऱ्यावर पसरलं……
आणि तो गेला कायमचाच ,पण
अनेकांचं आयुष्य वाचवून.
दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली,कृष्णा नावाच्या मुलाने आपल्या जीवावर खेळून 20 जणांचे जीव वाचवले.
त्याच्या गावात त्याचा पुतळा उभा करण्यात आला.
त्या चौकाला “कृष्णा चौक” म्हणून नाव देण्यात आलं….
तो “अमर” झाला, अनेकांचे जीव वाचवून, अनेकांच्या हृदयात….”मरावे परी किर्तीरूपे उरावे” या उक्तीसहित….🙏🙏
©️लता राठी
प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकडे राखीव
आवडल्यास नक्की like, comment करा….
मला follow करायला विसरू नका….आवडल्यास share नक्की करा🙏😊

 

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा