मरावे परी किर्ती रूपे उरावे

Written by

#मरावे परी किर्ती रूपे उरावे
@पूनम पिंगळे

अनुजा सकाळी उठली तिने समोर खिडकीकडे पाहिलं पण तिला सगळं काही धूसर धूसर दिसत होतं …ती खूप घाबरली.. जोरात ओरडली : आई ए आईssss अग लवकर ये ना …आई …. आणि ती जोर जोरात रडू लागली …
सकाळची घाईची वेळ होती सुलोचना खूप घाबरली ..ती एकीकडे चपात्या करत होती एकीकडे भाजी टाकत होती ..मधेच अरुण ओरडत होता …सुलू अग माझा बेल्ट कुठे ठेवलास तू? …माझा एक सॉक्स सापडत नाहीये …बाई आज मला टिफिन तर मिळेल ना वेळेत ..? की आज पण लेटच
तिची एकटीची खूपच तारांबळ होत असे सकाळी …त्यांची कामवाली सखूबाई खूपच म्हातारी होती …कमी पगारात काम करते आणि गरजू पण आहे ..म्हणून तिलाच कामावर ठेवलं होतं …ती नाही म्हटलं तरी 55-60 च्या आसपास होती …तशी शरीरकाठी खूप चांगली होती तिची …काम पण पटापट करायची …पण तिला सकाळी पहिला नाश्ता हवा असायचा…तो बनवून खाऊन मगच ती बाहेर पडायची कामासाठी …डायबेटीस असल्यामुळे तिला भूक आजिबात सहन होत नसे..सुलोचनाने खूप वेळा सांगितलं तिला …आग तू इथे आमच्याकडे नाश्ता कर ग पण लवकर येत जा …मला सकाळी मदत तरी होईल तुझी …पण तिला ते पटायच नाही ..
सखू बिचारी काय करणार एकुलता एक मुलगा होता तिला …तो 17 वर्षाचा असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते …त्यांनंतर पण खचून न जाता सखूने त्याला चांगलं शिक्षण दिल होत …त्यावेळी होत नसली तरी 6-7 घरची कपडे , भांडी ची काम करायची बिचारी ..त्यातून त्याला इंजिनिअर केलं तिने …तसा अभय पण खूप हुशार होता …त्याने कधीच कुठल्याच गोष्टींचा हट्ट तिच्याकडे केला नाही …आणि परिस्थितीची जाणीव ठेवून अगदी मनापासून त्याने अभ्यास केला. त्याच कॅम्पस सिलेक्शन झालं आणि एका चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली… त्याने सखुला सगळी काम सोडून आता घरी निवांत आराम कर अस सांगितलं …2च वर्ष हे सुख तिला घेता आल…ऑफिकमध्येच अनन्या त्याला भेटली…खूप श्रीमंत घरची एकुलती एक मुलगी होती ती …त्या कंपनीच्या मालकाची मुलगी …ती अभयच्या प्रेमात पडली …लगेच लग्न झालं …पण अभयला त्यांनी घरजावई करून घेतलं …
अभय सखुला माझ्या बरोबर त्या घरी चल अस खूप बोलला म्हणून सखू गेली …पण तिथे तिला नोकरांच्या खोलीत जागा दिली …खायला वेळेवर नाही …आणि खुपच वाईट वागणूक दिली जात होती …अभयला या गोष्टी कडे लक्ष द्यायला पण वेळ नव्हता …आता तो त्या कंपनीचा मालक झाला होता …तो तर महिना महिना सखुला भेटत पण नव्हता …हे असलं जगणं सखुला पटत नव्हतं..पण मुलाच्या सुखासाठी ती तिथे होती …एकदा 4 दिवसाच्या ऑफिस टूर वर तो गेला होता …घरी सखू तिच्या खोलीत झोपली होती …खूप खोकला येत होता तिला …अनन्याची आई तिथे आली …
काय हे कसल्या खोकलताय तुम्ही ? तुमच्यामुळे आमचे नोकर पण आजारी पडतील …जावा तुम्ही तुमच्याच घरी …आम्ही काय मुलाला आणि आईला सांभाळायचा ठेका नाही घेतलाय..कशी लाज वाटत नाही हो तुम्हाला अस मुलाच्या सासरी येऊन राहताना …
सखुला खूप वाईट वाटलं पण आपल्या मुलाच्या सुखापुढे हे सगळं तिला गौण वाटत होतं ..
सखू : ठीक आहे ताई ..तुम्ही चिडू नका ..मी जाते माझ्या घरी ..असपन हे घर माझं नाहीच आहे …चला निघते मी …तुम्ही नका चिडू उगाच…आता ती खूपच जास्त थकली होती …आजारामुळे अंगात त्राण नव्हतं तिच्या …पण त्याच अवस्थेत बिचारी तिथून घरी निघाली …घरापासून थोड्या अंतरावर जाताना चक्कर येऊन पडली …तिला सुलोचनाने पाहिलं…आणि डॉक्टरांकडे घेऊन गेली ..डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या ..पण सखूकडे पैसेच नव्हते …सगळे पैसे सुलोचनाने दिले आणि सखुला घरी नेऊन सोडलं..
सखू : अहो ताई माझ्यासारख्या अनोळख्या बाईवर इतका खर्च कशाला करायचा..मी काय कामाला येणार का तुमच्या
सुलोचना : अहो सगळ्या गोष्टी काय कामाला येण्यासाठी थोडीच ना करायच्या असतात ..मनाला खूप समाधान मिळत हो यात..तुमच्या घरी कोणीच नाही का?
सखू: मुलगा आहे पण तो त्याच्या विश्वात रमला आहे ..वेळ नाही त्याला माझ्यासाठी..
सुलोचना : मग तुमचं घर कस चालत ?
सखू : आता आजच आलीये घरी …आधी लोकांच्या घरची धूण भांडी करून जगले …आता काय परत तेच करेन..
सुलोचना : वाह खूप छान ..मी पण बाई शोधतच होते ..तुम्ही आमच्या घरच काम करणार का? मागच्याच गल्लीत गुलमोहर मध्ये B20 मध्ये राहते मी ..तुम्हाला जवळ पण पडेल ..पण आधी या आजारातून बऱ्या व्हा आणि या कामावर…
आता या गोष्टीला जवळपास एक वर्ष झालं होतं ..अभय परत आला पण नव्हता त्यांना बघायला ..
सखू फक्त सुलोचना कडेच काम करायची त्यांच्या मुलीला अनुजाला खूप जीव लावायची.घरात जी पण मदत करता येईल ती करत रहायची ..
अनुजा ओरडत असतानाच सखू आली …: काय ओ ताई ..अनुजा आज अशी का ओरडतीये?
सुलोचना : काय माहित काय झालंय तिला ? मी माझ्या कामात आहे कशी जाणार वर? त्यात हा अरुण ऑफिसला जाईपर्यंत मी कुठे मोकळी असते …
सखू : थांबा मीच येते बघून वरती….
सुलोचना : नको ग तू ते साहेबांचा डबा भर ना प्लिज ..ते सलाड जरा कट करून दे ..अरुण गेला ना ऑफीसला की आपण दोघी पण जाऊया वर..
सखू :अहो पण लेकरू खूप रडतय.. खाली पण आली नाही रडत .. मी येते ना जाऊन …
सुलोचना: रागात …सखू ती माझी मुलगी आहे…माझा पण जीव तुटतोय पण ..
सखू : बर ताई मी माझं काम करून मग जाते वर …तुम्ही नका टेन्शन घेऊ…सखूने भराभर डबा भरला ..सलाड चिरल ..ते पण डब्यात भरल …अरुणच्या बॅगमध्ये ठेवलं आणि तरातरा जीने चढून अनुजा कडे गेली…
अनुजा डोळे मोठे करत होती , चोळत होती आणि जोर जोरात रडत पण होती …हाताने चाचपडत बेडवरचा चष्मा शोधत होती..
सखूने तिला जवळ घेतलं ..तिचे पापे घेतले ..काय झालं सोन्याला आमच्या? का रडतियेस बाळ तू? आणि खाली का आली नाहीस आज ? सखूने बाजूला पडलेला चष्मा तिच्या डोळ्यावर लावला..अवघी 5 वर्षाचीपोर ही पण बिचारीला इतक्या मोठ्या भिंगाचा चष्मा .. काय पण बाई नशीब पोरीचं..अस मनातच सखू बोलूण गेली
अनुजा : आजी मला सगळं अस्पष्ट दिसत आहे …मला… मी पडेल की काय अशी भीती वाटत होती ..आणि त्या भीतीनेच खूप रडुपण येत होतं…आईला किती बोलवलं तरी आली नाही ती ..खूप वाईट आहे ती…तू बघ ना न बोलवता पण आलीस..
सखू : बाळा तुझ्या रडण्याचा सगळ्यात जास्त त्रास तिलाच झाला …पण तुझ्या पप्पांना सगळं हातात द्यावं लागतं ना …ते ऑफिसला जातात ना ..मग ती माऊली तर तिथे अडकली होती ..।तिनेच मला पाठवलं तुझ्याकडे..
अनुजा : हो का ग आजी …हम्म मग आई पण छान आणि तू पण छान
सखू : बर उठ बर आता तुला शाळेत जायचय ना ? सखूने तिला कडेवर घेतलं आणि बाथरूम मध्ये घेऊन गेली तिला ब्रश केला, आंघोळ घातली , मस्त कपडे घालून तयार केलं ..तिच्या डोळ्यांना चष्मा घातला ..
चलो आमच्या ताई आता तयार अस म्हणून सखूने अनुजाला चालायला सांगितले ..हे काय ती चुकीच्याच दिशेने चालू लागली..सखूने तिला पकडलं नाहीतर भिंतीवर डोकच आपटणार होत तिच …आता मात्र सखू घाबरली.तिने तिला उचललं आणि खाली घेऊन आली..तोपर्यंत अरुण ऑफिसला गेला होता..
सखू : बाईसाहेब पोरीला जणू काहीच दिसत नाहीये …
सुलोचना : आग चष्मा लाव ग तिला ..मग दिसेल
सखू : अहो ताई चष्मा लावलेला आहे बघा की तरीपण ती भिंतीवर आपटणार होती …चला ना आपण डॉक्टर कडे घेऊन जाऊ हिला …आता सुलोचना पण घाबरली होती …
सुलोचनाने पटापट सगळं आवरलं हॉस्पिटलमध्ये फोन करून डावरे डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली …डावरे डॉक्टरांकडे तिची ट्रीटमेंट चालू होती ..लहानपणा पासूनच अनुजाचे डोळे अपायी होते ..तिला नीट दिसत नव्हतं …म्हणून तिला चष्मा लावला जात होता …ड्रॉप्स होतेच …तिच्या डोळ्याचे रेटिना नीट काम करत नव्हते जर कोणी डोनर भेटलं तर ऑपरेशन करू अस ठरलं होतं …पण अस फ्री मध्ये डोनर मिळत नव्हते ..ऑपरेशन चे पैसे तर जमवले होते .आता डोनर ची प्रतिक्षा होती …
दोघी अनुजाला घेऊन डॉक्टरांच्या केबिनमध्ये होत्या ..डॉक्टर बराच वेळ तपासत होते …सुलोचनाने तर आता जवळपास रडायलाच सुरुवात केली होती …सखू तिच्या पाठीवर आईच्या मायेने थोपटत होती ..होईल हो सगळं नीट नका करू काळजी ..
इतक्यात डॉक्टरांनी अनुजाला बेडवरच बसवलं आणि सुलोचना सांगितलं : मॅडम आता लगेच ऑपरेशन करावं लागेल …तिचे रेटिना पूर्णपणे खराब झालेत …आणि ते आतून पण damage करू शकतात …मग कदाचित डोनारचा पण उपयोग होणार नाही ..कालच एक डोनर येऊन गेलाय त्याला पैशाची खूप गरज आहे तो फक्त 3 लाख मागतोय
सुलोचना : अहो डॉक्टर नाही हो शक्य आम्हाला ..तरी मी करते प्रयत्न …उद्याच अनुजाचा वाढदिवस पण आहे …
सखू : बाहेर आल्यावर सुलोचना ला विचारत होती : हे डोनर पैसे का मागतो ? म्हणजे काय असत ते ?
सुलोचना : आग सगळेच पैसे मागतात अस नाही …पण काही गरजे अभावी मागतात ..कोणी स्वेच्छेने देतात.. मरणानंतर माझे डोळे दान केलेत असा फॉर्म भरून देतात …आणि ते डोळे काही ठराविक वेळेतच कामाला येतात …
सखू : मी पण भरते तो फॉर्म …मग माझे डोळे द्या अनुजाला ..मला काय करायचंय म्हातारीला.. डोळ्यांचं..,
सुलोचना : आग वेडे अस जिवंतपणी नाही देत कोणी डोळे …मिळतील ग तिला ..,तू नको टेन्शन घेऊस ..,चल आता जाऊ घरी आपण
सखू : दुसऱ्याच्या तरी कामाला येतील की माझे डोळे ..थांबा मी तो फॉर्म भरून निघते …सुलोचना ला तीच खूप कौतुक वाटत होतं ..बर भर बाई ..त्या काउंटर वर विचार जा …
सखूने फॉर्म भरलाच ..बराचवेळ ती त्या रिसेप्शनला काहीतरी विचारत होती ..चेहऱ्यावर कसलतरी समाधान घेऊन ती तिथून निघाली
.दुसऱ्या दिवशी अनुजाचा वाढदिवस होता ..आज अरूण ही घरीच होता ..अनुजाला काहीच दिसत नव्हतं ..,ती रडत होती …,चिडचिड करत होती ..अरुण तिला मांडीवर घेऊन बसला होता …केक कटिंग झालं ..सगळा कार्यक्रम मस्त पार पडला ..आणि अचानक सखू दिसेनाशी झाली …कुठे गेली ही ? एक 20 मिनिटांनी त्यांना फोन आला तो पण डॉ. डावरेंकडून …इतक्या रात्री तो फोन पाहून सुलोचना उगाच वेडी आशा लागली नक्कीच डोळे मिळाले असणार माझ्या अनुजाला
सुलोचना : डॉ:. बोला इतक्या रात्री कॉल ?
डॉक्टर : हो डोनर मिळाला …लगेच या हॉस्पिटलमध्ये
सुलोचना : आलेच ..म्हणजे येतोच आम्ही ..पण कोण आहे डोनर ?
डॉक्टर : ते आत्ता नाही सांगू शकत ..तुम्ही लवकर या .वेळ खूप कमी आहे
सुलोचना : का ? वेळ कमी कोणाकडे?
डॉक्टर : तुम्ही या हो ..मग बोलू
सुलोचनाने सगळं अरुणला सांगितले आणि ते ताबडतोब निघाले डॉक्टरांनी काही फॉर्मलिटीस पूर्ण करून लगेचच तीच ट्रान्सप्लांट केलं …ऑपरेशन व्यवस्थित झाल …
डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटर मधून बाहेर येताना या दोघांना पाहिलं आणि हसला …ऑपरेशन छान झालं आहे आपण 8 दिवसांत पट्टी काढू …दिसेल तिला …dont worry..आणि ते जाऊ लागले
सुलोचना : डॉक्टर थांबा …,कोणी दिले डोळे ? आणि कोणाकडे वेळ कमी ?
डॉक्टरांनी एका बेड कडे बोट दाखवलं …तुम्ही खूप नशीबवान आहात …तुम्हाला एक देवीचं भेटली अस म्हणा ..यातून हे पण समजत तुम्ही किती जीव लावला असेल हिला …
सुलोचना जरा घाबरतच बेडजवळ गेली ..तिला थोडा अंदाज आलाच होता …होय तो खरा होता …तिनेच दिले होते डोळे …
वाढदिवस झाल्याबरोबर सखू हॉस्पिटलमध्ये आली …तिथल्या बाथरूम मध्ये बसून स्वतःच्या हाताची नस तिने कापली …जेव्हा तिला खूप चक्कर यायला लागली तेव्हा हॉस्पिटल चा नंबर तिने डायल केला आणि मला तिला डोळे द्यायचे आहेत…मी तुमच्या वॉशरूम मध्ये आहे ..कुठल्याही क्षणी तिचा जीव जाऊ शकत होता ..तिने लगेचच तिच्या समोरच डॉक्टरांना सुलोचनाला फोन करायला लावला …डॉक्टरांनी तिला ओळखलं ..अहो तुमच्यावर उपचार होतील मी दुसऱ्या डॉक्टरांना बोलावतो..आणि ही पोलीस केस आहे मला डोळे नाही घेता येणार…
सुलोचना : अहो डॉक्टर कोणाला काय सांगायचं हे तुम्हाला चांगलं माहीत असत …काहीही करा पण माझी ही शेवटची इच्छा पूर्ण करा …
डॉक्टरांनी खूप विचार केला आणि काहीतरी विचार करून सुलोचनाला फोन केला..
सुलोचनाच्या समोर बेडवर सखूचा मृतदेह होता .. सुलोचनाने जोरात हंबरडा फोडला : अग कोण होतीस ग तू आमची? का अस केलंस ? माझ्या मुलीच्या डोळ्यात तू सदैव आमच्या सोबत राहशील आता …तुला कधीच विसरु नाही शकणार ग आम्ही ..इतक्यात अरुण तिच्या मागून आला त्याने सुलोचनाच्या खांद्यावर हात ठेवला …
अरुण : माफ कर ग मला . तू हिला घरी आणल मी नेहमी चिडायचो ग ..पण आज ही माऊलीने मला चुकीचं साबित केलं …,आता ही सदैव आपल्या सोबतच राहील …,
आज समजला मला त्या वाक्याचा अर्थ ,”मरावे परी कीर्ती रूपे उरावे!”

Article Categories:
Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा