मरावे परी कीर्ती रुपे उरावे

Written by

          “मरावे परी कीर्ती रुपे उरावे”

ही उक्ति कुणाची आहे हे सांगायला नको सर्वांनाच माहित असेल .. हो ना??
समर्थ रामदास

      मरण म्हटल की… अंगावर काही काटा यायचा राहत नाही…. हे झाल सामान्य माणसाच…
पण मरणाला न घाबरणारे होऊन गेले….परंतु ते गेले अस म्हणता येणार नाही कारण ते जरी शरीराने आपल्यात नसले तरी मनात मात्र कायम आहेत… ते म्हणजे “श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज”… व अनेक “संत“.. ते आपल्या महाराष्ट्राला लाभले… ते आपल भाग्यच म्हणाव लागेल… त्यांनी एक आदर्श दिला… ते अगदी अमर आहेत ते त्यांच्या कर्तृत्वाने…
मरावे परी कीर्ती रुपे उरावे ”
अगदी या उक्ति प्रमाणेच….
……………………………………….

     यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला होता, ‘सत्य काय?’ युधिष्ठिराने उत्तर दिले होते “मृत्यु’. उत्तर ऐकून यक्षाला समाधान वाटले. कारण जन्मलेला प्रत्येकजण कधी ना कधी मरणार असतो. मरण हेच सत्य.
ज्याला हे जगणं मरणाचे रहाडगाडगे समजले तो खरा विद्वान, तो त्याच्या आयुष्याचा समाजाच्या सेवेसाठी उपयोग करतो….
पण बरं का… आताच्या कलियुगात सुद्धा या ओळीप्रमाणे माणसे आहेत…
एक सुंदर पहाट.. रम्यमय सकाळ…ती पण अशी तशी नाही बर का ती होती दिवाळीची पहाट… सणाची.. आनंदाची… उत्साहाची… काहींची नव्या नात्याची… काहींची पहिली दिवाळी… अगदी जोमात चालू होती. सर्वजण मस्त तयार होऊन आले… शेजारीपाजारी त्यांचे नातेवाईक असे सर्व मिळून दिवाळी साजरी करत होते… लहान मुल काही खेळत होती तर् काही फटाके वाजवण्यात गुंग होती…
त्यातच एक हाहाकार झाला… तिथल्या एका शेजारच्या घराने मोठा पेट घेतला जणू काही अग्नि तांडवच करत आहे…पण कशामुळे.. फटाक्यांमुळे… सर्वत्र आगीमुळे धूर व ओरडाआरडी, रडारड.
बरीचशी माणसे बाहेर होती पण काही बायका आत अडकल्या होत्या. समोर साक्षात मृत्यु उभा होता. त्याने त्याचा जबडा उघडला होता. पाहता पाहता गर्दी होऊ लागली बघ्यांची गर्दी झाली. बध्यांमध्ये एक होता तरूण. त्याचे नाव वीर भोसले.आर्मी मधे…नुकतीच दिवाळीला सुट्टी घेऊन आला होता. त्याने क्षणाचाही विचार न करता त्या आगीतून घरात प्रवेश केला. जीवाची पर्वा केली नाही. बायकांना घेऊन बाहेर आले व प्राण वाचवले. ते ही बाहेर आले पण आतून एक आवाज आला.. आई आई मला वाचव हे शब्द कानी पडताच त्या तरुणाने पुन्हा स्वतः ला अग्नीच्या हवाली केले.. भयंकर धुर् त्यात काही दिसत नव्हते तरी त्या मुलाला बाहेर टाकले मात्र  तो तेथेच अडकला. नियतीला जे करायचे ति करणारच….अग्नीने वीरचा घास घेतलाच.
वीर गेला. बाहेर उभे असलेले माणसे मोठ्याने ओरडले. पण ओरडून काय उपयोग आता, आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचे बळ असावे लागते. ते त्यांच्याजवळ कुठे होते? आग आटोक्यात आली आग विझली पण वीर  भस्मसाथ झाला. दुसऱ्यासाठी करताना त्याने त्याच्या प्राणाची आहुती दिली होती अग्नीला. ती मिळताच अग्नी शमला. प्राण वाचवून वीरने त्याचे नाव सार्थक करून दाखवले. आर्मी मधे जाऊन तिकडे सेवा केली… सुट्टीवर येऊनही त्याने त्याच्या प्राणाची आहुती दिली…. तिथेच त्या गावात स्मारक बांधण्यात आले. त्याने एक आदर्श उभा करून दिला.
त्याने तर समर्थांची “मरावे परी कीर्ती रुपे उरावे” ही उक्ती कृतीत आणून सत्य करून दाखवली.
  देह त्यागिता. कीर्ती मागे उरावी 
           मना सचना हेचि क्रिया धरावी। 
           मना चंदनाचे परित्वा झिजावे 
           परि अंतरी सजना निववावे।।
                             🙏समर्थ रामदास🙏

लेख आवडल्यास likeshare करा. .. (लेख पहिलाच असल्याने काही चुक असल्यास सांगावी)

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा