मला ती उमगली #कथालेखन

Written by

“नवरा बायकोचं नातं मित्र मैत्रिणीसारखं असलं पाहिजे.. मला वाटतं माझी बायको स्वतंत्र विचारांची पाहिजे, तिची समाजात एक वेगळी ओळख असायला हवी, मी त्या पुरुषांमधला नाहीय कि माझ्या अहंकारामुळे मी बायकोला तिच्या करिअर मध्ये पुढे जाण्यापासून थांबवेन..”

“पण हे कसं शक्य आहे समीर?  नवरा-बायको मध्ये समजूतदारपणा तेव्हाच शक्य आहे जेव्हा ते एकमेकांना खूप चांगले ओळखतात.. arrange marriage मध्ये ते शक्य नाहीय.. ”

हा सवांद आहे समीर आणि पूजा मधला.. समीर हा पूजाच्या वडिलांचा मित्राचा मुलगा.. दोघेही आयटी इंजिनिअर आणि समवयस्क होते.. त्यामुळे दोंघांमध्ये छान मैत्री झाली होती..समीर काही ऑफिसच्या कामासाठी आठवडाभरासाठी मुंबईला आला होता. संडे होता तर पूजाच्या बाबांनी पूजाला समीरला मुंबई दाखवून आण असं सांगितलं.. तर दोघेही मुंबई बघायला बाहेर पडले.. तीन चार स्पॉट बघून रात्री डिनर बाहेरच करून घरी आले.. दुसऱ्या दिवशी समीर हैद्राबादला निघून गेला..

दोन दिवसानंतर जेव्हा पूजा ऑफिस मधून आली तेव्हा पूजाच्या बाबांनी पूजाला विचारलं.. “तुला समीर कसा वाटला? ”

पूजा:”हो खूपच समजूतदार मुलगा आहे तो.. पण मला का विचारताय? ”

बाबा: “समीरच्या बाबांना आणि मला असं वाटतंय कि तू समीरसाठी योग्य मुलगी आहेस..खूप वर्षांपासून त्यांचं कुटुंब माहित आहे आणि तू तिथे सुखी होशील असं वाटतं ”

पूजा:”पण बाबा मी हे लग्न नाही करू शकतं.. कारण माझं माझ्या ऑफिस मधील निल वर प्रेम आहे.. तो आता न्यूयॉर्क ला असतो. तो पुढच्या महिन्यात एका महिण्यासाठी येणार आहे.. हवं तर तेव्हा तुम्ही भेटा त्याला.. ”

बाबा:”ठीक आहे बेटा.. काही प्रॉब्लेम नाही.. ”

पूजाने लगेच निलला कॉल करून सांगितलं कि तिच्या घरात आपल्या लग्नाला होकार आहे..

निल:”वाह क्या बात है.. मी आता लवकरच लग्न करून तुलाही इकडे अमेरिका ला घेऊन येणार”

पूजा त्या दिवशी जणू जमिनीवर नव्हतीच ती.. खूप आनंद झाला होता तिला..

पूजा आणि निल इंजिनीरिंग ला एकाच क्लास मध्ये होते.. दोघेही अभ्यासात हुशार.. त्यामुळे नेहमीच दोघांमध्ये फर्स्ट क्रमांक साठी स्पर्धा असायची.. नेहमीच पूजा फर्स्ट यायची.. आणि निल तिच्यावर जळत राहायचा.. पण हळूहळू त्या दोंघांमध्ये मैत्री झाली.. आणि गप्पा भेटींमधून मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं..

त्यांच्यातली ही जवळीक अजून वाढली जेव्हा दोघांनाही शिक्षणानंतर एकाच कंपनीत नोकरीं लागली.. दोघे एकाच प्रोजेक्टवर कामं करत असल्याने सकाळपासून संध्याकाळ पर्यंत सोबतच असायचे.. ह्याच दरम्यान निलने एके दिवशी पूजाला लग्नसाठी विचारलं आणि दोंघांमध्ये समजूतदारपणा असल्यामुळे पूजानेही लगेचच होकार दिला.. काही दिवसानंतर दोघांनाही कंपनीकडून एच 1 व्हिसा लागला आणि दोघांनाही अमेरिकेला जायची संधी मिळू शकत होती..

बघता बघता सहा महिने निघून गेले.. एक दिवशी मॅनेजरने पूजाला केबिन मध्ये बोलावलं व सांगितलं.. “तुला दोन वर्षासाठी न्यू यॉर्क ला जावं लागेल.. पुढच्या महिन्या पर्यंत तिकीट येऊन जाईल तर तयारीला लाग.. ” तिने ह्या आनंदातच निल ला कॉल केला आणि सगळं सांगितलं.. तेव्हा निल म्हणाला.. “तू जा बिनदास्त.. थोड्या दिवसाने कंपनी मलाही पाठवेल.. मग आपण लवकरच लग्न करू.. ”

पण एका महिन्यानंतर कंपनीने पूजा ऐवजी निल ला न्यू यॉर्क च तिकीट दिलं.. पूजा खूप नाराज झाली.. निल पण खूप चिडला.. “असं कसं करू शकतात कंपनीवाले.. तुला सांगितलं होतं मला कसं दिलं मग तिकीट.. थांब मॅनेजरलाच विचारतो” असं म्हणत तो चालायला लागला तेव्हा पूजाने त्याला थांबवलं.. “सोड ना निल.. तुझं इम्प्रेशन खराब नको करून घेऊ.. तुला पाठवलं काय मला एकच आहे.. तू जा आरामात.. ”

निल न्यू यॉर्क ला निघून गेला.. पूजा त्याला खूप मिस करत राहायची.. तिकडे निल ला पण पूजाची कमी जाणवायची.. पण दोघांनीही हळूहळू स्वतःला कामात गुंतवून घेतलं.. निल कॉल वर पूजाला म्हणायचा.. “इथे येऊन मला कळतंय किती कठीण आहे तुझ्यापासून लांब राहणं.. तू नोकरीं सोडून दे.. आणि लग्न करून डिपेंडेंट व्हिसा वर इकडे ये.. अजून नाही वाट बघू शकणार मी”

पूजाला माहित होतं कि डिपेंडेंट व्हिसावर जाऊन तिला अमेरिकेत नोकरीं मिळणार नव्हतं.. पण तिला तिच्या करिअर पेक्षा निल खूप महत्वाचा होता.. ती आता त्याच्या येण्याची वाट बघू लागली.. येणाऱ्या सुंदर क्षणाची वाट बघत ती झोपी गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ऑफिसला गेली..

पुढचे 15 दिवसाने तिचं अख्ख आयुष्य बदलून टाकलं.. तिने लग्न करायचा निर्णय घेतला.. आई बाबा खूप खुश झाले आणि घरात जोरदार लग्न तयारी चालू झाली.. काही दिवसाने निल न्यू यॉर्क वरून आला आणि ऑफिसमध्ये पूजाला भेटायला म्हणून गेला तर त्याला कळालं कि पूजा सुट्टीवर आहे आणि पुढच्या आठवड्यात तिचं लग्न हैद्राबाद मधल्या समीर सोबत होणार आहे.. हे ऐकून निल च्या पायाखालची जमीन सरकली.. इतकी मोठी गोष्ट आणि त्याला माहीतही नव्हतं.. मागच्या पंधरा दिवसापासून पूजाने त्याला एकही कॉल केलेला नव्हता आणि ती निलचा कॉल ही घेत नव्हती.. ह्या गोष्टीने तो आधीच परेशान होता.. त्यातच ही लग्नाची बातमी.. त्याचं डोकं गरगरायला लागलं.. प्रेमात धोका मिळाल्याचा जाणिवेने त्याचं अंग थरथरू लागलं आणि तो त्या रागातच पूजाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे विचारण्यासाठी पूजाच्या घराकडे निघाला..

पूजाच्या घरात लग्नाची गडबड होती.. ती तिच्या रूममध्ये होती.. निल ला बघून ती खूपच औपचारिकपणे विचारली.. “ये निल.. कधी आलास? ”

निल तिच्या प्रश्नाचं उत्तर न देताच रागाने.. “मी काय ऐकतोय पूजा.. तू समीरसोबत लग्न करतेय?  ”

पूजा शांतपणे:”हो तू बरोबर ऐकतोय.. ”

निल रागात:”आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेतलास मला एकदा विचारलं ही नाही..आपलं प्रेम म्हणजे काय टाईमपास वाटलं तुला..मागच्या किती दिवसापासून बोलायचं प्रयत्न करतोय..बोलतही नाहीय..तू तर म्हणाली होती ना कि आई बाबा तयार आहेत आपल्या लग्नासाठी म्हणून..मग कोणाच्या दबावाखाली तुझा निर्णय बदलालास? ”

पूजा:”हो आई बाबा तर तयारच होते..पण मीच माझा निर्णय बदलला..आणि हा निर्णय मी खूप आनंदाने आणि विचारपूर्वक घेतलंय..”

निल:”का पण? काय कारण आहे? ”

पूजा:”ऑफिसने माझ्या जागी तुला कसं न्यू यॉर्क ला पाठवलं होतं..? ”

निल:”मला कस माहीत असणार ते..तुला मॅनेजर काही बोलला का? ”

पूजा:”त्यांनी काही नाही सांगितलं..ज्या दिवशी मी कॉल वर बोलून झोपी गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यावर बघितलं कि माझा लॅपटॉप खराब झालंय..काम खूप होतं आणि urgent ही म्हणून मॅनेजर ने मला माझा लॅपटॉप नीट होईपर्यंत तुझा ऑफिसिअल लॅपटॉप मला काम करायला दिला..जेव्हा मी चॅट लॉग बघितलं तेव्हा ह्या निष्पाप चेहर्यामागचं खरं रूप कळालं..माझ्या ऐवजी तुला न्यू यॉर्क ला पाठवतायेत म्हणल्यावर तू किती छान रागाचं acting ही केलं होतं..”

निल:”तू असं काय पाहिलंय म्हणून माझ्यावर आरोप करते आहे? ”

पुजा:”तूझ्या चालाखीची गोष्ट माझ्याकडून ऐकायची तर ऐक..जेव्हा मला न्यू यॉर्कला पाठवणार असल्याच तुला कळालं तू मॅनेजर ला msg करून सांगितला कि पूजाच्या आधी मला पाठवलं तर बरं होईल कारण मी आणि पूजा लग्न करणार आहोत आणि मला नाही वाटतं कि पूजा प्रोफेशनल लाईफ मध्ये माझ्यापेक्षा पुढे जावं..तिला माझ्या आधी प्रोमोशन मिळावं आणि अहंकारामुळे आमच्या संसारात खटके उडावेत..तू अजून असाही लिहलं होतंस कि मुलगी असल्यामुळे लग्नानंतर तिच्यावर घरची जबाबदारी ही जास्त असणार..त्यामुळे ऑफिस मधील तिची कार्यक्षमता कमी होईल.. तुझं मॅनेजर बरोबर चांगली मैत्री होती त्यामुळे त्याने लगेच तुझं बोलणं ऐकलं आणि तुला पाठवलं..”

निल काहीच बोलू शकत नव्हता..तो खाली मान घालून उभा राहिला..

पूजा:”तू माझं करिअर पूर्णपणे संपवायच्या प्लॅन मध्ये होतास पण नशिबाने मला साथ दिली..पती पत्नी एकमेकांचे साथी असतात..स्पर्धक नाही..तू तर कॉलेज मध्ये असल्यापासूनच मला स्पर्धक मनात आलास..मी मात्र तुझ्यावर खूप विश्वास ठेवला..मला आधीपासूनच असा नवरा हवा होता जो मला समझून घेईल, माझ्या भावना कळतील, माझी योग्यता समझेल, मला दोस्त समझेल स्पर्धक नाही आणि समीर असाच मुलगा आहे..आणि मला विश्वास आहे कि माझा हा निर्णय योग्यच असेल..”

पूजाच्या ह्या आत्मविश्वासाने भरलेले उत्तर ऐकून निल ची बोलती च बंद झाली..तो उठला व काहीच न बोलता खाली मान घालून बाहेर निघून गेला कारण आज निल ला पूजा नव्यानेच उमगली होती..त्याच्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या तिच्या डोळ्यात आज निल बद्दल थोडीही प्रेमभावना नव्हती..येताजाता आपल्यासोबत भविष्याचे स्वप्ने रंगवणारी ती आज दुसऱ्या मुलासोबत आयुष्याची स्वप्ने रंगवायला निघाली होती…आपल्या पुरुषी अहंकारामुळे नेहमी प्रेमळ वाटणारी पूजा किती कठोर झाली आहे ह्याची त्याला जाणीव झाली..

 

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.