महिलांची लेखनी : समाज बदलाचे नवे संकेत….!!

Written by

? महिलांची लेखनी : समाज बदलाचे नवे संकेत…!!

पुन्हा पुन्हा महिलांच्यासाठी लिहण हे मला अभिमानास्पद वाटत…अनेक बंधनातुन स्रीयांच्या शृंखला जेंव्हा गळुन पडतात तेंव्हा लेखनीला खरी धार प्राप्त होते.बुद्धीभेदाच्या कसोटीला उतरुन स्रीने लिखाणाला हिरेजडीत पैलु पाडले आहेत.स्रीयांच्यामध्ये प्रचंड आकलन क्षमता असल्याने समाजप्रबोधन करताना त्यांची लेखणी समाजाची ढाल बनलेली आहे.घरोघरी सामाजिक कृतीशिलतेचा अंगीकार करताना स्रीयांना पाहिले आहे.आपले विचार मुक्तपणे मांडताना वास्तविकतेशी सांगड घालुन सामाजिक भान राखले आहे.विविधअंगानी स्रीयांचा दर्जा सुधालेला असला तरी लेखनामुळे स्री अधिक परिपक्व वाटू लागली आहे.
अनेक माध्यमं स्रीयांच्यासाठी वरदान ठरलेली आहेत.आपल्या कोंदटलेल्या भावना व्यक्त करताना तिची लेखणी कचरलेली नाही…एखादा मुर्तीकार आपल्या जीव ओतुन जशी मुर्ती घडवतो तशी स्रीयांनी कसोटीच्या शब्दांनी आपली लेखनी प्रगल्भ केली आहे.आपण ईरावर पहातोय….महिलांचे लेख एखाद्या मशिनमधुन वेगाने मुद्रीत व्हावे तसे दररोज प्रसिद्ध होत असतात.ईरावरील महिलांचा लेखनीचा ताफा पाहुन अभिमान वाटतो.संजना इंगळे , अर्चना धवड ,स्नेहल अखिला अन्वित , शुभांगी शिंदे , मनिषा barthe , अश्विनी दुर्गकर , अश्विनी कपाले स्वना मायी , सोनाली गोरडे , प्रीती दळवी , सुनिता चौधरी , मनिषा जाधव , प्रणाली पाटील , सरिता भोसले , जयश्री कन्हरे , सुप्रिया जाधव , दीप्ती अजमिरे , स्नेहा पाटील अशा आदरणीय माताभगीणी अप्रतिम लेखन करत आहेत.त्यांची लेखनी म्हणजे जीवनातील प्रेमांनी भारलेला कोसळणारा धबधबा आहे.छोट्या छोट्या प्रसंगातुन त्यांनी केलेल्या मांडणीला सोनेरी किनार आहे.आयुष्यातील चढउतार , संघर्ष , आनंद यांच्या लेखनीने छान टिपलेले आहेत.हृदयस्पर्शी लेख , कथा , कविता मन हेलावुन टाकतात.स्रीयांच्या लेखनीचे धाडस समाजाभिमुख प्रगतीचे मुख्य प्रवेशव्दार बनत आहे.हळुहळु स्री वैचारिक बुद्धिमत्तेद्वारे संपन्न बनत चालली आहे….घराघतील सुसंवादाने समाजघटकांशी एकरुप होवून स्रीने अनेक जटील समस्या सोडवल्या आहेत…स्रीयांची ही लेखनी समाजप्रबोधनाचा जागर ठरावी …बुलंद भारत अधिकाधिक सक्षम व्हावा…त्यांच्या लेखनीला हत्तीचे बळ मिळावे… त्यांची लेखनी मर्मबंधातील ठेव व्हावी….. एकवीसाव्या शतकात एक सामर्थ्यशाली स्री पहायला मिळावी ..हिच अपेक्षा ..!!

बहरलेल्या लेखनीला व स्रीला मनःपुर्वक सलाम..!!

–✍नामदेव पाटील.

Article Categories:
नारीवादी

Comments

  • मस्त लिहलंय…. Thank you so much..

    Archana Dhawad 10th ऑगस्ट 2019 9:39 am उत्तर
  • Thank you. असेच प्रतिक्रिया मिळत राहो, सर्व लेखिकांना प्रोत्साहन मिळत राहो. धन्यवाद!!

    Sonal Gorade 11th ऑगस्ट 2019 10:19 pm उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत