banner

माझा काही सखींनी सुकन्या समृद्धी योजनेबद्दल माहिती विचारली होती..

Written by

ही आहे योजना:
*सुकन्या समृद्धी योजनेत खात्यात मुलीच्या नावावर एका वर्षात 1 हजार ते 1 लाख पन्नास हजार रुपये जमा करू शकता.

* हे पैसे अकाउंट खोल्याच्या 14 वर्षांपर्यंत जम करावे लागतील आणि हे खाते मुलगी 21 वर्षांची झाल्यावर मॅच्योर होईल.
* नियमांप्रमाणे मुलगी 18 वर्षांची झाल्यावर अर्धा पैसा काढता येईल.

* 21 वर्षांनातर खाता बंद होऊन पैसे पालकांच्या स्वाधीन केले जातील.

* जर मुलीचे 18 ते 21 वर्षाच्या आत लग्न झाले तर खात बंद होईल.

* उशिरा पेमेंट केल्यास 50 रुपये पेनल्टी लावण्यात येईल.

* पोस्ट ऑफिसव्यतिरिक्त काही शासकीय आणि निजी बँक पण या योजनेत खाते उघडत आहे.

* या खात्यांवर आयकर कायदा धारा 80-जी अंतर्गत सूट देण्यात येईल.

* पालक आपल्या दोन मुलींसाठी दोन खाते उघडू शकतात.

* जुळे झाल्यास प्रूफ देऊन तिसरा खातेही उघडवू शकतात.

* मुलीचा मृत्यू अथवा 18 वर्षाच्या आत विवाह झाल्यास सदर रक्कम पालकास न देता शासनाच्या खात्यात जमा केली जाईल.

* अकाउंट ट्रांसफर केले जाऊ शकते

योजनेसाठी आवश्यक दस्तऐवज:
* जन्म नोंदणी प्रमाणपत्र
* ऍड्रेस प्रूफ
* आयडी प्रुफ

याचे फॉर्म ऑनलाईन उपलब्ध आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत