“माझी परी” @दिप्ती अजमीरे.

Written by

ओटीत माझ्या ही गोड चिमण प्राय,
दुधावर जशी शुभ्र दाट साय…

आली नक्षत्रांचं लेणं लेऊनी न्यारी,
उमटली पाऊले लक्ष्मी ची दारी…

गोबऱ्या गुलाबी गालांवरी खळी,
भासते मज जशी चमचम सोनपाकळी…

इवलेशे पाऊले, चाले दुडुदुडू अंगणी,
ताल धरून छमछम करी, पायी पैंजणी..

खट्याळ हसते, नटून थटून ही परी,
गोजीरे रूप ल्याते, नव्याने सावरी…

तुझेच रूप यावे जन्मोजन्मी, माझ्या पोटी,
उजळावी कूस अन् भरावी माझी ओटी…

धावून यावी सारी सुखें, मिळो तुज कीर्ती,
अखंड तेवत राहो अंगणी ही ज्योती…

दिप्ती अजमीरे.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत