#माझे बाबा माझे जग#

Written by

 

या कथेतील बाबा एक नाविक आहेत….. 

जे ६ ते ७ महीने शिपवर राहातात….. 

           शाळेतन सई नाचत नाचत आली. आल्या आल्या आई बाबांना पटकण फ़ोन लाव. मला एक महत्वाच बोलायच आहे. दे पटकण तुझा मोबाईल…

   अग झाल तरी काय आधी सांग ना मला… तुला नको मी फक्त बाबांनाच सांगेल… नाही आधी मला सांग बघु… 

तुला नाही….  फक्त बाबा….

प्लीज़ सांग ना….. 

      “अग आई…… मी बाबांसाठी नवीन ऑफ़िस शोधल आहे. खुप मस्त आहे आणि जवळ पण आहे. मी खुप दिवसां पासन बघते आहे तिथे खुप सारे काका दिसतात. बाबांना आता एवढ्या दुर ज़ायची काहीच गरज नाही. आपल्या जवळच राहातील ते,” आणि परत नाचु लागली… 

 अरे देवा…. बया बाई…. आता हे काय नवीन तुझ….

       “हे बघ जिया मला सांगीत होती तिचे बाबा ना जवळच्याच ऑफ़िस मध्ये आहे. ते दोघ तिचे बाबा ऑफ़िस मधन आले की मस्त खेळतात आणि ते रोज तिला story पण सांगतात. आपले बाबा पण जवळच्या ऑफ़िस मध्ये आले की रोज़ रात्री ते पण खेळतील ना माझ्या सोबत किती मज्जा येईल”…..

  यह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह……

          लाव तु बाबांना फ़ोन मला संगायच आहे त्यांना…

     ये पिल्लु थोड़ा दम भर ग…. शांत हो…. काय मूर्खा सारखी करते आहेस….

        “नको…. नको…. नको…. तु लाव…. 

     मी बोर झाली आता बाबांशी नुसतीच video call आणि फ़ोन वर बोलुन. किती दिवस झाले मी त्यांना पप्पी नाही दिली… आणि तुला एक सांगु क़धी क़धी मला खुप रडायला येत… सगळयांचे बाबा येतात त्यांना school मध्ये सोडायला आणि  functions मध्ये पण असतात…. फक्त माझेच बाबा नसतात. पुढच्या महिन्यात concert आहे माझा सगळे राहातील फक्त बाबाच नसणार. तो साहिल पण van मध्ये चिडवतो मला….,”अरे अरे तुझे बाबा तर आज पण नाही आलेत तुला  न्यायला”. मला नाही आवडत तो असा बोलला की एक दिवस मी मारून देईल त्याला”….. आणि ती फुस… फुस….. रडायला लागते….

        अरे…. अरे….. अरे…. 

काय बोलते आहेस तु सई…. आणि अश्या मारा बिरायच्या गोष्टी का कुठण शिकली. माझी एवढी brave आणि strong girl अशी रडते पण…. मला तर माहितीच नव्हत तुला रडता पण येत… 

     तुला माहिती आहे… बाबा तर सकाळीच म्हनालेत की,” माझी सई तर sailor’s daughter आहे एकदम brave, intelligent आणि smart आहे, अगदी बाबां सारखी”. 

         आणि ती क़धी रडत पण नाही खुप शहानी आहे…..

      पण मला तर आता सांगाव लागेल बाबांना की तुमची सई आता काही ब्रेव बिव राहीली नाही… 

     “ये आई मी braveच आहे…….. बिल्कुल बाबां सारखी”…….

         अरेरेरेरे वाऽऽऽऽऽऽऽ…. high five… 

भारती ने सई ला कुशीत घेतले आणि म्हनाली….

  “हे बघ सई…. तुझ्या जवळ तर आई, आजी, आबा, नाना, नानी सगळेच आहेत पण बाबां जवळ तर कोणीच नाही ना. म्हनजे विचार कर बाबा किती strong आहे. एवढ्या दुर शिप वर राहातात…. तु त्या साहिल ला सांगुन देशील की माझे बाबा लवकरच येणार आहेत आणि मग आम्ही पण खुप मज्जा करणार आहोत, फिरायला जाणार आहोत….”

      यह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह……

तेवढ्यात प्रतीक चा call आला……

“ह्म्म्म्म्म्म्म बोलाऽऽ….

   “काय ग….? आवाज़ का तुझा असा…?”, प्रतीकने विचारले…

अहो…. 

   “हि कार्टी भलतेच उपद्रव करायला लागली आहे”….

 काऽऽऽ ग काय झाल….

” शाळेतन येता येता तुमच्या साठी नव ऑफ़िस शोधुन आली ती आणि जिद्द करू लागली, बाबांना फ़ोन लावुन दे म्हणुन”…..

प्रतीक मोठ्याने हसु लागला…..

“तुम्हाला हसन सुचत आहे माझी किती दमछाक होते माझ मलाच माहिती आहे”, वैतागुन बोलली भारती

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म….. प्रतीक म्हणाला…

नुसत हम्म केल्यानी होत नाही. आता ती मोठी झाली आहे. कळत तिला सगळ…..

“काही दुखल, खुपल, सलल की हवे असतात तिला तिचे बाबा….

आणि दोघांच character play करता करता माझी खुप फजीती होते हो”.

  ये राणी…..

 “तुझ कळत ग मला… तुझ्या साठी हे सगळ सोप नाही पण काही पर्याय नाही ग आपल्या कडे… मी सगळ तुमच्याच साठी करतो. मला पण नको वाटत सगळ”….. 

    

तेवढ्यात सई नी मोबाईल हिसकला आणि पळुन गेली….

  “बाबा बाबा, आई च्या गोष्टीं कडे अजिबात लक्ष नका देवु… मी तर sailor’s daughter आहे एकदम strong”…..

 “ये माझा शोना…. किती मोठा झाला…

मी लवकरच येणार आहे मग खुप मस्ती करू आपण”….

Yessss… तुम्ही लवकर या. Next month माझ्या school मध्ये concert आहे.”

हो नक्कीच येतो.. bye….

  

     सईच्या concert ला एक दिवस शिल्लक होता…

” नेहमी प्रमाणे या वेळेस पण नाहीं येणार ना बाबा”, सई भारतीला म्हनाली. 

तु हताश नको होवु. नसेल जमल त्यांच…. तु छान dance कर मग आपण बाबांना तुझे video दाखवु….

“मला माहिती होत ते नाहीं येणार म्हनुन मी नव ऑफ़िस शोधल होत बाबांसाठी. आता परत सगळे मला चिडवतील… जा आता मला नाही बोलायच कोणाशीच”…. रडत रडत सई झोपुन गेली.

भारतीला मात्र खुप खुपत होत ती देवाला प्रार्थना करीत होती..

नको हा पैसा, नको हि शान-शौकत…. बस माझ्या पोरीला फक्त तिचे बाबा आनुन दे….

सई शाळेत गेली…. तयार झाली…. next dance तिचा होता… stage वर गेली… बघते तर काय stage च्या सामोर बाबा हातात खुप मोठी doll घेवुन उभे होते.. सई साठी आणि भारती साठी हे खुप मोठ surprise होत…

मग काय सईने आता पर्यन्तचा तिचा best performance दिला…. ते ही बाबां समोर….

तिला अस नाचतांनी बघुन…. प्रतीक लहान मुला सारखा रडत होता आणि भारती त्याचे अश्रु पुसत होती…..

————————***—————————-

लेखनातील चुका माफ़ करा…!

धन्यवाद….

©️ अश्विनी दूरगकर✍?

  

        

   

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत