माझ्यातली सकारात्मकता

Written by

#माझ्यातील सकारात्मकता

होय…. मी चित्रकारच होणार.
असा माझा बालहट्ट.
आई-अग, पण चित्रकलेत कुठलं आलंय करिअर…
मी- अहो, बाबा, तुम्ही तरी समजवा ना आईला…
बाबा-अग, का अशी मागे लागतेस तिच्या? लहान आहे सध्या ती! मोठी झाल्यावर कळेलच तिला, काय करायचं ते? आत्तापासून का टेन्शन घेतेस…
आई- तुम्ही ना तिला जरा जास्तच लाडावून ठेवलंय!
खूप हट्टी झालीय हल्ली ती, जे मनात असेल तेच करेल ही?
मी मात्र मनातल्या मनात हसत होते.😊
हे असं तीन, चार दिवसाआड आमच्या घरात चालायच.
पण बाबा मात्र माझी जमेची बाजू होतें. ते मला खुप सपोर्ट करायचे, म्हणून बरं हो….
नाहीतर एव्हाना आईने माझे ब्रश, कॅनव्हास, रंग सगळेच चुलीत जाळले असतें.. कारण ती बरेचदा म्हनायची तसं….
शाळेतून घरी आली की माझा पहीला उद्योग ….रंगाचा पसारा मांडुन बसणे, स्केचिंग करायचं, अन रंगवायच….
कापड्यावरचे,फरशिवरचे डाग पाहुन आईच परत ओरडणं…..
हे झालं माझं बालपण….
हळु हळु मी मोठी होत गेले…आणि आठवलं ते बालपणीच स्वप्न…आपण बरीच स्वप्न बघतो,पण प्रत्येकच स्वप्न पूर्ण होईल याची खात्री नाहीं.
बाबा मात्र नेहमीच सांगायचे, तुला आर्टीस्ट व्हायचे ना, मग तू जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिक, आशावादी बनायला शिक.
प्रत्येक व्यक्तींमध्ये जन्मजात कुठला न कुठला गुण असतो, आपल्यातल्या गुणांना फक्त आपल्याला ओळखायचं असतं. आईला मात्र चित्रकलेविषयी थोडी खन्त होती, पण तिचा प्रश्न सामोपचाराने बोलून मी सोडविला.आई, जीवनात यशस्वी होणे म्हणजे चांगली नोकरी,चांगला पगार, चांगल्या सुख-सुविधा हीच संकल्पना का ग?
पण, आई…. माझं ध्येय थोडं वेगळं आहे ग! मी पण यशस्वी होईल पण आवडीच्या क्षेत्रातून.
आता आई आणि बाबा याची सोबत, आणि माझा सकारात्मक आत्मविश्वास माझ्या सोबतीला होते. त्यामुळे माझ्या कार्यक्षमतेवर त्याचा फार छान परिणाम झाला.
बरेच जण म्हणायचे, तुला ATD ला admmision मिळणारच नाही, समजा मिळालीच तर तू एकटी राहणार कशी? असे अनेक प्रश्न…. पण मी मात्र माझ्यातील सकारात्मकतेने त्यातून मार्ग काढत राहिले. मी स्वतःला ओळखले.
मी बारावी झाली…
ATD ला ऍडमिशन मिळाली… जर कधी हताश झालेच समजा…. तर कधीतरी वाचलेल्या ह्या चार ओळी माझ्यातली ऊर्जा वाढवायच्या…
त्या चार ओळी म्हणजे
“लहरो से डरकर नौका पार नहीं होती…
कोशीश करनेवलोकी हार नहीं होती…..
नन्ही चीटी जब दाना लेकर चलती हैं….
चढती दिवारो पर सौ बार फिसलती हैं….
फिर भी वो कोशीश नहीं हारती….
आज पोस्ट graduation पण संपल…
आज एका मोठ्या हॉलमध्ये माझ्या तैलचित्रानचं भव्य प्रदर्शन भरविण्यात आलय, खूप मोठमोठ्या आर्टिस्ट सोबत भेटी होत आहेत, काहीं जण तर फोटोसोबत सेल्फी सुध्दा काढताहेत. खूप छान वाटतं.
मी माझ्या स्वप्नातला मार्ग निवडला म्हणून.
पण हे सर्व शक्य झालंय, फक्त माझ्यातील सकारात्मक विचारामुळे. जर मी हताश होऊन दुसऱ्या फिल्ड कडे गेले असते, तर पैसे तर कमावले असतेच, पण आंतरिक समाधान मात्र नक्कीच नसतं मिळालं..सकारात्मकता ठेवा यश नक्कीच मिळेल..

#माझे लेखन

लता जुगल राठी
आवडल्यास नक्कीच like, comment करा, आणि हो मला follow करायला विसरू नका.
आवडल्यास share नक्की करा, पण नावासहींत ही नम्र विनंती🙏😊

प्रतिक्रिया व्यक्त करा