माझ्यासारखी मीच…..

Written by

शितल ठोंबरे…..

100शब्दांची गोष्ट#
माझ्यासारखी मीच……

तिने स्वत:ला एकवार आरशात पाहिले.रोज पाहते अगदी तसच.ती गालातल्या गालात हसली.सडपातळ अंगाची,सावळ्या रंगाची ती पण आज तिचा सावळा रंग चांगलाच खुलला होता.गाल किंचीत वर आलेले,अंगावर मूठभर मांस चढलेले.तिच्या गालांवर लाली चढली होती.तिने आरशात स्वत:ला पुन्हा एकदा न्याहाळल.याआधी आपण इतके सुंदर कधीच दिसलो नाही.तिने आपल्या किंचीत वाढलेल्या पोटावर हात ठेवला.” माझ सौंदर्य खुललय माझ्या उदरात वाढणारया माझ्याच प्रतिबिंबामुळ.हे प्रतिबिंब जेव्हा जन्माला येईल तेव्हा मला कोणत्याही आरशाची गरज भासणार नाही.तिच असेल माझा आरसा.मला माझी नव्याने ओळख करून देण्यासाठी”.आईचं सौंदर्य खुलवत ते प्रसाधन नाही तर तिच्या हातात खेळणार तिच गोंडस,निरागस बाळ. आज माझ्यासारखी रूपवती मीच.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा