माझ्या धास्तीचं सिक्रेट

Written by

100 शब्दांची गोष्ट

“माझ्या धास्तीचं सिक्रेट”

अग बाई हिलापण आत्ताच यायच होत.. आता वयाच्या या टप्प्यावर यावी काय म्हणाव हिला..

कधी नाही ते या पोरींसोबत पिकनिकला आले.. आणि आता हिच्यामूळे माझ लक्ष हिच्यावर राहणार.. सतत डाग तर नाही लागला असेल ना?? चालताना घडी पडली तर?? याचच टेंशन मध्ये मी कापडाची घडी पाडत होती.

मीनूला हे सजताच तिने, स्वतःकडचे पॅकेट मला दिले..

मीनू : काय मावशी हे… थांब.. हे घे सॅनिटरी पॅड.. तुमच्या कापडापेक्षा खूप सोईस्कर..

आज पहिल्यांदाच पिरियडस् मध्ये मी अक्षरशः मुलींसोबत बागडत होते… खूप मजा आली आज.. मी त्या पाकिटाकडे पाहिल, ते मला जणु सांगत होत..

“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं.. ”

©®

शुभांगी शिंदे

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा