माझ घर कोणत..? सून व मुलीचा प्रश्न ??

Written by

माझ घर कोणत???… मुलीचा व सुनेचा प्रश्न…??? ©जयश्री कन्हेरे -सातपुते

          सरीता व संजयच भांडण झालं.. चांगलंच कडाक्याचं भांडण झालं… कारण विशेष असं नाही.

संजय…आई व बायको मधे सॅन्डविच बनत होता नेहमी.. कुणाच ऐकावं व कुणाच नाही याच द्विधा मनस्थितीत तो असायचा… त्याचाही पारा चढायचाच.. दोघींचीही जबाबदारी त्याचीच होती..

माणसाला देखील कुठेतरी मर्यादा असते.  बायको व आईवर प्रेम देखील सारखंच असते..

काहीजण बायकोची बाजू घेऊन आईला दुखावतात. तर काही आईची बाजू घेऊन बायकोला नाराज करतात.. यातलं नेमक काय करावं हेच संजयला सुचत नव्हतं..
 

      आज असेच काहीस गाऱ्हाणं सरिताने संजयला सांगायला सुरुवात केली… ऑफिसातही जरा संजयच डोकं गरम झालं होत.

घरी आल्यावर सरिताच सुरु झालं “तुमची आई अशी म्हणते… तशी म्हणते.. मला नाही आवडत असं बोललेलं

इकडे आता संजयचा संयम संपला होता.. बाहेरून आलेला माणूस घरात शांती शोधत असतो पण त्याला तिथेही जर शांतता मिळत नसेल तर त्याचा पारा चढेलच न.. तसच काहीस संजयसोबत झालं आणि त्याच्या रागाचा विस्फोट झाला..

रागाच्या भरात संजयने सरिताला बरंच सुनावलं.. सरीता पण प्रतिउत्तर देत होतीच.. कुणीतरी माघार घ्यावी तर नाही दोघांचंही आपल आपल “मीच खरा ” हे सुरु होत…

आणि

संजयने सरिताला त्याच रागाच्या भरात “जास्त बोलायचं नाही माझ्या घरात… चल निघ माझ्या घरातून… जे बोलायचं ते आपल्या बापाच्या घरी. इथे नाही

रागाच्या भरात का असेना पण संजय आज तेच बोलला जे सासूबाई नेहमी म्हणायच्या.. काही जरी झालं तरी सासूबाई सारखं माहेरचं नाव काढायच्या. स्वयंपाक जास्त झाला व अन्न शिल्लक राहील की सासूबाई चा टोमणा ठरलेला असायचा.. “हे अशी अन्नाची नासाडी तुझ्या बापाच्या घरी करत जा.. माझ्या घरी हे चालणार नाही “

एखादी गोष्ट आवडीने विकत जरी आणली.. ती कितीही चांगली असेना तरी सासूबाई त्यात खोटं काढतील आणि “कशाला विनाकारण खर्च करत बसलीस.. वायफळ खर्च करायला काय पैसे तुझ्या माहेरहून येतात का?  असे खर्च माझ्या घरात नको करत जाऊ.. ”

   संजयच्या त्या एका वाक्याने.. तिला सासूबाईंचे वारंवार बोललेले शब्द नी शब्द आठवले… तीचा पारा आणखीच वाढला.. आणि ती आणखीच जोरात भांडू लागली..

माझ्या घरी म्हणजे?  हे घर काय माझ नाही का?

काय तुमची आई आणि आता तुम्ही देखील तेच म्हणताय.. “माझ्या घरी नाही करायच.. तुझ्या घरी जा ” कुठे जायचं मी व माझ घर कोणतं “

संजय:- तुझ्या बाबांच्या घरी जा.. तिथे कर हे नाटक सगळे.. इथे आगाऊ पणा करायचा नाही… मर्यादेत राहायचं.. बायको आहेस बायको सारखी राहा.  आणि तेही राहायचं असेल तर रहा नाही तर चालती हो माझ्या घरून ”

आता मात्र सरिताला रडू यायला लागल होत.. बोलण्यासाठी काही उरलंच नव्हतं न... “राहायचं असेल तर रहा नाही तर चालती हो माझ्या घरून “ हे वाक्य म्हणजे परकेपणाची जाणीव करून देत होत.

ज्या व्यक्तीसाठी माहेर सोडल, त्याला सर्वस्व दिल तो असं बोलत आहे..म्हणजे आपल आयुष्य आपण काय दुसऱ्यासाठी जगतोय काय..?

माझ म्हणुन कुणीच नाही.. मग इतकी काम कुणासाठी करायची परक्या लोकांसाठी का?

अनेक प्रश्न कल्लोळ करत होते डोक्यात.

माहेरी लग्नाच्या वेळी सांगितलं की “आता सासर तुझं घर आहे, तिथली माणसं तुझी हक्काची माणसं आहे.. आम्हाला तू आता परकी झालीस.. माहेरची पाहुनी झालीस.. दिल्या घरी सुखी रहा “ असा आशीर्वाद घेऊन सासरचा उंबरठा हक्काचं घर म्हणून ओलांडणारी मुलगी/सून आज विचारात पडली की माझ नेमक घर कोणतं…

सासू पदोपदी म्हणतेच “माझ्या घरी हे चालणार नाही. “ आज नवरा पण तेच बोलला..

म्हणजे मला कोणतंच घर नाही का?

माहेरी हक्क फक्त लग्न होइस्तोवरच का? लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावायचं.. त्याच घर स्वतःचं समजून स्वीकारायचं, त्याची माणसं आपली म्हणून वागायचं..

मग मला(एका सुनेला ) का हक्क नाही काहीही स्वतःच्या मनाने करण्याचा..?

का नेहमी “हे माझ्या घरी चालणार नाही ” असं सुनेलाच ऐकावं लागते?

रागाच्या भरात का असेना पण नवरा सुद्धा तेच म्हणतोय.. “राहायचं असेल तर राहा नाही चालती हो माझ्या घरातून ”  म्हणजे मी कुठचीच नाही का..?

मला माझ स्वतंत्र अस्तिव नाही का? कुणाची तरी मुलगी, सून, बायको, आई हिच ओळख माझी आणि त्यांच्या कडे आश्रितासारखी राहते का मी?  म्हणजे वेळ आल्यावर वडील लग्न करून तर नवरा रागाच्या भरात घराबाहेर काढतो मला..

माझ घर कोणतं?

माझ हक्काचं कोणतं  घर ज्यातून मला कुणीही बाहेर काढणार नाही..?

माहेरी घर बाबांच्या नावावर.. असते..

सासरी सासऱ्यांच्या, नंतर सासूबाई, त्यांच्या नंतर नवऱ्याच्या.. माझ काय?  म्हणजे ज्याच्या मनात आल त्याने माझा पाणउतारा करायचा का?

कोणत्या अटी घेऊन जन्म घ्यायचा मी.. “बाबा मला जन्मतः घर नावावर हवं.. पण ते कस करतील कारण मुलगी परक्याचे धन असते न.. तिच्या नावावर लावलं घर तर दुसऱ्याला जाईल इस्टेट आपली ” म्हणजे मुलगी परकीच नाही का.

लग्न करताना अट ठेवायची..” माझ्या नावावर घर लावलं तर मी लग्नाला तयार आहे ” इथे तर उलटंच चालत सगळं.. मुलगी द्यायची, हुंडा द्यायचा, गृहपयोगी वस्तू द्यायच्या, मुलीच्या वडिलांनी… मग सासरी अशी अट मान्य काय कुणी ऐकणारही नाही.. उलट त्यांनाच घर प्रेझेंट म्हणून मिळालं तर स्वीकारतील ते..

काय करायच मी.. सगळा अपमान सहन करून.. मुकाट्याने राहायचं बस.. इतकंच करू शकते मी.

कारण हा समाज कधी बदलेल माहिती नाही.. कधी हक्काचं घर मिळेल प्रत्येक स्त्रीला.. मान मिळेल.. आणि असा अपमान बंद होईल तेही माहिती नाही..

असं वाटत.. आताच जाव व विचारावं संजयला  “तुझी हिम्मत कशी झाली मला असं बोलण्याची?  तुझ्याशी लग्न केल तर तुझं सगळं माझंच न.. मग “चालती हो माझ्या घरून असं का म्हणालास? “

बाबांना विचारावंस वाटत.. का तुम्ही मुलीला परक्याचे धन मानता?  तिचाही हक्क तितकाच आहे तुमच्यावर.. कारण ती तुमच लेकरू आहे. (त्यासाठी आता कायदा झालेला आहे )

अनुत्तरित प्रश्न आहे हा.. माझ(सुनेचं ) घर कोणतं?

तुम्हांला माहिती असेल सरिताच्या प्रश्नाचं उत्तर तर नक्की सांगा.. उत्तराच्या प्रतीक्षेत ©®जयश्री कन्हेरे

समाप्त…. ©®जयश्री कन्हेरे -सातपुते

     हे लिखाण सहजच केल.. एका कट्ट्यावर एका स्त्रीचा प्रश्न होता “मुलीला तिच घर नसत का? ” त्यावरून सहज सुचलेलं शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला मी.. याचा माझ्या वयक्तिक जीवनाशी कोणताही संबंध नाही.

आता.. मुलीला माहेरी देखील हक्क मिळतो.. पण तरीही ती समाजाच्या दृष्टीने माहेरची पाहुणी असते.. सासरी तर काय किंमत असते तिची हे मी सांगायला नको.. (काही सासरी सुनेला खरच मान व सन्मान दोन्हीही मिळतो.  इतकंच नाही तर प्लॉट/फ्लॅट /घर /शेती सुनेच्या नावावर देखील करतात आजकाल मुली आर्थिक स्वावलंबी आहेत त्यांचा प्रश्नचं नसतो, ) सर्वसामान्य मुलींची स्थिती मात्र मी वर वर्णन केली तशीच आहे (काही नोकरीवाल्यांची पण माझ्या बघण्यातल्या ) आशा करते समजून घ्याल… आणि आपल घर नेमक कोणतं हे निश्चित कराल.©®जयश्री कन्हेरे -सातपुते  धन्यवाद ?शेअर करायचा असेल तर नावासहित शेअर करायला माझी हरकत नाही.. नावातच सगळं आहे हो ! तेंव्हा नावासहित शेअर करा की विनंती ??©®जयश्री कन्हेरे -सातपुते

फोटो साभार गुगल

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा