मातृत्वाची आस (भाग -1)

Written by

 

@अर्चना अनंत धवड

आज कृष्णाचा पाचवा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला होता . सगळे पाहुणे गेले अणि कविता च्या आई बाबांना सोडायला म्हणुन कृष्णा अणि विश्वास विमानतळावर गेले… प्रिया हॉल   मध्ये कविता च्या फोटो कडे पाहत होती तिला वाटलं की जणू कविता तिच्याकडे पाहून हसत आहे… प्रिया गतस्म्रुतीत गेली.

प्रिया आई वडिलांची एकुलती एक मुलगी. दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार,ग्रॅज्युएशन च्या दुसर्‍या वर्षाला असेल, अचानक आजारी पडली. खूप उलट्या होत होत्या. आई खूप घाबरली तिनी तिला दवाखान्यात नेले. बाबांना फोन केला बाबा पण ऑफिस मधून दवाखान्यात आले. डॉक्टर म्हणाले काही काळजी करण्यासारखे नाही.  खाण्यात काही आले असेल तरी पण एक सोनोग्राफी करून घेऊ.  सोनोग्राफी केल्यावर डॉक्टर मी तिघांनाही केबिनमध्ये बोलावले. हे बघा या उलट्या तर अशाच खाण्यापिण्या ने झाल्या होत्या परंतु सोनोग्राफी मध्ये मला वेगळाच प्रॉब्लेम दिसला. डॉक्टर गंभीर होऊन सांगू लागले. आई बाबा प्रिया कडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले. डॉक्टर म्हणाले, अहो तस काही नाही. हे बघा प्रिया चे गर्भाषय अविकसित आहे. त्यामुळे प्रिया कधीच आई होऊ शकत नाही. तिघांनाही धक्काच बसला.

प्रियाचे आई बाबा खुप दुःखी राहत होते. प्रिया ला मनात वाटायच, देवानी आपल्याला अस अपूर्ण स्त्रीत्व का दिल.  देवानी आपल्याला एवढे सौंदर्य दिले अणि महत्वाच्या गोष्टीतच का कमी ठेवले?आपल्याला देवानी अप्रतिम सौंदर्य दिल पण ते शापित आहे. काय पाप केले मी की मला अस शापित स्त्रीत्व लाभले?

मग विचार करायची काहीही प्रॉब्लेम नसताना किती स्त्रिया आई होऊ शकत नाही. जे आपल्या हातात नाही त्यासाठी दुःखी का व्हायचे. ती आई बाबांना पण समजायची आणि हळू हळू त्यांनी त्या गोष्टीचा स्विकार केला. प्रिया नी आपले शिक्षण पूर्ण केले.

प्रिया आता बावीस वर्षाची झाली होती. तिच्या आई बाबांना तिच्या लग्नाची काळजी लागली होती. तिनी आई बाबांना सांगितले की जो कोणी माझ्यात असलेल्या दोषासोबत मला स्विकारेल त्याच्याशीच मी लग्न करेल. मला समोरच्याला अंधारात ठेवून लग्न करायचे नाही..

लग्नाची स्थळ येऊ लागली. प्रिया अप्रतिम सुंदर होती. अणि तिनी थोडासा जरी मेक अप केला तरी एखाद्या नटी ला मागे टाकेल अस तीच सौंदर्य खुलून दिसायचे. सगळ्यांना ती आवडायची पण तिला मूल होऊ शकत नाही हे सांगितले की नकार यायचा. दोन वर्षात असे कितीतरी नकार तिनी पचवले होते. आता तिनी स्पष्ट सांगितले की, बाबा तुम्ही स्थळ शोधणे बंद करा. व्हायचे असेल तेव्हा होईल लग्न अणि नाही झाले तरी तुम्ही आहात ना माझ्या पाठीशी

बेटा,आम्ही किती दिवस पुरणार? आम्ही नसताना तुझ कस होणार?

हे बघ आई, जे व्हायचं ते होईल आता हा विषय इथेच बंद..

अचानक एक स्थळ सांगून आले. मुलाला नोकरी, आई वडील सुशिक्षित अणि मुख्य म्हणजे मुलगा हा आई वडिलांनी अनाथालयातून दत्तक घेतलेला. प्रियाच्या आई वडीलांना ते स्थळ योग्य वाटले.

आई म्हणाली “प्रिया, बघ हा मुलगा स्वतः दत्तक आहे त्यामूळे त्याला बाळ दत्तक घेण्यात काहीच हरकत नसणार ”

आई, काहीही असो पण आपण त्याला सगळ सांगायला हव.

नाही बेटा,आपण आतापर्यंत हेच केले. पण कुणीही तयार होत नाही. याला आपण नाही  सांगायचे , प्रश्न बाळाचा आहे ना. ते तुम्ही दत्तक घेऊ शकता अणि तो स्वतः दत्तक असल्यामुळे त्याला त्याची हरकत नसणार.

प्रिया अणि राजेश चे लग्न झाले. सगळ सुरळीत सुरू होते. लग्नाला सहा महिने झाले आता प्रिया विचार करू लागली आपण बाळ दत्तक घेण्याबाबत बोलायला हव. राजेश शी बोलण्यापेक्षा आधी आई शी बोलू या. त्याच आपल्याला समजून घेतील.

ती सासू बाई शी बोलायला त्यांच्या खोलीत गेली.

अग, प्रिया……. तू? येणा.. बस….

प्रिया त्याच्याशेजारी बसली…

आई, मला तुमच्याशी थोड बोलायच होत .. ती अडखळत बोलू लागली..

अग, काय झाले. बोल ना. काही अडचण आहे?

नाही आई, तस काही नाही. मला एक विचारायचे होते. आई मला बाळ दत्तक घ्यायचे आहे…

अग, एवढी काय घाई… सहा महिने तर झाले लग्नाला. होइल बाळ….वाटल्यास आपण डॉक्टर कडे जाऊ.

सासुबाई तिला प्रेमाने समजाऊ लागल्या…

नाही आई, मी आई होऊच शकत नाही…

काय? सासुबाई किंचाळली….

प्रियाने त्यांना आपला प्रॉब्लेम सांगितला…

“पण तु ते आधी का नाही सांगितले? तुझ्या आई बाबांनी एवढी मोठी गोष्ट का लपवून ठेवली.

आई, तुमच्यात काही प्रॉब्लेम आहे का? नाही ना. तरीही तुम्हाला बाळ नाही झाले ना? तुम्ही राजेश ला दत्तक घेतले अणि तो पोटच्या मुलापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी आहे का?

आई, आम्हाला पण एक बाळ दत्तक घ्यायचे आहे. तुमची परवानगी हवी. प्लीज, आई मला समजून घ्या.

आम्हाला म्हणजे? तू राजेश शी बोलली या बाबतीत?

नाही. आधी तुमच्याशी बोलाव अस वाटल.

“मी मुल दत्तक घेतले म्हणुन माझ्या मुलानी पण मुल दत्तक घ्यावे अस आहे का? माझा मुलगा  मुल दत्तक घ्यायला तयार होईल अस तू गृहीतच कस धरल ? प्रिया तू आमची फसवणूक केली” सासू बाई

सासू बाई तिला अणि तिच्या आईवडिलांना खूप काही बोलली. प्रिया फक्त रडत होती.

सायंकाळी राजेश आल्यावर आईनी घडलेल सगळ सांगितले. अणि हेही बजावले, मला तुझ स्वतः च मुल हव.  राजेश, आपली या लोकांनी फसवणूक केली.

राजेश आईचा खूप लाडका होता अणि तो आईच्या आज्ञेत होता.

राजेश बेडरुम मध्ये गेला. प्रियाचा रडून रडून बेहाल झाला होता. तो प्रियाला म्हणाला, हे बघ प्रिया, मला माहिती आहे की यात तुझा काहीही दोष नाही. पण तू लग्नाआधी हे सांगायला हव होत. मी माझ्या आईला दुखवू शकत नाही. तू इथे राहू शकते. एक नवरा म्हणुन मी माझी जबाबदारी पार पाडेल पण मला मुलासाठी दुसर लग्न करावे लागेल. मला माफ कर…

अरे, तू कशाला माफी मागतो.  माफी तर मी मागायला हवी. तू स्वतः दत्तक असल्यामुळे अणि तुझी आई पण  आई होऊ शकत नव्हती म्हणुन मी तुम्हाला गृहीत धरले.  तू तर एक पुरुष आहे पण एक सम दुखीः स्त्री दुसर्‍या स्त्रीच दुःख समजू शकत नाही? अणि तू? तुला जर आज दत्तक घेतले गेले नसते तर?  तुला जे आयुष्य लाभले हे कुणीतरी स्त्री आई न होऊ शकल्या मुळे लाभले. अरे तुला स्वतः लाच वाटायला हव की आपणही एखाद्या अनाथ मुलांचा बाप व्हावे .तुलाच स्वतः ला याची जाणीव असावी.

राजेश काहीही बोलला नाही.

जाऊ दे.  माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल माफी मागते. दुसरी बायको म्हणुन तुझ्या आयुष्यात राहणे मला मान्य नाही.  तू दुसरे लग्न करू शकतो मी तुला सगळ्या बंधनातून मुक्त करते.

प्रियाने बॅग भरली अणि माहेरी आली. परस्पर संमतीने घटस्फोट घेतला….

क्रमशः

अर्चना अनंत धवड

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत