” माफीचा साक्षिदार “

Written by

जुन्या गोष्टींमध्ये गुंतण्याचा प्रकार हल्ली कमी-कमी होऊ लागला आहे . काही निवडक गोष्टी सोडल्या तर जुन्या गोष्टींपासून लांब राहावे असे सातत्याने वाटू लागते .जुनंही नको आणि नव्यात पण काही दम नाही अशी मनाची गुरफट सुरु होते . अश्यातच युट्युब अनेक वेळा मदतीला धावून आलेले आहे . चित्रपटांचा शौकीन कॉलेज मध्ये आल्यानंतर झालो . त्यात युट्युब वरील साऊथ इंडियन मुव्हीचा पत्ता कधीच साफ केला होता .साऊथ मधील त्याच त्या गोष्टी नकोश्या झाल्यात . एके दिवशी लहर आली आणि मराठी चित्रपट सर्च केले . स्क्रोल करत असताना एका चित्रपटावर नजर पडली . त्याकाळात येणाऱ्या चित्रपटापेक्षा याचे पोस्टर थोडे वेगळं होत . तारुण्यावस्थेतील नाना पाटेकर , त्यात त्याचा तो खुनशी चेहरा … जोडीला मोहन गोखले … मुळात लहानपणी सह्याद्रीवर अनेक मराठी चित्रपट बघितलेले असल्याने या चेहऱ्यांची ओळख होतीच .. न राहवून चित्रपट बघण्यास सुरुवात झाली . आणि उत्तरोत्तर त्यात कसा गुंतून गेलो कळलं नाही . ” माफीचा साक्षीदार ” त्या चित्रपटाचं नाव … एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट .. १९७० च्या काळात पुणे बरंच शांत होत . रिटायरमेंट नंतरचे आयुष्य घालवणायसाठी बेस्ट जागा म्हणजे पुणे … पण याच दरम्यान पुणे हादरलं . खुनांचा सत्र सुरु झालं. एक दोन नाही तर तब्बल दहा खून झालेत . बऱ्याच खुनाचा पॅटर्न अगदी सेम ..जोशी – अभ्यंकर खून खटला म्हणून हे प्रकरण गाजले .. याच कथानकाला धरून माफीचा साक्षीदार हि कलाकृती साकार झाली . १९८६ मध्ये हिरालाल शहा याची निर्मिती आणि राज दत्त यांच्या दिग्दर्शनातून माफीचा साक्षिदार उभा राहिला . खरं सांगायचं तर यांच्या बद्दल मला फारशी काही माहिती नाही पंरतु ज्या काळात आणि ज्या प्रकाराने हा चित्रपट तयार झाला त्याच खूप अप्रूप वाटते . एका आर्टस् कॉलेज मधले चार मुले खून सत्र सुरु करतात काय आणि थरारपट तयार होतो काय .. वेगळीच जादू याद्वारे निर्माण होते .. बऱ्याच वेळा असं होत कि जुन्या काळातले भयपठ , थरारपथ चित्रपट बघायला गेला कि आपल्याला हसू येतं. काळाची सांगड घालण्यात आम्ही चूक करतो परंतु या चित्रपबद्दल असं होत नाही . तो थरार शेवट पर्यंत तसाच जिवंत राहतो हेच या चित्रपटाचं सर्वात मोठं श्रेय !! नाना पाटेकर आणि मोहन गोखले हि दोन पात्रे चित्रपट पूर्णपणे स्वतःकडे ओढून घेतात . त्यातल्या त्यात तारुण्याववस्थेतील सायको ” नाना ” धडकी भरवतो . म्हणजे सहजपणे खुनाचे प्लॅन बनवणे , आणि पुढचा मागचा विचार ना करता ते प्रत्यक्षात उतरवणे यात नाना भाव खाऊन जातो . मोहन गोखले माफीचा साक्षिदार म्हणून पुढे येतो . वर वर जरी खून होणे आणि मग गुन्हेगार पकडले जाणे अशी घटना वाटत असली तरीही चित्रपटाच्या माध्यमातून तो दरारा , थरार उभा केला जातो त्याला तोड नाही . गुन्ह्यांचा शोध कसा लागतो आणि त्यांचा गुन्हा सिद्ध होतो का या छोटी छोटी प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या माध्यमातून मिळवलेली कधीही चांगले !! मराठी चित्रपट सृष्टीमध्ये थरारपठ खूप कमी आहेत . आणि जे आहेत ते विनोदी ढंगात दाखवले गेलेले आहेत .. त्यामुळे ” माफीचा साक्षीदार ” आपले उजवेपण अजूनही सिद्ध करून आहे . हिंदी मध्ये देखील अनुराग कश्यपने “पांच ” हा चित्रपट त्याच धर्तीवर बनवला . जोशी-अभयन्कर खून खटला हा पुण्यावर लागलेला एक काळा डाग म्हटलं जातो . परंतु त्यातून निर्माण झालेला “माफीचा साक्षिदार ” मराठी चित्रपटाच्या इतिहासातील एक वेगळं पान आहे हे नक्की !! त्यामुळे हा थरार अनुभवण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघा !! (खूप आधी हा चित्रपट बघितला असल्याने अनेक गोष्टी लिहायच्या कदाचित सुटल्या असतील त्याबद्दल ” माफी ” )

Article Tags:
·
Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा