माफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही!!!

Written by

आज सकाळपासूनच का कोणास ठाऊक वेगळाच आळस येतोय.सकाळी 6:30ला घड्याळाचा गजर झाला पण आठवलं आज तर रविवार, सुट्टी सगळ्यांना मग गजर बंद करून परत झोपले.10 मिनिटातच आईचा फोन आला. माझा आवाज ऐकताच ती म्हणाली उशिरापर्यंत झोपू नये.सगळे उठायच्या आधी उठ बघू.उशिरापर्यंत झोपणे हे कुशल गृहिनेचे लक्षण नव्हे. बापरे हे ऐकून झोप कुठल्या कुठे पळाली. उठून हातात मस्त वाफाळत्या चहाचा कप घेऊन बाल्कनी मध्ये निसर्गसौंदर्य बघत आरामात चहा घेतला.रोजच्या धावपळीत ते बघायला वेळच मिळत नाही.झाडाझुड करून केर बाहेर टाकण्यास गेली तर बाजूच्या काकू म्हणाल्या आज उशीर वाटत हे कुशल गृहिणीच लक्षण नव्हे. मी चुपचाप आत आले.थोडं आवरून स्नानाला जातच होते की लहान मुलगा उठला त्याचे दुध गरम केले ,नाश्त्याची तयारी केली.अहो उठले तर त्यांचा चहा ठेवला यादरम्यान मोठ्या मुलाने दुध सांडवून ठेवले होते ते साफ केले.म्हंटल आता नाश्ता तयारच करून ठेवू,ते बनवताना नणंदेचा फोन आला.बोलता बोलता हातही चालतच होता.10 वाजले आता स्नान करायला जाणारच तो सासूबाईंच्या विडिओ कॉल आला.मुलांना बघणं सुट्टीच्या दिवशी होत त्यांच्या या भावना समजून घेत फोन उचलला आणि नमस्कार म्हंटल तर बॉम्बस्फोटच झाला.अजून गाऊन मधेच आहेस उशिरा उठा, उशिरा अंघोळ करा ,पूजा तर राहिलीच असेल.आई,मी केव्हाची उठलीय बरीच काम सुद्धा झालीय.आत्ता जातच होते स्नानाला. हद आहे,एक कुशल गृहिणीच लक्षण नाही तुझ्यात.पोरांना फोन दे.निमूटपणे फोन देऊन मी स्नानघरात आले आणि आरशासमोर उभे राहिले,जर वेळेवर काम केली नाहीत तर मी कुशल गृहिणी नाही का?मुलांना सांभाळून काम करणं अवघड असत त्यामुळे तर पुजेची वेळ मी ठरवलेली नाही.वेळ मिळताच मी नामस्मरण करते.देवालासुद्धा माहितेय माझी ओढाताण. मी पोरांना रडवून काम नाही करू शकत.फिजुल नियमात गुंतणारी मी नाही.मुलांचा नवऱ्याचा नाश्ता आधी बनवणं मला महत्वाचे वाटले.एकदा कुशल आई तर बनू दे मग कुशल गृहिणीच् पाहू.मनाला वाईट वाटलं पण सुट्टी कशाला खराब करायची म्हणून सारा तणाव फ्लश करून बाहेर आले.सगळे सोबत नाश्त्याला बसलो.ढोकळा खूप आवडला सगळ्यांना आणि सोबतच pineapple श्रीखंड. जादू आहे तुझ्या हातात नवऱ्याचे शब्द. मूल पती खुश तर मीसुद्धा खुश.आज उशिरापर्यंत झोपले,झाडू उशिरा लागला सार काही उशिरा झालं मग असा काय फरक पडला??नवरा मूल समाधानी तर मग मी कुशल गृहिणी असण्याचा नसण्याचा काही प्रश्नच नाही.वेळेवर उठणे ठरवलेल्या वेळेनुसार रोबोट प्रमाणे काम करणे ही काही मापदंड नव्हे पत्नी आई किंवा गृहिणीला परखण्याची तर मग मला माफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही.(हिंदी लेखाचा स्वैर अनुवाद)

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा