“मायबाप”(कहाणी periods and वडिल-मुलीच्या नात्याची)

Written by

मी खिडकीत बसून कॉफी घेत होती.
अनेक क्षण माझ्या डोळ्यासमोर तरळून जात होते..

मुलं किती लवकर मोठी होतात ना!!!
आत्ता आत्ता असे लहान आणि आत्ता असे मोठे होतात!!!
वर्ष किती भुर्रकन उडून जातात नाही!!!

अगदी सात आठ दिवसांपूर्वीची गोष्ट आहे…

माझी मुलगी ‘परी’ खेळून घरात आली फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेली आणि जोरात ओरडायलाच लागली…
“मम्मा… मम्मा…”

ती घाबरून आवाज द्यायला लागली तशी मी धावत गेले तर ती रडत रडत च बाहेर आली…
“मम्मा हे बघ काय होतंय!”
“Something is wrong with me..”
“मम्मा, Its bleeding while urinating..”

मला कळलं,
She has started her menustrating…

मी तिला शांत केलं.
तिला छान नीट समजावून सांगितलं.
Menustrating cycle काय असते. hygine बद्दल ही सांगितले आणि Pad कसे वापरायचे ते ही…

ती आता नॉर्मल झाली होती…
होणाऱ्या त्रासामुळे थोडी चिडचिड होऊन झोपली होती…

पण मी हा क्षण आठवणीत राहावा असं काहीतरी करूया याचं च प्लॅंनिंग करत,
परीसाठी छान तिच्या आवडीचे जेवण आनंदाने बनवत होते…

माझी सगळी गडबड आणि उत्साह बघून माझा नवरोबा एकदम अचंबित झाला…

त्यालाही ही आनंदाची बातमी दिली…

त्याला अगदी परीचं बालपण च आठवलं…
त्याच्या डोळ्यांत वर्तमान आणि भूतकाळ दोन्ही सोबतच हजर झालेत…

एकीकडे तो फार चिंताग्रस्त ही मला वाटत होता.
“माझी ‘परी’ आज मोठी झाली गं…” अगदी च जड आवाजात मला म्हणाला.

“हो रे , बघ ना”
“किती लवकर दिवस उडून जातात ना…” —मी

“आपली एवढीशी परी मोठी झाली.”
“अगं, पण मी कसं जाऊ तिच्यासमोर आता?”
“ती बोलेल माझ्याशी??”
“तिला काय… कसं वाटत असेल??”
“तिला भीती वाटते का ग???”
“तिला दुखतंय का??, काही त्रास??, कशी आहे ती??”
“कुठे आहे??”
“परीला भेटतो बोलतो तिच्याशी..”
“तिला बरं वाटेल माझ्याशी बोलून.”
“नाही नको…, तिला उगीच कसंतरी वाटेल!”
नवरोबा अगदी emtional होऊन बोलत होता….

“अरे, हो हो”
“किती विचार करतोस.”
“किती बोलतोस..”
“थांब जरा, दम घे…
तिला मी सगळं नीट समजावलं आहे…
ती समजली सुध्दा…
आता तिला मी हळूहळू  बॉडी त होणारे changes, हार्मोन्स, या बद्दल सुद्धा नीट माहिती देईल…” —मी…

“बघ ना !!”
“तू घरी होतीस म्हणून परीला कसं सगळं व्यवस्थितरित्या समजायला मदत झाली…”
“मी असतो तर काय केलं असतं मी..
— नवरोबा अगदी चिंतेत म्हणाला.

माझ्या नवऱ्याचे प्रश्न ऐकून मला माझी वेळ आठवली…
मला आत्ता कळतंय की त्यावेळी माझ्या बाबांची काय situation झाली असेल..

आज इथे मी माझ्या मुलीला सगळं समजाऊन सांगतांना मला काहीच अवघड गेलं नाही पण तेव्हा माझ्यावेळी मला आई नव्हती त्यामुळे बाबांसाठीं ती परिस्थिती हाताळणे किती कठीण गेलं असेल हे आत्ता मला कळतंय…

आपले आईवडील, इतर लोक किंवा समाज याबद्दल मुलींशी च तेवढ्या मोकळ्या मनाने आजही बोलत नाहीत तर तेव्हा या पुरुषांशी कसं बोलणार…

म्हणून मी माझ्या नवऱ्याशी या विषयावर बोलायचे ठरवले…
त्याला विचारले तर तो म्हणाला,

“Period (menstruation cycle)
फक्त एक विषय म्हणून आपण शिकलो असलो
तरी त्याची भावनिक बाजू, शारीरिक बाजू मला माहीतच नाही आणि जे आपल्याला माहीत नाही त्या विषयी आपण आपल्या मुलीला कसं सांगणार???”

“तुझ्याबद्दल सुद्धा एवढा विचार मी आजपर्यंत कधीच केला नाही…”

“आई, बहीण, काकू, मामी , घरातील इतर स्त्रीया यांना या दिवसांत काही दुखत असेल, त्यांची मानसिक अवस्था, होणारी चिडचिड…
यांत आपण कधीच नव्हतो…
चार पांच दिवस हात लावायचा नाही..
त्यांना शिवायचे नाही, त्यांना चालत नाहीं..
एवढंच काय ते आपल्याला ठाऊक होते.
आणि त्यांनी ही कधी याची जाणीव आपल्याला होऊ दिली नाही…”

माझा भूतकाळ माझ्यासमोर उभा राहिला…

माझी आई, मला जन्म देताच जग सोडून गेली…
माझी संपूर्ण जबाबदारी माझ्या बाबाने आपल्या मनावर घेतली त्यासाठी त्याने दुसरे लग्न ही नाकारले..
मी आल्यापासून त्याला आपल्या जीवनाचा आधार मिळाल्यासारखे वाटत होते…
बाबा आणि मी फार छान राहायचो…
बाप-लेकीपेक्षा अगदी दोन मित्रांसारखे…
मी तर त्याला ‘अरे’, ‘तू’ रे च करायची…
मैत्री होती आमच्यात तशी…
त्याच्यासाठी मी त्याची “परी”

(म्हणूनच मी ही माझ्या मुलीला “परी” च म्हणते…)

मी कधी मोठी होईल असं विचारच आला नव्हता आम्हाला… बाबा आणि मी आमच्या जगात अगदी आनंदात होतो…
माझी परीक्षा संपली होती..
म्हणून मी आणि बाबा बाहेर गेलो होतो..
आकाश पाळण्यात बसलो, icecream खाल्ली..
दोघेही छान एन्जॉय करून थकून भागून घरी आलो..
दोघांनाही एवढी झोप येत होती की फ्रेश व्हायला ही कोणी तयार नव्हते..
पण तरी बाबा ने मला कसेतरी बाथरूम मध्ये पाठवले आणि तो ही change करून माझ्यासाठी दूध गरम करायला गेला…

त्याचवेळेस इकडे बाथरूम मध्ये मी रडत होती.  खूप घाबरली होती मी…

बाबा ने आवाज दिला तरी माझे रडणे थांबत नव्हते पण बाबांचा आवाज ऐकताच मला थोडा धीर आला.
मी बाहेर आली आणि बाबांना सांगू लागली की  “शु करतांना हे असं होतंय…”

हे ऐकून बाबा घाबरला…
त्याला काहीच कळेना की काय झालंय नक्की..
डोक्यांत एवढे विचार की काय विचारू काय नको असं होत होतं…
“तुला कोणी काही केलं का??
तू तर माझ्याचसोबत होतीस??
तुला कोणी कुठे हात लावला का ??
प्रश्नांची नुसती सरबत्ती सुरू होती ??”

दोघांनाही काही कळेना की नक्की काय होतंय??

शेवटी काय सुचलं म्हणून बाबा मला लगेच एका lady डॉक्टर कडे घेऊन गेला.
तिथे त्याला कळलं की माझी menstruation cycle सुरू झाली आहे..

ती lady डॉक्टर म्हणाली,
“घाबरू नका…
१३ ते १५ वर्षाच्या वयातील मुलींची menstruation cycle सुरू
होतेच…. हे नैसर्गिक आहे…
तिचं वयच आहे हे…”

डॉक्टर ने मला आणि बाबा ला ही  सगळं नीट समजावून सांगितलं…

बाबा थोडा अस्वस्थ…
आपण विचार केल्याप्रमाणे काही झालं नाही हे समजल्यावर तो थोडा शांत झाला…

पण त्याच्या डोक्यांत बहुदा एक वेगळंच विचारचक्र सुरू झालं…
शब्दांच्या आधारे त्याने आपल्या आसवांना वाट मोकळी केली…

“कहाणी एक तुझी-माझी लेकरा,
होती जेव्हा ती घरात,
नव्हती तिची कोणा कीव,
नाही आता जेव्हा, होतो कासावीस जीव…

तुकडा काळजाचा भारी,
ठेऊन गेली आभाळाच्या गावी,
जरी ती असेल कुठे दूर ,
पण ठायी ठायी इथे च तिचा नूर…”

“आता परीची आई असती तर ती एवढी घाबरली नसती तिला तिच्या आईची खरी गरज आहे आता.”
असाच विचार बाबाच्या मनात तेव्हा आला असेल….

आपण बाप असलो आणि आई म्हणून आजवर एवढं काही केलं तरी अशा वेळेस आपण परी ची आई होऊ नाही शकत हे दुःख बाबाला सलत होतं…

बाबा मनोमन हाच विचार करत होता की
या विषयावर आपण आपल्याच मुलीशी कसं बोलायचं तिला कसं समजून सांगायचं??

बाबा आणि मी दोघेही एकदम शांत आपापल्या विचारांत चालत होतो…
बाबा मेडिकल जवळ येऊन थांबला…
पण माझ्याकडे बघून, मला तिथेच एका बाकावर बसवले…
मेडिकल मध्ये थोडी गर्दीच होती…

बोलू की नको असा विचार करत कितीतरी वेळानंतर त्याने  pad  मागितले…

“कुठले हवे??”

“अहो, त्यात काय कुठले सगळे सारखेच ना कोणताही द्या.”

“कोणताही कसा देणार वापस घेणार नाही..”
” विचारून या कुठला हवा तो..”

अहो कोणाला विचारू? तुम्ही द्या तुमच्या मनानी जो चांगला असेल तो…”

बाबाला काही समजेच ना की काय बोलावे…
तो सारखा माझ्याकडे बघत होता..

मेडिकल वाला ओरडला…
“timepass करू नका, बाकीचे पण customer आहेत…”

त्या आवाजाने बाबा दांदरला…
आणि आम्ही तिथून निघून घरी गेलो…

शेवटी बाबाला काय सुचले म्हणून तो एकटाच परत जाऊन pads घेऊन आला…

घरी येऊन त्याने बघितले तर मी झोपली होती पाय पोटाशी घेऊन…
त्याने ते आणलेले पॅकेट माझ्या study-table वर ठेवले…

माझ्या डोक्यावरून मायेचा हात फिरवून, अंगावर पांघरून घालून तो स्वतःच्या रूम मध्ये गेला…

त्याने सगळी माहिती मिळवली या विषयावर…
बुक्स सुद्धा वाचलेत…
अगदी या विषयावर कसं बोलायचं याविषयी सुद्धा त्याने सगळं वाचलं…

मी झोपेतून उठून तशीच बाबांकडे गेली…
बाबा स्वतःशीच बडबडत होता, “परी उठल्यावर तिला सांगावं सगळं समजावून माझ्या भाषेत, तिच्या बाबाच्या भाषेत म्हणजे तिला कळेल….”

मी आवाज दिला तसा बाबा धावत आला पण माझा निस्तेज चेहरा बघून तो थबकला…

माझ्याशी जे काही बाबाला बोलायचं होतं ते सगळे शब्द ओठांवर येऊन थांबले होते…
त्याची हिम्मत च होत नव्हती बोलण्याची…

खरा प्रॉब्लेम होता तो बाप आणि लेक यांच्या नात्यातला आणि समाजाने ठरवलेल्या मर्यादेचा…

Actually, in our societies, fathers, brothers cannot talk freely with their daughters about matters of female hygiene, periods, and sex.

पण माझा बाबा माझा मित्र होता…

मी आवाज दिला आणि त्याला जाऊन बिलगली…
माझ्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्याने पुसले…
म्हणाला…

“मी परीचा बाबा आणि मी च परीची आई …”

आमच्यातलं हे बाप लेकीचं अंतर आता मिटलं होतं आणि हरवलेली मैत्री परत मिळाली होती…

या विषयावरचे अनेक books त्याने मला वाचायला दिले..
मला या विषयावरील कॉमिक्स बनवुन दिलं..
स्वतः लिहलं त्याने बुक माझ्यासाठी
मला समजेल अशा भाषेत with colourful pens…
कार्टून्स, drawing सुद्धा त्याने काढलेत…

मला वाचायला सांगून काही doubts आले तर ते विचार असं सांगितलं…

प्रत्येक शंका-कुशंकेचं त्यांनी निरसन केलं
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मला अखंड साथ दिली…
कोणालाही न जुमानता… न झुगारता…

त्यामुळे आमचं नातं मायलेकी सारखं अधिक घट्ट झालं…
नाळ जुळली नसली तरी मनं तर जुळली आहेत ना आमची…

As a woman I am still overwhelmed….
” It’s a rainbow of confusion….
Wings, no wings, overnight, light, panty liner, tampon with a plastic applicator, tampon with applicator, tampon with no applicator…
it’s a mess….”

तर त्यावेळी बाबांची काय अवस्था झाली असेल याचा विचार आत्ता मी करू शकते…

मेडिकलवाल्याचे शब्द न शब्द बाबाच्या कानात घुमत राहिले असणार…

” मी काय करू??
काय घेऊ?? कसं घेऊ??
कोणाला विचारू??
कसं विचारू??
काय म्हणेल आपल्याला कोणी??”
अशा एक ना अनेक प्रश्नांनी बाबा भांबावून गेला असेल त्यावेळी…

हे सगळं आठवत मी माझ्या परीसाठी, हा क्षण
सर्वांनी मिळून साजरा करायचं ठरवलं..
परीला छान छान ड्रेस घेतलेत…
रोज एक नवा ड्रेस घालायचा असं ठरलं..
जेवण, नाश्ता सुद्धा अगदी तिच्या आवडीचे…
पांच दिवस पांच गोड पदार्थ बनवलेत…
आम्ही हा आनंद साजरा केला
ती ही खूप खुश होती…

मी माझ्या बाबांची मुलगी असल्याचं मला अभिमान वाटत आहे…
त्यांनी जुन्या विचारांना तिलांजली देऊन आमच्यातील नातं अधिक घट्ट आणि मैत्रीपूर्ण ठेवलं होतं…
त्याच पावलांवर पाऊल ठेवण्याचा मी प्रयत्न मी करत आहे…

माझ्या बाबांनी मला समजावलं होतं तसं च्या तसं मी माझ्या परीला ही समजावत असते..
तिला मी books दिलेत…
आम्ही सगळे मिळून परीला न समजलेल्या गोष्टीवर चर्चा ही करतो…

काहीही शिकतांना खेळीमेळीचे वातावरण असले तर मुलं लवकर शिकतात…

……………………..समाप्त

आताही बहुतेक वडील, भाऊ, किंवा घरातील पुरुष मंडळी स्त्रियांशी या विषयावर कधी बोलत नाहीत आणि कधी काही प्रश्न आलेच मुलांकडून तरी त्यांना धमकावून दटावून हाकलून लावतात…

पुरुषांना आजही पुरेपूर माहिती नसल्यामुळे आणि लाजलज्जा यामुळे स्त्रियांशी या विषयांवर कधी बोलता येत नाही…

पण आता हे गरजेचं आहे असं मला वाटतं…
आई नसेल किंवा घरांत कोणी मोठी स्त्री नसेल तर त्या single father साठी ही आव्हानात्मक वेळ ठरू शकते…

ही परिस्थिती म्हणजे पालकत्वाची कसोटी च…
बरोबर ना???

(शुद्धलेखनाच्या चुका माफ असाव्यात….
तुमच्या प्रतिक्रिया आणि suggestions नक्की आवडेल…
कथा आवडल्यास like आणि share करायला आणि comments द्यायला विसरू नका…?)

—दिप्ती अजमीरे

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत