मास्तर ….!!

Written by

? मास्तर…..!!

गावाच्या शेजारीच शाळा होती .आजुबाजुला सुंदर निसर्गरम्य परिसर होता.शाळेची ईमारत आकर्षक व डौलदार होती.हरतर्हेच्या पाना फुलांनी शाळेची बाग सजली होती.शाळेला सुंदर रंगरंगोटी केली होती.सर्वत्र पताका व तोरणे झळकत होती .विविध विचारवंताचे विचार व सुभाषिते यांनी मन आकर्षित करुन घेत होत.शाळेत मुल – मुली मोठ्या उत्साहानं शाळा शिकत होती.अशी ही शाळा नावारुपाला आणण्यासाठी झटणारे एकमेव गुरुजी म्हणजे ” चिंचणे मास्तर …!”
धारदार नाक , डोकीवर पांढरी टोपी , भिंगाचा चष्मा , पांढरा सदरा , हातात काठी व करारी मुद्रा असा चिंचणे मास्तरांचा आवेश होता.कडक शिस्त , हजरजबाबीपणा , स्वच्छतेचे ते पाईक होते , पण तितकेच ते समजुतदारही होते.शाळेतील शिक्षकांनासुद्धा त्यांचा आदर होता .आपली शाळा नेहमी अग्रेसर रहावी यासाठी ते कायम झटत असत.मुलांना ते नेहमी सौजन्याची वागणूक देत असत पण अभ्यासात त्यांना कुचराई चालत नसत.” तुम्ही तुमच आयुष्य इतकं सुंदर जगावं की कुंडीतल्या गुलाबाला आज किती गुलाब आले आहेत हे तुम्ही आवर्जून रोज पहावं…!!” असे म्हणणार्या चिंचणे मास्तरांची शिकवणच वेगळी होती.
हेच मास्तर कांही दिवसांनी अजयला भेटले.पुर्विचा त्यांचा पेहराव तसाच होता चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या .चिंचणे मास्तर भेटल्यामुळे अजयला फार आनंद झाला .मास्तरांना पाहुन अजयच्या मनात कित्येक विचार आले.” गुरुजी …!!” अजयने हाक मारली.गुरुजींनी कोण अजय सरनोबत ..!! वा… कस काय चाललय अजय…. गुरुजी बोलले.. छान चाललय गुरुजी …तुमच्या संस्कारामुळे अजुनही आम्ही सुखरुप आहे…शिक्षण झाल ..सरकारी नोकरीही मिळाली… लग्न होवून दोन मुले आहेत..अजयने आपली कुंडली मास्तरांना सांगून टाकली.सेवानिवृत्त झाल्यानंतर बर्याच वर्षानी गुरुजींची भेट झाली होती.अजयच्या आईवडीलांचीही गुरुजींनी विचारपूस केली.तसे अजयला गुरुजींचा चेहरा कांहीसा चिंताग्रस्त दिसला …हल्ली कुठे असता गुरुजी ..? अजयने प्रश्न विचारला…” वृधाश्रम आहे इथेच जवळ..!!तिथेच असतो.अजयला हे ऐकून काय बोलायचे सुचेना .मुलगा परदेशात नोकरी करतो ..वर्षभरापूर्वी सौही गेल्या..घर कस सुनसान झाल…आणि वृधाश्रमाची मी वाट धरली..मास्तर बोलत राहिले…अजय सुन्न होवून ऐकत होता.चष्म्यातुनसुद्धा आश्रु तरळताना दिसले..मान दुसरीकडे करुन अजयला ते म्हणाले …अजय चलतो मी आता..!!पुन्हा भेटू निवांतपणे…मला मित्रांशी भेटायचे आहे…असे म्हणत ते निघून गेले…अजय मात्र त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे बघतच राहिला…विचार करु लागला…शाळेच्या प्रांगणात एक गुरुजी म्हणून कित्येक संस्कारशील विद्यार्थी घडवणारे गुरुजी व वर्गाच्या बाहेर भेटलेले गुरुजी यात भरपुर फरक होता पण आयुष्याची शिस्त तिच…तोच रुबाब..जीवनाकडे पहाण्याची दृष्टी नेहमीच सुंदर..समोरच्या गच्चीत ठेवलेल्या गुलाबाच्या रोपट्याकडे पाहुन त्यांचे ते नितांत सुंदर वाक्य आठवल…” ” तुम्ही तुमचं आयुष्य इतकं सुंदर जगावं की कुंडीतल्या गुलाबाला आज किती गुलाब आले आहेत हे आवर्जून पहावं…!!” अगदी दररोज….मास्तर तुमच्या शिकवणीला सलाम….!!

✍नामदेव पाटील.

Article Categories:
शिक्षण

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत