माहेर कधीच तुटणार नाही..(भाग दोन)

Written by

पहाटे पहाटे सुप्रियाला झोप लागली …पण थोड्या वेळातच घड्याळीचा गजर झाला आणि ती दचकून उठली!? ६ वाजलेले…तिने बाजूला बघितलं…निषाद (नवरा)गाढ झोपलेला होता…

ती उठली आणि पटापट आवरायला लागली… निशादला उठवलं..त्याचा टिफीन तयार केला..ती माहेरी गेल्यावर सासूबाई आणि निषादचे आबाळ नको व्हायला म्हणून गावातच राहणाऱ्या  चुुलत नंदेला ३,४ दिवसांसाठी बोलावून घेतलं..?

निषादने तिला ऑफिस ला जातांनाच बस स्टॉप वर सोडलं..अखेर ती निघाली तिच्या माहेरच्या प्रवासाला..?सोबतच कितीतरी प्रश्न तिच्यासोबत प्रवास करत होते…?

तिने अलगद भूतकाळात प्रवेश केला..?

तिला आठवलं…२ वर्षा आधी जेव्हा तीचं लग्न झालं तेव्हा पाठवणीच्या वेळी ,तिला रडतांना पाहून महेश गमतीनेच म्हणाला होता की , ” ऐ रडूबाई !का एवढं रडतीयेस?? तू गेल्यानंतर तुझी रिक्त जागा भरून काढायला ,मी लग्न करणारच आहे की?? नंतर मग तू माहेरी आली नाही तरी चालेल..आम्हाला काहीच फरक पडणार नाही..?

दादाचं ते बोलणं ऐकून मी आणखी रडायला लागले …तेव्हा दादाच्या डोळ्यात सुद्धा पाणी तरळलं..? आणि माझ्या डोक्यावर हात ठेऊन म्हणाला, ” तुझी जागा कुणीही घेऊ शकत नाही ! तू गेल्यावर आठवण तर येईलच , पण तू काळजी करू नकोस, तुझ इकडे येणं झालं नाहीतर मी तिकडे येत जाईल तुला भेटायला ! प्रॉमिस !?मग तर झालं?? आता हस बघू..?दादाचं हे बोलण ऐकून मात्र लागलीच माझी कळी खुलली…दादाने त्याचं प्रॉमिस पाळलं..तो येतो मला भेटायला..

” माझा दादा ” हो फक्त माझाच दादा ! तो नाही चेंज होऊ शकत..त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे..आई – बाबा आणि वहिनी सुद्धा आपलीच तर आहे?? मग का इतकं इन्सिक्योर होतंय मला?? मी असा विचार करूच कशी शकते???

अरे बापरे! ?विचार करून करून डोकं ठणकायला लागलंय.. बसं बरोबरच माझ्या विचारांची गती सुद्धा वाढतेय..पण आता बाssसं झालं..नकोच हे नकारार्थी विचार ! डोकं थोड शांत ठेऊयात…आता फक्त १५ मिनिट उरलेत घरी पोहचायला..विचारांनी इतकं भंडावून सोडलं की ५ तासांचा प्रवास सुद्धा कळला नाही…?

१५ मिनिटात सुप्रिया माहेरी पोहचली..महेश तिला बस स्टॉपवर घ्यायला आलेला… ? घरचे सगळे तिची वाटच बघत होते…घरात पाऊल टाकल्या बरोबर तिच्या नजरेने टिपलं, आपण घरं जस सोडून गेलो तसचं होत …फक्त काही वस्तू add झालेल्या होत्या …त्याही दादा आणि वहिणीला आलेलं present होतं..बाकी सगळं जिथल्या तिथे..

# भेटू पुढच्या म्हणजेच शेवटचा भागात!?

Article Categories:
मनोरंजन

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा