मिरा

Written by

गावाच्या वेशी वरून एक भरधाव गाडी येत असते. मध्य रात्रीचे दोन वाजले असतील.

पक्या : अरे सम्या मोबाईल ला रेंजच नाही यार..

पक्या समीरला सांगत होता…

तोच एक तरुण मुलगी डोक्यावर दोन हंडी आणि हातात टॉर्च घेऊन जाताना त्यांना दिसते. गाडीत बसलेला पक्या हातातील घडाळ्याकडे बघतो एवढ्या रात्री पाणी घ्यायला आली..

समीर : अरे गावात रात्रीच पाणी येत असेल. तू फक्त पत्ता विचार की.
पक्या : मी नाही बाबा तूच विचार. भूत वैगेरे असेल तर माझ्या मानगुटीवर बसेल. काय तू पण मुंबईला राहिला नि असल्या गोष्टीवर विश्वास ठेवतोस.
पक्या : एवढं बोलतो मग तू विचार की तुझं तूच.
समीर : विचारतो ना घाबरतो का काय मी.. आणि मुळात भूत वैगेरे नसत.

गाडीची काच खाली करत समीर त्याला दिसणाऱ्या बाईला विचारू लागला : ओ ताई इथे पाटलांचा वाडा कुठं आहे. आमच्या फोनला रेंज नाही बंद पडला आहे आम्ही नवीन आहोत इथे
ती बाई : इथून डाव्या अंगाला जावा. समोर मोठं झाड लागेल त्याच्या समोरच दिसेल तुम्हाला.
(पक्क्याने काचेतूनच तिच्याकडे नजर फिरवली. सुंदर देह , तीच ते गोर रूप. साडीतून दिसणारी तिची नितळ कंबर त्याच्या तो प्रेमात पडला. मनात नको ती भावना जागृत झाली. )

पक्या : काय दिसते ही राव.

तोच बाजूला बसलेल्या सुभाषने डोक्यात एक टपली मारली. सुभाष : लग्न झालय राव तुमचं आता तरी असले उद्योग बंद करा. आणि गाडीत आपल्या मुली पण आहेत ह्याच भान राहू दे जर तरी.
रूची : तू पण कोणाला शिकवतोस. तो कधी सुधारणार नाही.
पक्या : लग्न झालं म्हणून प्रेम करन गुन्हा आहे कां?
सुभाष : थांब बायकोला विचारून सांगतो तुझ्या..
तसे सगळे हसायला लागतात.
पक्या : करा गरीबाची मस्ती करा..

इथे समीर सगळ्यांना शांत करतो. समीर तिला नीट पत्ता विचारून घेतो. समीरने धन्यवाद ताई म्हणून गाडी चालू करतो आणि तो पाटलाच्या वाड्याकडे जायला वळला.

पाटीलांनी 3 वर्षांपूर्वीच वाडा सोडून दुसऱ्या गावात कायमचे स्थायी झालेले असतात. मुंबईमधून काही लोक गावात येणार हे त्यांनी गावतल्यांना सांगितलेल होत. गावात पाण्याचा होणार वारंवार प्रश्न, गावात काही नवीन उपक्रम, नवीन धोरण राबवून गावावर पडणारा भार कमी व्हावा व गाव थोडं पुढे यावे. गावात एक प्रेक्षणीय स्थळ बनवणे हाच त्यांचा हेतू होता. हीच लोक गाव सुधारतील म्हणून पाटलांनी रामूला सांगून वाडा स्वच्छ करून त्यांच्या जेवणाची सोय केलेली.

गाडी बरोबर पाटलांच्या वाड्याकडे येऊन उभी राहिली. एवढया रात्री कोण म्हणून रामूने घाबरतच दरवाजा उघडला.

रामू ना तू, समीर गाडीतून उतरून रामुला विचारु लागला.

रामू : होय साहेब, पण तूम्ही???

समीर : पाटील काही बोलले नाही का आमच्याबद्दल..?

रामू : म्हणजी, मुंबईसून येणार पावन तुम्ही म्हणायच का?

समीर : हो आम्हीच ते.

रामू : माफ करा हा साहेब मुंबईवरून येणार ते माहीत होतं. पण कधी आणि कव्हा ते साहेबांनी काही सांगितलं नाही बघा मला .

(रामू गेट खोलतच समीरला सांगू लागला)

समीरने तशी गाडी पाटलांच्या दारापुढे लाऊन ठेवली.

तुम्ही आत व्हा साहेब, सामन मी उतरवतो गाडीतून.

तसे सगळे गाडीतून उतरले..

रामूने त्यांना आपापल्या रूममध्ये जायला सांगितले. सगळे प्रवास करून दमून झोपून गेले.

सकाळ होताच प्रत्येक जण अंघोळ करून नाष्टा करायला बसले. सगळे जण होते शिवाय पक्या.. पक्या त्याच्या खोलीत सुद्धा नव्हता. इथेच भटकायला गेला असेल म्हणून सगळ्यांनी आपापला नाष्टा केला. तरी पक्या अजून आला नाही.
खूप वेळ वाट बघून सुद्धा त्याचा काहीच पत्ता नव्हता. शेवटी कंटाळून सगळे त्याला शोधायला निघाले. रामू सगळं फक्त बघतच होता.

पक्या… ए पक्या…..

सगळे जण आवाज देत त्याला शोधत होते. तोच त्यांना रस्त्याच्या कडेला काही तरी दिसलं. धावतच सगळे तिथे जाऊन बघतात तर तो प्रकाश. समीरने त्याला हात लावून बघितलं तर त्याचा श्वास चालु होता. समीर, सुभाष आणि रोहनने त्याला उचलुन वाड्यात आणलं.

समीर : रामू डॉक्टर कुठे मिळतील आता?
रामू : मी बोलवून आणतो साहिब.

थोड्या वेळाने डॉक्टरांना घेऊन रामू तिथे आला. डॉक्टरांनी प्रकाशला चेक केल. शुद्धीवर येईल तो मी इंजेकशन दिल आहे. वाटेल बर त्याला आणि निघून गेले.

सगळे जण आता पक्या शुद्धीवर यायची वाट बघत बसले. तोच प्रकाश शुद्धीवर येतो..

सोड मला.. जाऊ दे
अस काही तरी बडबडत उठला.

समीर त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारतो.. तोच पक्या घाबरतच उठतो.

समीर : पक्या काय झालं??
पक्या : ती.. ती…भूत आहे…. मला मारून टाकणार होती.
समीर : वोट रबिश मेन..
पक्या : मला इथे नाही राहायचं मला जायचं… ती मारून टाकले मला.. मी जातो बाबा… तुम्ही रहा..

एवढ बोलून पक्या उठून बेग भरण्यासाठी उठतो.

समीर त्याला मागे खेचतो. कोण मारेल तुला?? काय वेड्या सारख बोलतोयस तू??

ती ती काल दिसलेली स्त्री. मी तुम्ही झोपल्यावर पुन्हा तिला बघायला गेलो. तीच ते देह नजरेसमोरून जातच नव्हतरे. ती दिसली तिथे मी जाऊन आजू बाजूला शोधू लागलो पण नाहीच दिसली. निराश होऊन पुन्हा मागे वळणार तोच ती अचानक समोर आली.. घाबरून किंचाळलोच मी.

घाबरतोस का असा…
मी : अस अचानक समोर आलीस मग घाबरणारच ना मी.
का आलास पुन्हा इथे?
मी : ते ते …. तुझं नाव विचारायचं राहून गेलं
विद्रुप हसायला लागली ती…
मीरा….

तोच काच फुटल्याचा आवाज घरात घुमतो..

रामुच्या हातून काचेचा ग्लास फुटतो.
रामू : काय?? मीरा कशी भेटेल तुला??? तूच पापी नजरेने गेला असशील त्या वेशीवर..

समीर : नक्की कोण ही मीरा? तुम्ही काय बोलताय हे काका??

रामू : ज्याच्या मनात पाप त्याचा घात आपोआप… स्त्रीकडे घाणेरड्या नजरेने बघणाऱ्याला ती सोडत नसते साहेब. गावातील लोक काय बी बोलू दे पण मला माहिती माझी मीरा कशी व्हती ती. माझ्या बहिणीची पोर ती…

जवळपास 4 वर्षांपूर्वीची गोष्ट रामू सगळ्यांना सांगू लागतो

दरवर्षी गावात मोठी जत्रा असते. खूप लांबून लोक जत्रेला येतात.

तेव्हा पण जत्रा भरलेली..

शिव गावातील हुशार, सुशिक्षित मुलगा. गावात मेडिकच दुकान. उच्च शिक्षित असून सुद्धा मुंबईत न जाता आपलं गावच थोडं सुधाराव म्हणून त्याचा भोळा प्रयत्न.

मीरा मैत्रिणींसोबत बोलत असताना शिवला दिसते. सुरुवातीपासून मीरा खुप आवडत असते त्याला. पण मीरा शिवला जरासुद्धा पसंत नाही करत. मीराची स्वप्न खूप वेगळी आणि मोठी. तिला तिच्या सौंदर्याच खुप घमेंड.

मीरा दिसताच शिव तिला आवाज देतो.
शिव : मीरा ऐकणं..

मीरा ऐकून न ऐकल्यासारख करते.

शिव : मीरा ए मीरा…

सीमा : किती ग तिरस्कार करतेस त्याचा. आवाज देतो आहे बघ तुला. काही बोलशील का नाही.

मीरा एक कटाक्ष रागातच सीमावर टाकते.

तोच मागून शिव धावत येतो..

मीरा : शिव मी तुला हजार वेळा सांगितलंय माझा नाद सोडायचा. रस्त्यात अस मला आवाज देत बसु नकोस.
शिव : चुकलो बाबा. तुझ्यासाठी चाललोय मी त्या मुंबईला. इथे आई बाबांना सोडून. गावासाठी पाहिलेली मी माझी स्वप्न बाजूला ठेवुन. खूप मोठी स्वप्न आहेत ना तुझी करतो पूर्ण पण एक लक्षात ठेव पाहिलं आणि शेवटच प्रेम तूच. तुझ्या शिवाय कोणी नाही. एवढं बोलून शिव निघुन जातो तिथुन.
मीरा : हम्मम आला मोठा ह्या मीराला पटवायला. माझा होणार नवरा राजकुमार असेल. असा गॉगल लावून ऐटीत येणार. दिसायला तर तो सेम तू सेम हृतिक वाणी. आणि….
सीमा : बस बस… अग शिव एवढा पण वाईट नाही ग. किती राग करतेस त्याचा तरी तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे बग. गावातल्या पोरी बी त्याच्या मागे आणि तो एक खूळ जो तुझ्यामागे.
राणी : नाही तर काय. सोड आपण पण कुणाला सांगतोय. सिनेमाच्या दुनियेत घुसून गेलेल्या ह्या खुळीला.
मीरा : हे बघ जास्ती बोलायचं काम न्हाय.. एकदा मिळू दे की माझा राजकुमार मग दावते तुम्हाला.

तिघीही हसत खेळत जत्रेत जातात. आकाश पाळना वैगेरे फिरून झाल्यावर सीमाला खूप तहान लागते. तोच त्या लिंबूपानी पियायच म्हणून तिथे वळतात.

मीरा : दोन लिंबुपाणी द्या.
सीमा : दोन का? तुला नको का.
मीरा : नको असल कुठलं पण मी खात पीत नसते.. मीरा देशमुख आहे मी..

लिंबूपाणी वाला : ओ ताई.. घरून पाणी आणलंय. आम्ही पण कुणाला कसलं पण पियायला देत नसतो. इमानदारीत धंदा करतो. ( लिंबू पाणीवाला सुद्धा रागातच बोलतो)

सीमा : सोडा की ओ दादा. कोणाला सांगताय तूम्ही.

मीरा एक तिरकी नजर रागातच सीमावर टाकते.

सीमा : अग मला म्हणायचंय तुम्ही साक्षात मीरा देशमुख ला हे सांगत आहेत.

सीमा आणि राणी दोघी हसू लागतात.

तोच समोरून बबण्या येतो.. त्याच्या मित्रांसोबत.

ओ भैया 5 लिंबूपाणी द्यो..
(मित्रांसमोर शायनिंग मारायची म्हणून चुकीचं हिंदी बोलायचं)
मीरा : आता की रे, त्याला मराठी येते. गावातलाच आहे तो. उगाच चुकीचं हिंदी बोलू नकोस. आम्ही आमच हिंदी विसरून जाऊ.
(सगळे जण हसायला लागतात)
बबण्या : (थोडं खजील होऊन) आता काय चुकीचं बोललो ग मी..
मीरा : तुझं म्हणजे कस असत माहिती का? गावभर थुक्लो म्या कुठं के चुकलो.
सीमा : गप की ग.. धर पिते का लिंबूपाणी
मीरा : नको ग त्या बबण्याला द्यो..

सगळेच पुन्हा हसतात..

लिंबूपाणी वाला : तुम्हाला किती देऊ.?
बबण्या : (एक, दोन.. पुन्हा मोजायला लागतो). पाच द्यो. (द्यो बोलणार पण तिथेच थांबून)… द्या दादा.
मीरा पण एक कटाक्ष त्याकडे ठेवून बघते

सुमित : मला नको लिंबूपाणी.
बबण्या : का..? अरे पिऊन तर बघ की मर्दा..
सुमित : मला नाही आवडत असे कुठे पण पियायला.
बबण्या : तुम्ही लोक बाबा मुंबईची.. मोठी लोक. बिसलेरिच पाण्यात बनवायला सांगू का?
लिंबूपाणी : बिसलेरिच पाणी वैगेरे आम्ही ठेवत नाही. हे चांगलं पाणी आहे. खराब पाणी देऊन लोकांना मारायचं नाही आम्हाला.

सुमित : अहो दादा तस काही नाही. मला थोडी सर्दी झालीय.. म्हणून बोलतो.

मीरा सुमितकडे बघतच राहिली. सुमित मुंबईचा आहे ह्या शब्दाने ती आकर्षित झाली. सुमित दिसायला गोरा पान. कोणीही बघेल तोच त्याच्या प्रेमात पडेल असा.

सीमा : कोण पावणी म्हणायचिरे??
बबण्या : अच्छा, ही व्हय.. हा केदार. आत्याचा मुलगा. आणि हे दोन त्याचे मित्र. हा मिहीर आणि हा सुमित. आणि ती फोनवर बोलत आहेना ती मिहिरची होणारी बायको. जत्रेसाठी आलेत. 15 दिवस राहतील नि जातील.

मीरा : तू भारी भागवायला बसलायस किरे त्यांना.

मीरा सुमितला स्वतः कडे आकर्षित करण्यासाठी बोलत होती. पन सुमितने तिच्याकडे साधं बघितलं सुद्धा नाही. त्याच आपलं मोबाईलमध्येच काही तरी चालू होतं. मीराला आता राग अनावर झाला.

मीरा : तुमचं झालं असेल तर चला. अजून अर्धी जत्रा बघायची आहे.
सीमा : माझं तर झालं राणी तुझं झालं का…?
मीरा : हे घ्या ओ दादा पैसे (पण तरीही सुमित तिच्याकडे बघतच नव्हता)

मीरा मुद्दामून सुमितच्या पुढून गेली. हवेने तिची ओढणी सुमितच्या मोबाईलवरून गेली. तसा सुमित भानावर आला. तिने आता मागे वळून रागाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. आणि पुढे जाणार तोच बबन्याने तिला आवाज दिला.

बबण्या : मीरा थांब की ग. सगळेच जाऊयात की.
मीरा : का तुला गाव माहीत नाही व्हय.
बबण्या : तस नव्ह.. प्रिया एकटीच मुलगी आहे ग आमच्यात. बाकी सगळे आम्ही मुल. तिला बर नाही वाटत ते म्हणून म्हणायलोय मी.

मीराला ही संधी सोडायची नव्हती. तिने सीमा आणि राणीकडे बघितल त्यांनी देखील हो म्हणून टाकलं.

तसे ते सगळे एकत्र निघाले.

आता सगळे मिळून फिरत होते. प्रियाला देखील मस्त वाटत होतं. मीराने प्रियाला पूर्ण जत्रेत फिरवलं. तीला खूप बरं वाटलं.तीच हसणं बघून सुमितला पण ती आवडू लागली.

अश्यातच थोडा अंधार पडू लागला.

उशीर होतोय म्हणून सीमा मीराला सांगू लागली.

मीराने देखील हो खरच की अस मोबाईलमध्ये बघत म्हटलं.

बबण्या : हो आम्ही बी निघतो. पण उद्या जाऊया का गावाकडील डोंगरावर सगळे मिळून. मज्जा येईल बघ.
सुमित : हो चला ना मीरा तुम्ही. प्लिज..

(सुमित ने एक प्रेमभऱ्या नजरेने मीराकडे बघत म्हटले)

प्रिया देखील तिला बोलू लागली.

बघते घरी विचारून मग कळवते तुला.

माझा नंबर घेऊन ठेव मग कळव मला. मीराला जे हवं होतं तेच होतय हे बघून ती खूप खुश होत होती.

दोघांनी एकमेकांचे नंबर घेऊन ठेवले.

मीराने घरी येताच आईला विचारलं. मैत्रिणींसोबत बाहेर जायचं म्हटली. मैत्रिणी असतील म्हणून आई देखील नाही बोलली नाही. जेवुन बिचण्यावर आडवी पडनार तोच सुमितचा मेसेज..
सुमित : मग काय ठरलं?
मीरा : कसलं काय?
सुमित : उद्याच ग.
मीरा : हो येते मी.
सुमित : खरच??
मीरा : हम्मम्म..

दुसऱ्या दिवशी मीरा तैयारी करून सीमाकडे गेली.
सीमा : मला नाही जमणार ग यायला. बा ओरडेल. पोरांच्यातनी फिरायला गेली की.
मीरा : किती खुळी ग तु. मैत्रिणींसोबत जातो म्हणायच ना.,
सीमा : अग तीथ शेतीला जातो की तो. अशी काय करतेस तू.
मीरा : अरे हो. मी बी खुळ्या गत बोलते. आणि राणी ग?
सीमा : ती बी नाही यायची. पावणी आलीत घरभर.
मीरा : मग तिला काय पावण्यांना बघत बसायचं का?
सीमा : तस नव्ह.. जेवण कपडे वैगेरे तीच करते ग.
मीरा : काय दोघी नमुन्या मैत्रिणी म्हणून दिल्यास रे देवा.. आता मला एकटीलाच जावं लागेल.
सीमा : एकटी जाणार तू..
मीरा : मग मी काय घाबरते की काय कुणाला??
सीमा : जा बाई जा पण वेळेत घरी जा.
मीरा : चल निघते मी..

तोच हातातला फोन खनकतो…

सुमित : हॅलो..
मीरा : कुठे आहात तुम्ही लोक..?
सुमित : मंदिराजवळ.
मीरा : आलीच मी 2 मिनिटात.

मीरा मंदिराजवळ पोहचते तर तिथे प्रिया, सुमित आणि मिहीर असतात
मीरा : बबण्या कुठे.?
सुमित : त्याच पोट खराब झालंय..
मीरा : वाटलंच मला. खाखा खायचं मग अस होणारच. आणि त्याचा भाऊ..
मिहीर : तो त्याच्यासोबत डॉक्टरकडे जाणार आहे..
सुमित : बाकीचे कुठेत राणी आणि सिमा?
मीरा : त्यांना नाही जमणार यायला. चला निघायचं का इथेच बोलत बसायचं.

चला चला…
मीरा प्रिया सोबत चालत होती.

प्रियाने घातलेले मुलांसारखे कपडे बघून मीरा तिला विचारू लागली. तुला आवडतात असे कपडे घालायला.
प्रिया : मुंबईत असेच कपडे घालतो आम्ही. मला तुमच्यासारखे पंजाबी ड्रेस नाही जमत घालायला. ओढणी सांभाळत बसेपर्यंत माझी कसरत होते बाबा.
मीरा : मुंबई खूप मस्त आहे ना ग. मला सुद्धा नाही आवडत गावच्या लोकांचं राहणीमान..
सुमित : येऊन तर बघ एकदा मुंबईला.
आता हळू हळू सगळे डोंगर चढू लागेल. प्रिया सुरुवातीलाच दमली. मिहिरला ही तिच्यासोबत थांबावं लागलं.
मिहिर : तुम्ही व्हा पुढे मी येतो हिला घेऊन.
मीरा : मुंबई दमली वाटत… (मीरा हसतच बोलू लागली)
आता फक्त सुमित आणि मीरा पुढे चालत होते. सुमितला ही आता चढायला जमत नव्हतं. मीराने त्याचा हात घट्ट पकडला आणि दोघेही चालू लागले.
सुमित : मीरा एक बोलू..
मीरा : बोल की..
सुमित : मला तू खरच खूप आवडतेस लग्न करशील माझ्याशी???
मीरा : एक दिवसात प्रेम पण करू लागलास का माझ्यावर.
सुमित : का एक दिवसात प्रेम होतं नाही का..
मीरा त्याच्या हातातला स्वतः चा हात सोडवत.. दोन्ही हात कंबरेवर घेऊन.. : किती प्रेम करतोस माझ्यावर..
सुमित : जेवढं तुला अपेक्षित आहे त्यापेक्षा खूप जास्त..
मीरा : काय करू शकतोस माझ्यासाठी..
सुमित : तू बोलशील ते सगळं.फक्त तू सांग..
मीरा : उडी मारून दाखव मग ह्या डोंरावरून
सुमित : ठिक आहे.. i love u मीरा (अस सुमित मोठ्याने ओरडतो)
आणि तो उडी मारायला जाणार तोच मीरा त्याचा हात खेचते.
सुमित : काय झालं मीरा..?

मीरा काहीही न बोलता त्याला मिठी मारते..
मला पण तू खूप आवडतोस.. आय लव्ह यु 2.. सुमित..

सुमित : मग करशील ना माझ्याशी लग्न?
मीरा : हम्म
सुमित : मीरा तू नीट विचार करून सांग? कारण मी मुंबईचा आहे. तुला होईल ना ऍडजस्ट तिथे.
मीरा : तू असणार सोबत तर कुठेही ऍडजस्ट करेल बघ मी.
सुमित : खरच…
मीरा : हो खर..
सुमित : मग चलना मुंबईला. मला हे दिवस पण मोठे वाटत आहे.
मीरा : तुझ्या घरचे करतील ना मला एक्सेप्ट.
सुमित : न करायला काय कमी आहे तुझ्यात?? पन तुझ्या घरचे नाही करणार ग.
मीरा : नाही केलं की पळून करूयात.
सुमित : मग चल ना आत्ताच जाऊ.. त्या मिहीर आणि प्रिया सोबत आपण पण लग्न करू. ते व पळूनच करणार आहेत लग्न.
मीरा : काय??
सुमित : हो. ती पळून आलीय मिहिरसोबत. आता मुंबईत थोडं शांत झाला की मग लग्न.. मग थोड्या दिवसांनी घरचे पण मान्य करतात ग.

मीरा देखील सुमितच बोलणं पटत होत.
मीरा : पण मला काय वाटत सुमित की मी एकदा माझ्या आईला विचारते. ती हो बोलेल अस वाटत.
सुमीत : अग मग बाबा… तुझे बाबा ऐकतील का? घरात सांगितलंस तर आम्हाला सुद्धा हकलवून देतील आणि तुझं दुसरीकडे लग्न लावतील.
मीरा : मग अस पळून कसरे. मला थोडा वेळ दे.
सुमित : तुझा भरोसा आहेना माझ्यावर.
मीरा : भरोसा आहेरे. पण खूप घाई होतेय अस वाटत मला.
सुमित : ठीक आहे मग माझ्या घरचे माझं लग्न लावू दे कुणाशी पण..
मीरा : काय?
सुमित : मी तुला सांगणार नव्हतो पण मी सुद्धा रागात निघून आलोय इथे गावी. माझ्या घरचे मला आत्याच्या मुलीशी लग्न करायला फोर्स करत होते. पण मला मुळात लग्न करायचंच नव्हतं. तिच्याशी काय कुणाशीच. पण त्या दिवशी तुला जत्रेत बघितलं आणि पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात पडलो..
मीराला आता काय बोलावे सुचत नव्हतं. तिला सुद्धा सुमितच बोलणं पटत होत.
सुमित : हे बघ लग्न झालं की मग परत येऊ गावात. मग आपल्या दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही.
दोघांचं बोलणं चालू असत तोच प्रिया आणि मिहीर देखील तिथे आले.

प्रिया : ओह हो…

( मीरा आणि सुमितला अस हातात हात घालताना बघून प्रिया चिडवत त्यांना बोलते. मीरा लाजून हात काढते)

मिहीर : फायनली तुला कोणती तरी मुलगी आवडली तर. नाही तर काय बोलायचास.. मी तर बाबा लग्न नाही करणार।

मीराला देखील आता सुमितवर विश्वास बसू लागला.

 

क्रमशः

©भावना विनेश भुतल

Article Categories:
भयपट

प्रतिक्रिया व्यक्त करा